विज्ञान आपल्याला सत्य सांगते का? विज्ञान आणि विज्ञान नसलेल्या गोष्टी यातील फरक कसा सांगता येईल? जर वैज्ञानिकांच्या एका गटाने आपणाला जैविक प्रक्रिया केलेले अन्न (genetically modified foods) धोकादायक नसते असे सांगितले, व दुसऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले की असे अन्न धोकादायक असते; तर कोणावर विश्वास ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपणाला वैज्ञानिक एखाद्या निष्कर्षाप्रत कसे पोहचतात, हे पाहिले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून निष्कर्ष कसा काढला जातो हे पाहिले पाहिजे.
चांगले विज्ञान हे जाहीरपणे केले जाते. त्यामध्ये काही लपवाछपवी केली जात नाही.
वैद्यकीय व्यवसाय
१० वैशिष्ट्ये —- इतर व्यवसायांपेक्षा वैद्यकीय व्यवसाय वेगळा आहे.
(१) मानवी शरीर हे बऱ्याच वेळा स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे. सर्दी-पडसे-फ्ल्यू पासून क्षयरोग, विषमज्वर, हिवताप अशा रोगांपर्यंत बऱ्याच रोगांपासून शरीर आपले आपणच बरे होत असते—-बहुतेक वेळा. सण अज्ञानामुळे नक्की आपोआप बऱ्या होणाऱ्या रोगांसाठी देखील उपचारकाकडे जात असतो. त्यामुळे काहीही उपचार केले तरी सण बराच होतो—-इतकेच नाही तर उपचारकांनी चुकीचे उपचार केले तरी बहुतेक वेळा शरीर त्यावरही मात करून बरेच होते. त्यामुळे उपचारकाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व प्रामाणिकपणाचा कस लागतच नाही. त्यामुळेच शास्त्रीय व अशास्त्रीय (आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, इलेक्ट्रोपथी, युनानी, बाराक्षार, सिद्ध, धनगरी, रेकी, ॲक्युपंक्चर वगैरे) उपचारांत, बुद्धिमान व मूर्ख, सर्वच प्रकारचे उपचारक व्यावसायिक यश मिळवतात.
धिस फिशर्ड लँड : लेख २
संकलक आणि गुराखी जीवनपद्धती
सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या समाजाचा आदिमानवी स्थितीपासून किती विकास झाला आहे हे तपासायला एक निकष वापरतात. त्या समाजात वस्तूंचे उत्पादन करण्याची प्रक्रिया, तिच्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि उत्पादन करणाऱ्यांचे एकमेकांशी संबंध, हा त्या समाजाचा पाया समजतात. या संरचनेला मार्क्सने पायाभूत संरचना, infrastructure, असे नाव दिले. समाजाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे व्यवहार म्हणजे या पायावरची इमारत किंवा Superstructure. पायाच अखेर इमारत कशी असेल ते ठरवतो, ही मार्क्सची मांडणी. ती सर्वमान्य नाही.
राज्यव्यवस्था आणि तिच्यातील सत्तेसाठीचा संघर्ष यांना पुरेसे वजन दिलेले नाही, ही एक टीका, प्रामुख्याने मार्क्सच्या अनुयायांकडून होणारी.
निवेदन
आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाने आता बारा वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे अंदाजे एक हजार वर्गणीदार आहेत. हिंदी द्वैमासिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या वर्गणीदारांची संख्या दीडशेच्या घरात आहे. आजचा सुधारकचे बारा वर्षे अविरत प्रकाशन केल्यामुळे मासिकाच्या आयुष्याचा एक टप्पा गाठला गेला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. असा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून आणि आपल्या संस्थापक संपादकांचे स्वास्थ्य तितकेसे बरे नाही म्हणून आपल्या मासिकांच्या प्रकाशनाची एक वेगळी व्यवस्था करण्याचे योजिले आहे. विवेकवादाला वाहिलेल्या ह्या दोनही मासिकांचे स्वामित्व आता एका अनौपचारिक विश्वस्तमंडळाकडे सोपवावयाचे आहे.
धैर्य
तापलेल्या आणि धूळभरल्या डांबरी रस्त्यावर एका स्त्रीचा, गीताबेनचा, नग्नदेह पडला आहे. तिचे कपडे जवळच अस्ताव्यस्त पडले आहेत. अंतर्वस्त्रांपैकी एक वस्तू तिच्यापासून फुटाभरावर आहे, तर दुसरी तिच्या डाव्या हाताने जिवाच्या आकांताने धरली आहे. तिचा डावा हात आणि धड हे रक्ताळले आहेत. धडावर खोल जखमा आहेत. डाव्या मांडीवर रक्त आहे आणि घोट यावर एक पैंजण. प्लास्टिकच्या चपला शेजारी आहेत. चित्राच्या मध्यावर एक वेडावाकडा, लाल, द्वेषभरला विटेचा तुकडा आहे—-बहुधा तिच्या मारेकऱ्यांनी तिचा अंत घडवायला वापरलेला.
गीताबेन अमदाबादेत २५ मार्चला दिवसाढवळ्या मारली गेली, तिच्या घराशेजारील एका बस-थांब्याजवळ.
