आकडेबाजी (३) : एक फसव्या आकड्याची

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जोदार आहे का, ती वाढती-बहरती आहे का, हे मोजायला ऋझ हा आकडा वापरतात. GDP(Gross Domestic Product), सकल राष्ट्रीय उत्पाद) हे एखाद्या अर्थव्यवस्थेत खेळणाऱ्या पैशाचे एक माप आहे. वाढणारा GDP जोदार अर्थव्यवस्था दाखवतो, स्थिर ऋझ साचलेपण उघडे करतो आणि घटता GDP ही अर्थव्यवस्थेची वृत्ती पराभूत होत असल्याची खूण असते. आजची जगाची अर्थव्यवस्था आवर्जून स्पर्धेवर बेतलेली आहे, आणि वाढत्या अर्थव्यवस्था (=देश) साचलेल्या व आक्रसत्या अर्थव्यवस्थांना मागे टाकतात. आजच्या अर्थविचारांध्ये सर्वत्र GDPचे महत्त्व इतर सर्व निर्देशांकांपेक्षा जास्त मानले जाते. पण अनेक अर्थशास्त्र्यांनी दाखवून दिले आहे, की GDP आणि माणसांचे सुख-समाधान यांचा संबंध नाही.

पुढे वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीविचार

शिांतिवन कुष्ठधाम ह्या गांधीवादी संस्थेत काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाची उच्चस्तरीय बैठक पार पडली व तीत मोहन भागवतांपासून ते तोगडियांपर्यंत अनेक नेते हजर होते ह्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. महत्त्वाची बाब ही की त्यामुळे गांधीवादी संस्था व संघपरिवार ह्यांच्या परस्पर-संबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात गांधींचे रामराज्य व संघाचा हिंदुत्ववाद ह्यांतील मूलभूत फरक खुद्द गांधीवादी मंडळी विसरली व त्यामुळे खादी व खाकी ह्यांच्यातील फरकही—विचाराच्या तसेच आचाराच्या पातळीवर – दिसेनासा झाला, ही प्रक्रिया बरीच जुनी आहे. हिंदुत्वाला खरा धोका गांधींपासून आहे, बोलघेवड्या निधर्मीवाद्यांपासून नाही हे सर्व छटांच्या हिन्दुत्ववाद्यांना फार आधीपासून माहीत आहे.

पुढे वाचा

संयत पण ठाम

एक मे महाराष्ट्र दिन. अलिकडे तो राजभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या दिवशी एक वाईट बातमी कळली. सामंत बाई गेल्याची… अगोदर राजभाषा मराठीची व त्यानंतर शेवटपर्यंत मराठी भाषेची निरलसपणे सेवा करणाऱ्या बाईंनी अखेर जाण्यासाठीही तोच दिवस निवडावा!
अभ्यास, करियर वा चळवळ करण्यासाठी ‘भाषा हा विषय अगदीच दुर्लक्षित व बिनमहत्वाचा वाटला जाण्याच्या काळात त्यांनी तो आपल्या आवडीचा विषय म्हणून स्वीकारला, जोपासला. सुसंस्कृत समाजाला चांगल्या भाषेची आवश्यकता का असते, ती कशी पूर्ण व्हायला हवी, तसेच तिचे संवर्धन न केल्यामुळे समाजाचे काय नुकसान होते ह्यावर त्यांनी जोरकसपणे मांडणी केली.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (३)

मन व अंतःकरण
आपल्या अस्तित्वाची अनेक अंगे अथवा घटक असतात. पदार्थय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अति-महत्त्वाचा असल्याचे अध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात.

पुढे वाचा

भाषा, जात, वर्ग इत्यादी

[पालकनीती मासिकात आलेल्या किशोर दरक ह्यांच्या ‘शिक्षणाच्या माध्यमाचे राजकारण’ ह्या लेखावर दिवाकर मोहनी ह्यांनी दिलेला प्रतिसाद, त्यामध्ये भाषिकदृष्ट्या महत्त्वाचे अनके मुद्दे असल्यामुळे, ‘आसु’च्या वाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. – संपा.]

