राज्यघटनेचा फेरआढावा कशासाठी?

भारताला भारतीय राज्यघटना हवी, अशी गेली ५० वर्षे मागणी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाने व आताच्या भारतीय जनता पक्षाने संधी मिळताच संविधानाची समीक्षा करण्यासाठी आयोग नेमला. सत्तारूढ पक्षाला संविधानाची समीक्षा का करावीशी वाटते; कोणत्या सुधारणा/दुरुस्त्या संविधानात कराव्यात असे वाटते; संपूर्ण संविधानाचीच समीक्षा करण्याची आवश्यकता काय यावद्दल कोणतीही सैद्धान्तिक मांडणी करण्यात आलेली नाही. वारंवार निवडणुका घ्याव्या लागू नयेत म्हणून संविधानात दुरुस्ती केली पाहिजे; समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द अनावश्यक आहेत; देशाच्या ५० वर्षांच्या इतिहासातील यशापयशास संविधान किती प्रमाणात जबाबदार आहे याचा शोध घ्यायचा आहे; ५० वर्षांत ७० हून अधिक दुरुस्त्या संविधानात झाल्या आहेत म्हणून आता संपूर्ण संविधानाचा आढावा घेऊन समीक्षा केली पाहिजे अशी वेगवेगळी कारणे भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेळोवेळी दिली.

पुढे वाचा

पौगंडावस्थेतील दुर्लक्षित मुली

युनोतर्फे उद्घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास १९९८ सालीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्व व्यक्तींना समान मानवी हक्क असावेत व स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी असा भेद नसावा हे त्याचे मुख्य सूत्र आहे. जग आता एकविसाव्या शतकात पदार्पण करणार आहे. अजूनसुद्धा समाजाचा निम्मा भाग- स्त्रीवर्ग कनिष्ठ व हीन समजला जाऊन त्याच्याविरुद्ध पक्षपात व अन्याय केला जातो. १९७५ ते १९८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरे झाले. भावी काळात मुलींच्याकडून भरीव कार्य व्हावे यासाठी त्यांच्या विरुद्ध होणारा पक्षपात थांबवून त्यांना सवल, सक्षम कसे बनवावे याबाबत जगातील शासनव्यवस्था व समाज यांनी निश्चित धोरण व उपाययोजना आखून अंमलात आणल्या पाहिजेत.

पुढे वाचा

साडेचार दिवसांचा स्वर्गनिवास ( १ )

पाश्चात्त्य समाजात वृद्धाना कोणी विचारत नाही हे खरे आहे का? आमच्याकडील वृद्धांचे जे समाधान आहे ते अज्ञान आणि जाणीवेचा अभाव यामुळे की आमच्या तत्त्वज्ञानामुळे? देह जर्जर अन् व्याधिग्रस्त झाला की, गंगाजल हेच औषध आणि नारायणहरि हाच वैद्य – ही विचारधारा पुरेशी आहे?
माझी एक वृद्ध मैत्रीण अमेरिकेत असते. वय ७९; वजन २१५ पौंड; उंची ५ फूट १ इंच. दोनही पायांनी अधू झाल्याने पांगुळगाडा घेऊन चालत असे. आता तीही विजेवर चालणारी चारचाकी गाडी घेऊन कोठेही फेरफटका करीत असल्याने आनंदात असते. पण त्यामुळे वजन व अधूपण दोनही वाढून आणखी गोत्यात येते आहे व त्याची जाणीव ती सुखाने विसरते आहे.

पुढे वाचा

एक लक्षवेधी संपादकीय

मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी आहे. आमचा स्वतःचा कर्मठपणाला आणि परंपरावादी विचारांना मुळीच विरोध नाही. त्यांच्या विचारातील हिंसेला आमचा विरोध आहे. शंकराचार्यांना आकल्प जगविण्यासाठी घुटी पाजणाऱ्या सनातनी विचारांचा आम्हाला संताप येत नाही.

पुढे वाचा

प्रवाही कुटुंब (१) ई. आर्मी यांच्या फ्रेंच लेखावरून

“धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच बदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हें सर्व बदलण्यास काय हरकत आहे?” आपल्या नीतिकल्पनांना धक्के देणारी ही विचार- सरणी. (व्यक्ति) ‘स्वातंत्र्या’ चा अर्थ इतका त्याच्या तर्कपूत मर्यादे पर्यंत ताणणे आपल्याला झेपेल ?
वाचकांनी प्रतिक्रिया दयाव्या. नाव गुप्त ठेवता येईल. मात्र कायदेशीर गरज म्हणून आमच्या दफ्तरी नाव-पत्ता आवश्यक आहे.
सवानऊ वाजेपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गीय देवता भासत होती. जणू काय तुमचें पृथ्वीवरील आयुष्य सह्य व्हावें म्हणून ईश्वराने तिला मुद्दाम स्वर्गांतून तुमच्याकडे पाठवली होती. सर्वांगसुंदर अशी ही सगुणखनि तेथपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देत होती.

पुढे वाचा

लोकशाहीची तीन पथ्ये

लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग
दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक संदेश आहे तो पाळणे. ज्यांनी आयुष्यभर मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

तुम्हाला तुमच्या निवडीचे सल्लागार नेमता यावेत म्हणून माझा सल्लागार मंडळाचा राजीनामा मी या पत्राद्वारे देत आहे. गैरसमज नसावा ही विनंती.
मासिकावर एकसुरीपणाचा आरोप आहे. धर्म व श्रद्धा याविरोधी लिखाणच मुख्यत्वे केले जाते असा आक्षेप आहे. तशी टीका करण्याऐवजी मी अन्य विषयांकडेही मासिकाचे सुकाणू जास्त सशक्तपणे वळण्यासाठी मदत करू इच्छितो.
समाजाची मनोधारणा व चालचलणूक जर चांगली व्हावी ही आजचा सुधारकची इच्छा आहे तर माझ्या मते भौतिकता व नैतिकता यांचा आग्रही पाठपुरावा आपण केला पाहिजे.
भौतिकता :
शिवाजीचा समकालीन न्यूटन, गॅलिलिओ. आधीचा कोपर्निकस वगैरेंनी विज्ञानाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपण आपल्याकडे अजूनही देऊ शकलेलो नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला.

पुढे वाचा

‘माझं घर’च्या निमित्ताने

‘माझं घर’ या जयंत पवार लिखित नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला. जयंत पवार हे प्रायः समस्याप्रधान नाटकलेखक म्हणून जसे परिचित आहेत तसेच सकस नाट्यसमीक्षक म्हणूनही सुपरिचित आहेत. हेही नाटक एक कौटुंबिक समस्या घेऊनच तुमच्या समोर येते, पण ते केवळ तुमच्यापुढे समस्या ठेवत नाही तर तिला उत्तरही देते.

नवरा कलावंत! आपल्याला जपावे, फुलवावे ही त्याची बायकोकडून अपेक्षा. बायको ही केवळ गृहिणी नाही तर ती बँकेत नोकरी करणारी + घर सांभाळणारी + सासूबाईंची सेवा करणारी + आपल्या अकरा वर्षांच्या मुलीची सर्वार्थाने काळजी घेणारी एक स्त्री आहे.

पुढे वाचा

आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक

अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. आगरकरांच्या प्रेरणेने पुण्याला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन अकोल्याला त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठी मोफत शिक्षण देणारे वर्ग काढले. पुढे ह्या वर्गांना लेडिज होम क्लास असे नाव देण्यात आले. तेथील शिक्षिका फुकट शिकवीत.

पुढे वाचा