विवेकवादाला हरकत – दोन प्रतिक्रिया

१. उत्तर अमेरिकेत कॅनडामधून ‘एकता’ नावाचे एक मराठी त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै ‘९९ च्या अंकात आमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. श्रीराम गोवंडे या न्यूजर्सीमधील आमच्या मित्राने ती घेतली होती. (आजचा सुधारकच्या ऑक्टोबरच्या अंकात नंतर ती पुनर्मुद्रित केली आहे) ‘विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती’ या नावाने. एकताच्या ऑक्टोबर ‘९९ च्या अंकात आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरून दोन प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या कनेक्टिकट येथील आमचे मित्र श्री. सुनील देशमुख आणि मॅसॅच्युझेट्सच्या डॉ. ललिता गंडभीर यांनी आमच्याकडे पाठवल्या. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांपैकी एक ‘धर्म का हवा?’

पुढे वाचा

प्रिय वाचक

१. वैचारिक लिखाणाची दाद घेऊन प्रतिक्रिया देणे हे काम कठीण आहे. म्हणून कोणी केले की आनंद होतो. मग तो प्रतिवाद पुरेसा तर्कशुद्ध का नसेना. या दृष्टीने अमेरिकेतील दोन वाचकांचा मी आभारी आहे. विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती – ही आमची मुलाखत कॅनडातून प्रसिद्ध होणा-या ‘एकता’या त्रैमासिकाच्या जुलैच्या अंकात आली. तिची दखल ऑक्टोबर ‘९९ च्या ‘एकता’त दोन लेखकांनी घेतली. त्या आक्षेपांना थोडक्यात उत्तरे या अंकात दिली आहेत. ‘एकता’तील आक्षेपकांचे लेख विस्तारभयास्तव देता आले नाहीत.
२. कच्च्या आहाराचा प्रयोग हा र. धों. कर्वे यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत.

पुढे वाचा

मालकी हक्क आणि गुलामगिरी

व्यक्तिस्वातंत्र्यामुळे दुस-याला इजा होतां नये, हे जर सगळेच कबूत करतात, तर मतभेद कां व्हावा? मतभेद येथेच होतो की दुसरयाचे हक्क काय आणि त्यांचे नुकसान झाले असे केव्हा म्हणायचे? सनातनी आपल्या भावना दुखावल्याचं ढोंग करतात, पण त्यांच्या भावना कोणी दुखावतां नये असा हक्क त्यांना कोठून आला? त्यांच्या वागणुकीने आमच्या भावना दुखावतात, म्हणून काय आम्ही त्यांना शिक्षा करावी असे थोडेच म्हणतों? ते आपल्या समजुतीप्रमाणे वागतात, त्यांना विचार करता येत नाही, वागोत बिचारे. प्रत्येक व्यक्तीचे हक्क काय हे एकदा ठरलें म्हणजे स्वातंत्र्याच्या मर्यादा समंजस लोकांच्या दृष्टीने आपोआपच ठरल्या.

पुढे वाचा

संपादकीय

प्रिय वाचक,
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी नागपूरला समारंभपूर्वक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पारंपरिक बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा असा विधी नसतो. भिक्षु होण्याचा मात्र विधी असतो. तरी डॉ. बाबासाहेबांनी विधिपूर्वक बौद्धधर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर आपल्या उपस्थित असलेल्या लक्षावधी अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी भगवान वुद्धाच्या चालत आलेल्या अशा धर्मप्रथांपासूनच फारकत घेतली असे नाही. काही तत्त्वविचारांनाही त्यांनी कलाटणी दिली. त्यांनी धर्माच्या सामाजिक आशयावर भर दिला आहे. त्याला ते धम्म म्हणतात. धम्माशिवाय समाज राहू शकत नाही.

पुढे वाचा

सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे.

पुढे वाचा

विवेकाची गोठी

संपादक, आजचा सुधारक, यांस
स. न. वि. वि. मी मूळचा पुण्याचा आहे. त्या काळात अनेक विद्वानांची भाषणे सहजगत्या ऐकावयास मिळाली. त्या वेळेचे विद्वान अटीतटीने वाद करीत.
आपल्याला कोणी मारील” अशी भीती त्यांना वाटत नसे. माझा पिंड अशा वातावरणांत तयार झाला.
आज विद्वान एकमेकांना खूप संभाळून घेतात. त्यामुळे सामान्य वाचकांना संभ्रम पडतो नक्की काय? निर्जीव वस्तूला नमस्कार करणे कितपत योग्यं आहे? आगरकर व टिळक ह्यांत कोणाची भूमिका जास्त योग्य? गोडसेवद्दलचे नाटक दाखवावे का? अरुण गवळी व वाळ ठाकरे ह्यांत फरक कोणता?
पूर्वीचे विद्वान खाजगी प्रश्नांना उत्तरे देत.