श्री.दरक म्हणतात, “शालेय शिक्षणाची भाषा किंवा जगाची कोणतीही भाषा Neutral (तटस्थ) नसते, तर त्या भाषेला जात, लिंग, धर्म, वर्ग, भूगोल व इतिहास असतात.” माझ्या मते भाषेचे हे गुण तिच्या ठिकाणी अंगभूत (जन्मजात) नसतात, तर ते चिटकविलेले असतात. भाषा मुळात तटस्थच. पुढे त्यांनी इंग्रजीची तरफदारी केलेली आहे. आणि तिच्या वापरामुळे मुलांचे कल्याण होईल असे सुचविले आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आणि मार्क्सवाद

मार्क्सवादाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्क्सवादात किंवा साम्यवादी राज्यकर्ता असलेल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नसते. मार्क्सवाद हा लोकशाहीविरोधी आहे; असे मत होण्याला अर्थात काही कारणे आहेत. काही मार्क्सवाद्यांच्या भूमिकाही त्याला कारणीभूत आहे. एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अप्रगत अशा भांडवली देशात म्हणजे रशियात क्रांती झाली. तिकडे झारशाही होती. भांडवली लोकशाही नव्हती. प्रगत भांडवली देशात पहिली क्रान्ती होईल असे मार्क्सने भाकित केले होते. परंतु क्रांती झाली ती लोकशाही नसलेल्या झारशाही रशियात. ग्रामशी या इटालिअन मार्क्सवाद्याने त्या क्रांतीला मार्क्सविरोधी क्रान्ती असे म्हटले आहे.

पुढे वाचा

भाकीत

पोर नागवे कभिन्न काळे
मस्त वावरे उघड्यावरती
बाप बैसला झुरके मारीत
चूल पेटवी मळकट आई
भिंतीमागे पॉश इमारती
कंपनी तेथे संगणकाची
थंड उबेधी लठ्ठ पगारी
कोडी सोडवत जगप्रश्नांची
कोण सोडवील कोडी इथली
उघड्यावरच्या संसाराची,
रस्त्यावरच्या अपघातांची,
मरू घातल्या वन रानांची?
पोर नागवे चालत चालत
जाईल का त्या इमारतीत
बसेल जर ते संगणकावर
कोडी सोडवील तेही झटपट
– अनिल अवचट (मस्त मस्त उतार मधून साभार)

टिप्पणीविना वृन्दावनच्या विधवांचा रंगोत्सव

मथुरेच्या जवळचे वृन्दावन म्हणजे विधवांचे क्षेत्र. हतभागिनी, फुटक्या कपाळाच्या मानल्या गेलेल्या ह्या विधवा येथे समाजापासून तोंड लपवून कृष्णाची पूजाअर्चा करीत कसेबसे आयुष्य कंठतात. ह्या वर्षी त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडली. त्या चक्क होळी खेळल्या. सण-उत्सवात त्यांना सहभागी होऊ न देणाऱ्या प्रथा-परंपरा धाब्यावर बसवून त्यांनी जल्लोष साजरा केला. त्या गाणी गायल्या, नाचल्या. एकमेकींच्या अंगावर त्यांनी गुलाल आणि फुले उधळली. कुटुंबसंस्थार्फत महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या बळी ठरलेल्या महिलांचे हे पवित्र क्षेत्र तसे दरवर्षीच धुळवडीचा सण साजरा करते, पण अगदी हळू आवाजात. आपापल्या आश्रमांच्या आतमध्येच कृष्णाच्या रासलीलेतील दृश्ये त्या साकार करतात.

पुढे वाचा

समर्पणबंधः एक सांस्कृतिक वैशिष्ट्य

मराठीवाङ्मयातील एक कुतूहलजनक सामाजिक विशेष म्हणजे ‘समर्पण सिंड्रो’. ‘सिंड्रो’ म्हणजे ‘पुनःपुन्हा घडून येणाऱ्या ठरावीक प्रकारच्या गोष्टींचा गट’. आपण याचे नामकरण ‘समर्पण-बंध’ असे करू या. समर्पण-बंध ज्या कथांमध्ये फुलवलेला असतो त्या कथांमध्ये समर्पणाच्या भावनेने भारावलेली एखादी व्यक्ती चित्रित केली जाते. उदाहरणांमुळे या सिंड्रोचे स्वरूप स्पष्ट होईल. त्याग, समर्पण या मूल्यांचे परममहत्त्व मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय संस्कृतीत फार पूर्वीपासून मानले गेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मनोवृत्तीला विशेष बळ प्राप्त झाले. गांधीवाद, मार्क्सवाद या त्यावेळी प्रभावी असलेल्या विचारधारा समर्पण-सिंड्रोला पूरक होत्या. समर्पण-सिंड्रो सर्वांत ठळक बनला तो वि.स.खांडेकरांच्या

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (९)

संगणक आपला ताबा घेतील का?

आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदूच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंची रचना – थोडक्यात एआय (Artificial Intelligence) – आघाडीवर आहे.

एआय आज ज्या पातळीवर आहे त्याच पातळीवर पुढील काळातही राहील याची खात्री नाही.

पुढे वाचा