एन्रॉनची अजब कथा

माझ्या लहानपणी मी ‘अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा’ आवडीने वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रात गेली दहाबारा वर्षे गाजणारे एन्रॉन या बहुदेशीय कंपनीचे प्रकरण अशाच एका सुरस, चमत्कारिक आणि नाट्यमय कथे-सारखे आहे. काही राजकारण्यांचा आणि बाबूंचा भ्रष्टाचार एवढेच या प्रकरणाचे स्वरूप नसून अधिक गहन असावे असे वाटण्यासारख्या बऱ्याच घटना एन्रॉनच्या बाबतीत घडल्या आहेत. आता एन्रॉनचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून एन्रॉनची वीजही महाराष्ट्रात आली आहे. खरे तर या वादावर पूर्ण पडदा पडायला हवा. पण पुन्हा एकदा सरकारी पातळीवरच वाद सुरू झाला आहे. काही वर्षांपूर्वी जे आरोप (‘एन्रॉनची वीज महाग आहे, एवढ्या विजेची गरज महाराष्ट्राला नाही’, इ.)

पुढे वाचा

भरवशाच्या म्हशीला . . . !

२३ जानेवारीला माझ्या भावाचे काही कागद घ्यायला आयायटीत (पवई) गेलो. ते तयार होत असताना समजले की एक तंत्रवैज्ञानिक उत्सव होणार होता. आयायटीच्या ‘मूड इंडिगो’ या उत्सवासारखाच हाही उत्सव विद्यार्थीच साजरा करतात. २६ ते २८ जानेवारीला उत्सव होता, आणि मला २७ ला त्या भागात काम होते. उत्सव पाहायचे ठरवले. हा उत्सव विद्यार्थ्यांसाठीच होता.. उद्योग आणि शिक्षकवर्गाचा त्यात सहभाग नव्हता.. तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम, प्रदर्शन वगैरे बरेच काही होते.. २७ ला दुपारी गेलो, तर रस्त्यात डॉट कॉम कंपन्यांच्या खूप जाहिराती दिसल्या, ऑन लाईन व्यवहार, इ कॉमर्स, बरेच काही.

पुढे वाचा

इतिहास: खरा व खोटा

(क) भारतात १९०१ पर्यन्त बसेस मध्ये अस्पृश्यांना मज्जाव
भारतात १९०१ पर्यन्त अस्पृश्यांना ट्राम व बस मध्ये चढूच देत नसत. बसेस मध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यात श्री. संभाजी संतूजी वाघमारे या अस्पृश्य कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची माहिती श्री. आर. डी. गायकवाड यांनी त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या आठवणी (सुगावा प्रकाशन, पुणे ३०; सप्टेंबर १९९३) या पुस्तकात दिली आहे. त्यांच्याच शब्दांत खालील वर्णन पाहा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अस्पृश्यांना हजारो वर्षांच्या गुलाम-गिरीच्या शृंखलातून मुक्त करण्याकरिता अविश्रांत परिश्रम केले. त्यांच्या उज्ज्वल यशाची पायाभरणी म. फुले, छत्रपती शाहू महाराज, बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड, कर्मवीर शिंदे इत्यादिकांनी केली.

पुढे वाचा

जैसे थे!

वास्तव परिस्थितीलाच आदर्श मानणे ही फार स्वार्थी क्रिया आहे, कारण बहुतेक वेळा वास्तव अन्यायाने खचाखच भरलेले असते. वास्तव परिस्थिती कायम राखण्याने ज्याचा स्वार्थ साधला जात असेल, तोच फक्त वास्तवाला आदर्शवत् मानतो. असे मानणे थेट गुन्हेगारी स्वरूपाचे असते. त्याचा अर्थ असा होतो की सर्व अन्याय कायमच राहायला हवेत, कारण एकदा ठरलेली व्यवस्था कायमस्वरूपी असायला हवी. हा दृष्टिकोण सर्व नीतितत्त्वांना छेद देतो. सदसद्विवेक बाळगणाऱ्या कोणत्याही समाजाने हा दृष्टिकोण स्वीकारलेला नाही. उलट इतिहास दाखवतो की जे काही चुकीच्या तत्त्वांवर ठरवले गेले असेल ते जसेच्या तसे मान्य न करता नेहेमीच नव्याने मांडायला हवे.

पुढे वाचा

भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरूप

आपल्या दरिद्री देशामध्ये संपत्ती व वैभवाचे प्रदर्शन केल्याशिवाय सामान्य जनतेवर पकड घेता येत नाही. राजकीय पक्षांची जंगी संमेलने सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमावर उभी राहात नाहीत. मोठे उद्योगपती, कारखानदार, जमीनदार, बिल्डर, व्यापारी यांच्या आर्थिक सहाय्यावर हे प्रदर्शन घडत असते. सर्वच पक्षनेत्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा भव्य सोहळासुद्धा त्यांच्या स्वतःच्या खर्चाने होत नसतो. पण त्यामुळे त्यांना कमीपणा येत नाही आणि एकदा पक्षाच्या निमित्ताने पैसा गोळा करण्याची प्रथा मान्य झाली की, त्यामध्ये दान देणाऱ्याची दानत व उद्देश हा अप्रस्तुत ठरतो. मोठ्या श्रीमंत धार्मिक संस्था किंवा मंदिरांमध्ये दान केलेला सर्व पैसा पवित्रच समजला जातो; त्याचप्रमाणे राष्ट्रासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षाच्या उभारणीसाठी दिलेला पैसाही राष्ट्रधर्मासाठीच आहे, अशी समजूत करून घेतली जाते.