पुढे वाचा

स्त्रीपुरुषतुलना – ले. ताराबाई शिंदे (१८५० – १९१०)

स्त्रीपुरुषतुलना हे ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली लिहिलेले पुस्तक श्री शिवाजी छापखाना, पुणे येथून प्रसिद्ध झाले. श्री. विलास खोले यांनी त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती संपादित केली आहे. मूळ संहिता उपलब्ध असताना पुन्हा हे पुस्तक संपादन करण्याचे प्रयोजन सांगताना संपादक म्हणतात, “पूर्वाभ्यासातील उणिवा दूर करणे, नवीन माहितीचा शोध घेणे आणि साहित्यकृतीचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणे या तीन उद्देशांनी मी प्रस्तुत संपादनास प्रवृत्त झालो’ (पृ. ९).

माझे प्रतिपादन संपादकांची प्रस्तावना तसेच मूळ संहिता या दोहोंवर बेतलेले आहे. सर्वच पृष्ठ क्रमांक, जे वेळोवेळी दिलेले आहेत, ते संपादित पुस्तकाचे आहेत.

पुढे वाचा

थॉमस जेफर्सनचे वंशज

क्रोमोसोमवरच्या डि.एन.ए.ची चाचणी करून वंशावळ ठरवता येते हे सिद्ध झाले तेव्हा काही वादग्रस्त, रहस्यमय व सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न सुटतील असा संभव निर्माण झाला.

अश्या चाचणीने, “थॉमस जेफर्सन व सॅली हेमिंग्स ही त्यांची गुलाम स्त्री (स्लेव्ह) यांना मूल झाले होते काय” ह्या वादग्रस्त प्रश्नाला आता उत्तर मिळाले.
जेफर्सन हे जिवंत होते तेव्हाच त्यांच्या लैंगिक संबंधांबद्दल टीकेला सुरवात झाली होती. जेम्स् कॅलेंडर या बातमीदाराने, “थॉमस जेफर्सन ह्यांचे स्वतःच्या स्लेव्हशी संबंध आहेत” अशी वार्ता प्रसिद्ध केली होती.

अनेक इतिहासकारांनी त्यानंतर या विषयावर उलटसुलट मत नोंदविणारी पुस्तके लिहिली.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!

(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा आणणारा होता. पण धर्मगुरू वस्ताद होते. त्यांनी असे पुकारले की शहरात पाप वाढल्यामुळे ईश्वराने लोकांना शिक्षा करण्याकरिता असा सूड घेतला. एकाने याहीपेक्षा जास्त कुशलतेने ईश्वराच्या दयाळू पणाचा खुलासा केला की, स्वर्गात देवदूत कमी झाले होते आणि ईश्वराला आणखी देवदूतांची गरज होती.

पुढे वाचा

एकविसावे शतक : बायोगॅस तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

आपल्या देशामध्ये वायोगॅस तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारकार्याला साधारणपणे २० वर्षांचा इतिहास आहे. या २० वर्षांमध्ये एकीकडे बायोगॅस तंत्रज्ञानाने, ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य, अशा पद्धतीने ऊर्जेची व खताची समस्या सोडविण्यामध्ये एक नवा आशावाद जागविला असला, तरी दुसरीकडे गावोगावी उभारलेल्या बायोगॅस-संयंत्रापैकी अनेक संयंत्रे बंद असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानासंबंधी उदासीनता आली आहे व काही ठिकाणी “बायोगॅस संयंत्रे चालू शकत नाहीत, हे तंत्रज्ञान कुचकामी आहे” अशा प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. या वीस वर्षांच्या इतिहासामधून आपण धडा शिकलो नाही व तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन अंमलबजावणीमध्ये आपण योग्य ती सुधारणा केली नाही तर या कार्यक्रमामध्ये आज जे मरगळलेले वातावरण तयार झाले आहे ते दूर होणार नाही.

पुढे वाचा