पत्रसंवाद
रवींद्र द. खडपेकर, २० पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव मार्ग, ठाणे — ४०० ६०१
…… अलिकडेच दूरदर्शनवर एक भयानक विज्ञापन पाहण्यात आले. त्यासंबंधी मी ‘राज्य महिला आयोगास’ लिहिले. तुमच्याकडेही हा प्रकार कळवीत आहे. आपण योग्य ती दखल घ्याल ही खात्री आहे.
…. मी स्वतः हिंदुत्ववादी गोतावळ्यात असल्याने हिंदुत्वाबाबत माझा विचार नेहमी चालूच असतो. म्हणून मला प्रश्न विचारावेसे वाटतात. (१) आपण राष्ट्रवाद मानता का? (२) नसल्यास दुसरा कोणता वाद मानता? मानवतावाद? (३) असल्यास हिंदुत्ववाद हाच भारताचा राष्ट्रवाद होऊ शकतो असे आपणास का वाटत नाही?
संपादकीय
खेल खेल में दोन ‘गणिती’ कहाण्या सांगतो.
गणिताचे एक प्राध्यापक फळ्यावर एका सूत्रापासून दुसरे एक सूत्र सिद्ध करत होते. एका टप्प्यावर ते म्हणाले, “यावरून हे उघड आहे की . . .”, आणि त्यांनाच त्या टप्प्याच्या उघडपणाबद्दल (obviousness) शंका आली. फळा सोडून, टेबलखुर्ची गाठून त्यांनी वीसेक मिनिटे कागदावर काही गणित केले. शेवटी आनंदून उठत ते म्हणाले, “हो! ते उघड आहे!”
दुसरी कहाणी आहे, श्रीनिवास रामानुजन् इंग्लंडात होता तेव्हाची. रामा-नुजनचा गुरु जी. एच. हार्डी याने त्याला काही व्याख्याने ऐकायला पाठवले. व्याख्याता काही नवे निष्कर्ष ‘जाहीर’ करत होता.
परिवर्तन: उन्नत मानवतेकडे झेप
प्रस्थापित व्यवस्थेचा इतका जबरदस्त पगडा समाजातील सर्वांवर—सामान्य जनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर— असतो की ही सर्व मंडळी प्रस्थापित रीती व मूल्यांप्रमाणे वागत असताना, त्यातील दोष व चुका त्यांना दिसत असूनही, तो रुळलेला मार्ग सोडायला तयार होत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये माणसे इतकी गुंतून राहण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्या व्यवस्थेने मान्य केलेल्या सुख-कल्पना, त्या कल्पनांतील सुखप्राप्तीची साधने/मार्ग आणि एकंदर जनरीती/जगरहाटी यांच्याशी सर्व माणसे एकरूप झालेली असतात. दुर्योधन भरसभेमध्ये द्रौपदीचा विनयभंग, तिची विटंबना करीत असता सारे पांडव आणि भीष्म-द्रोणादी त्याविरुद्ध आवाज उठवीत नाहीत याचे कारण त्यांनी— सर्वांनीच स्वीकारलेली प्रस्थापिताशी बांधिलकी, गुलामी!
वैसार्थ
ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मसाधना या तीन्हीसाठी ‘परमार्थ’ हा शब्द संत वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. म्हणून अनंत ज्ञेय वस्तूंमधील सर्वोत्कृष्ट वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ. ब्रह्म किंवा आत्मा ही सर्वोत्कृष्ट वस्तू आहे म्हणून त्याचे ज्ञान म्हणजेच परमार्थ (दासबोध दशक १ समास ९). ब्रह्म कधी न ढळणारे अनंत, स्थिर आहे. ते कल्पनारहित आहे. ब्रह्मांडात ब्रह्मासारखे दुसरे काही नाही. केवळ सद्गुरूपदेशाने त्याचे ज्ञान होते व ते अनुभवावे लागते, वर्णन करिता येत नाही. (दासबोध दशक ७ समास २)
आत्म्याच्या प्रथम संकल्पनेसाठी ब्रह्म ही कल्पना प्रथम वैदिक काळात रुजू झाली.
आरक्षणाबद्दलचे गैरसमज आणि वास्तविकता
श्री दिवाकर मोहनी आपल्या लेखात (आ.सु. नोव्हेंबर, २००२) जातीनिहाय आरक्षणाचे पाऊल अर्थकारणाच्या दृष्टीने चुकीचे ठरले की काय अशी शंका घेण्यास (आज) पुष्कळ जागा आहे असे सांगून आरक्षणामुळे कोणतेही उत्पादन न करता व किंवा केलेच तर दुय्यम, तिय्यम दर्जाचे कस्न हक्क म्हणून मिळवावयाची रक्कम असे त्याला स्वरूप आले व परिणामी देशाचा नैतिक दर्जाच घसरला असे म्हणतात. श्री मोहनी यांच्या ह्या निष्र्कषानिमित्ताने आरक्षणाच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने या लेखाची गरज भासली व म्हणूनच लिहिण्याची तसदी घेतली आहे.
आरक्षणामुळे काही दलित/आदिवासी सरकारी कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा कस्न ‘मुर्गी-चोरी’ सारखे छोटे गुन्हे करीत असतील असे जरी कबूल केले तरी त्यांचे हे गुन्हे इतर उच्चपदस्थ अधिकारी, जे बहुधा उच्चवर्णीयच असतात, ह्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारांच्या मोठ्या देशद्रोही गुन्ह्यांच्या प्रमाणात किती-तरी क्षुल्लक आहेत.