जातिव्यवस्था आणि नीरद चौधरी

एवढ्यातच, निधन झालेल्या सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार नीरद सी. चौधरी यांच्या “दि कॉन्टिनन्ट ऑफ सर्सी” या ग्रंथाबद्दल मला एक कुतूहल वाटते.
संदर्भ आहे, हिंदूंच्या जातिव्यवस्थेचा. हा मुद्दा चावून चोथा झालेला आहे, हे मान्य आहे. पण त्याचे महत्त्व वा अस्तित्व अजूनही कायम असल्याने, त्यावर पुन्हापुन्हा बोलले-लिहिले जाते. नव्या सहस्रकाच्या उदयाला जेमतेम एक वर्ष बाकी आहे. सा-या जगाचे स्वरूप इंटरनेटसारख्या साधनांनी बदलून गेले आहे. पण हिंदू लोक अद्यापही कालबाह्य झालेली जातिव्यवस्था मानतात आणि आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत, हे सत्य आहे. त्यातच, नीरद चौधरीसारख्यांनी जातिव्यवस्थेची केलेली भलावण वाचून माझ्यासारख्या जिज्ञासू पण अल्पवुद्धी माणसाला गोंधळल्यासारखे होते.

पुढे वाचा

धर्मांतर-ग्रॅहॅम स्टीन्सची हत्या

सांप्रत धर्मांतर हा आपल्या देशांत, कधी नव्हे तो अतिशय वादग्रस्त विषय बनलेला आहे. ओरिसामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, गुजरातमध्ये अल्पसंख्यक ख्रिस्ती समाजावर आदिवासींकडून झालेले तथाकथित हल्ले, या सर्वांचे मूळ धर्मांतर आहे असे म्हटले जाते. त्यांचे जगभरांत पडसाद उमटले. निरनिराळ्या देशांतील वृत्तपत्रांनी या प्रकरणाला अशी काही प्रसिद्धी दिली की हिंदूधर्माचा सहिष्णुतेचा दावा पोकळ वाटावा. एवढा गदारोळ माजल्यानंतर विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी डांग जिल्ह्याला भेट दिली. डांगमधील ख्रिश्चन आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष किरकोळ असून त्याची विदेशी वृत्तपत्रांनी अतिशयोक्त आणि अतिरंजित वर्णने दिली आहेत असा पंतप्रधानांनी खुलासा केला.

पुढे वाचा

पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण

आजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे.

आपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी हा कर्मसिद्धान्त अबाधित राहतो. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या (संचिताच्या) असंख्य प्रतिबिंबाचा प्रचंड साठा आपण सदैव वागवीत असतो.”

याउलट डॉ. चिंचोळकरांनी सप्टेंबरच्या अंकात तर्कशुद्ध बाजू मांडली. कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतनशक्तीद्वारे कर्मफल उत्पन्न होते व कर्मसिद्धान्त चालतो, असे मानावे लागेल.

पुढे वाचा

मुस्लिम समाज-सुधारकांची परिषद

नोव्हेंबरच्या २० आणि २१ या तारखांना पुणे येथे एस. एन. डी. टी. कॉलेज, कर्वे रोड, पौड फाटा या ठिकाणी एक मुस्लिम महिला परिषद होणार आहे. देशभरातून महिलांना या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तींची राहण्याखाण्याची व्यवस्था परिषदेच्या जागी होईल. ज्यांना प्रवासाचा खर्चही झेपणे अवघड आहे त्यांना दुस-या वर्गाचे रेल्वेचे भाडे मिळेल. ही परिषद ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ या संस्थेच्या वतीने होत आहे. तिचे जनरल सेक्रेटरी श्री. सय्यदभाई, पुणे ह्यांनी आगामी परिषदेचे माहितीपत्रक आमच्याकडे धाडले आहे. या परिषदेत मुस्लिम महिलांच्यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत.

पुढे वाचा

हिंदू-मुस्लिम सहजीवन

‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र आता उलट फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही. ही आठ कोटी माणसे आपण काही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाची मुल्लामौलवींच्या संधीसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.”

पुढे वाचा

कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)

माणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष (१९९९ मॉडेल)

आधी ताज्या वैद्यकीय संशोधनाचा आढावा घेऊ –
(क) स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था (Immune System) पुरुषांच्या तशाच व्यवस्थेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात नियंत्रित असते. शरीरात ‘घुसणाच्या बाहेरच्या जीवाणूंशी स्त्रियांची शरीरे जास्त जोमाने लढतात, तर पुरुषांच्या बाबतीत हा प्रतिसाद (तुलनेने) सौम्य असतो. गर्भारपणात मात्र स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था बरीच मंदावते, पण बाळंतपण होताच ती पुन्हा पूर्ववत होते. प्रतिरक्षेच्या कार्यक्षमतेतील या चढउतारांचा संबंध स्त्रियांना जास्त प्रमाणात सतावणा-या ल्यूपस (Lupus), संधिवात ‘व मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे आजारांशी लावला गेला आहे. या सर्व आजारांमध्ये शरीरांची प्रतिरक्षा-यंत्रणा शरीराच्याच उपांगांशी झगडू लागते!
(ख) सरासरीने पाहता पुरुषांना ज्या वयात हृदयविकाराचा पहिला झटका येतो, त्यापेक्षा स्त्रियांना असे झटके दहा वर्षे उशीराने येतात – पण झटक्याच्या वेळी वयस्क असल्याने स्त्रिया अशा झटक्यांमुळे दगावण्याचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.

पुढे वाचा

सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!

सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.

पुढे वाचा

मराठी भाषेचे चिंताजनक भवितव्य

आजचा सुधारकच्या जून ९९ (१०.३) ह्या अंकामध्ये माझे ‘मराठी भाषाप्रेमींना अनावृत पत्र’ प्रकाशित झाले. त्यावर बरीच उत्तरे आली. त्यांपैकी काही सप्टेंबर ९९ अंकामध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी ऑगस्टअखेरपर्यंत उत्तर लिहून पाठवितो असे आश्वासन दिले होते पण ती उत्तरे सप्टेंबरअखेरपर्यंत, अजून, आलेली नाहीत, आणि आता येण्याची शक्यताही नाही, म्हणून ह्या चर्चेचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय आता संपादक बदलले असल्यामुळे हा विषय लवकर आटोपता घेतलेला बरा.
हस्ताक्षर चांगले काढावे हा विवादाचा विषय नाही – पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत.

पुढे वाचा