पुढे वाचा

शंका असणे-खात्री नसणे

आपण कोण आहोत? कुठे चाललो आहोत? ह्या विश्वाचा अर्थ काय? ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्र न आहे, नाही का? पण असो. तुम्ही कसाही विचार केलात तरी आम्ही एका शोधयात्रेत आहोत, हे जग समजून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. लोक मला विचारतात की मी भौतिकीचे अंतिम नियम शोधतो आहे का. असे नाही.

पुढे वाचा

धर्माची बुद्धिगम्यता

जानेवारीचे संपादकीय महत्त्वाच्या मुद्यांवर प्रतिक्रियांचे आवाहन करते. त्यातले काही मुद्दे धर्माच्या बुद्धिगम्यतेबद्दलचे आहेत. त्यांचे मूळ डिसेंबर २००० च्या अंकातील पाटणकरांच्या अभिप्रायात आणि त्याचेही मूळ सप्टेंबर २००० च्या अंकातील ‘डॉ. दप्तरीचा अभिनव सुखवाद’ या माझ्या लेखात आणि त्याच अंकाच्या संपादकीयात आहे. जिज्ञासू वाचकांच्या सोयीसाठी हे संदर्भ दिले आहेत.
१. डॉ. दप्तरी धर्म बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान मानतात. श्रद्धावादी किंवा शब्दप्रामाण्यवादी समजतात तसा धर्म मानला तर तो तोकडा पडतो असे त्यांचे म्हणणे. मनुष्याच्या आत्यंतिक सुखप्राप्तीसाठी धर्म आहे हा त्यांचा दावा आहे.
२. डॉ. दप्तरी व त्यांचे विरोधक ‘धर्म’ हा शब्द भिन्न अर्थाने वापरतात हे तेथेच स्पष्ट केले आहे.

पुढे वाचा

इतिहास लेखनाची शिस्त

[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.]
शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच सध्या काही इतिहाससंशोधक, विशेषतः युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत असलेले संशोधक, करीत असल्याचे मला आढळून आले आहे. म्हणून, ते वेळीच सावध व्हावेत अशा हेतूने, इथे त्याविषयी थोडक्यात लिहितो.

पुढे वाचा

एक यंत्र आणि स्त्रियांचे काम

कार्यालयीन यंत्रांमुळे सध्याच्या कामांचे स्प जास्त वेगवान, बिनचूक, नियमित आणि कार्यक्षम व्हावे, अशी अपेक्षा होती. टंकलेखक (typewriter) म्हणजे नवा आणि सुधारित कारकून. गणनयंत्र (calculator) म्हणजे नवा आणि सुधारित हिशेबनीस—-जो माणसांची हिशेबाची कामे आ चर्यकारक वेगाने आणि कार्यक्षमतेने, विद्युद्वेगाने करील, असा. आणखी हत्यारे, आणखी अवजारे, आणखी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी. पण जेव्हा टंकलेखक, झेरॉक्स यंत्रे, टेलेफोन स्विचबोर्ड्ज, गणनयंत्रे, संगणक आणि अनेक पंच्ड-कार्ड यंत्रे प्रत्यक्षात कार्यालयांमध्ये अवतरली तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांच्या जागा स्त्रिया आणि यंत्रांची जंजाळे घेऊ लागली. स्त्रियांची बोटे जुन्या ‘हस्तकांच्या’ हातांपेक्षा स्वस्ताईने व नेमकेपणाने कामे करीत.

पुढे वाचा

कामांचा गुणाकार

डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग ही माणसे, त्यांची ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) ही संस्था, हे सगळे महाराष्ट्राच्या ओळखीचे आहे. वैद्यकशास्त्राचे उत्कृष्ट शिक्षण घेऊन ते ज्ञान आदिवासी भागात वापरणारे हे लोक. आपल्या हृद्रोगाचा वैयक्तिक अनुभव वापरून ‘माणसांनी निरामय कसे जगावे’ हे शिकवणारे अभय, झाडांशी स्त्रियांचे नाते आणि ग्रामीण स्त्रियांची स्वतःच्या शारीरिक व्यवहारांकडे पाहायची दृष्टी अशा दोन महत्त्वाच्या संकल्पनांच्या कर्त्या राणी, नुकतेच पन्नाशी उलटलेले हे लोक ‘कर्त्या’ सुधारकांपैकी महत्त्वाचे. त्यांचे काम आणि त्या कामाची इतर जागी ‘लागवड’ करण्याच्या शक्यता, यांच्याविषयी अनौपचारिक गप्पांमधून माहिती मिळवायचा प्रयत्न ‘आजचा सुधारक’ने केला–आपल्या नेहमीचा स्वभाव जरा बाजूला ठेवून!

पुढे वाचा