प्रा. रेगे आणि ईश्वर

‘कालनिर्णय’ ह्या दिनदर्शिकावर (१९९५, १९९६ आणि १९९८) प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे अनुक्रमे ‘मी आस्तिक का आहे?’, ‘परंपरागत श्रद्धा’ आणि ‘देवाशी भांडण’ हे तीन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या लेखांमधील विषयाशी संबंधित आजचा सुधारक (एप्रिल, १९९१) या मासिकात प्रसिद्ध झालेला ‘विवेकवादाच्या मर्यादा’ हा लेख असे एकूण चार लेख माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ह्या लेखांमधून रेगे सरांची ईश्वरविषयक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झालेली आहे. कोणत्याही श्रद्धाळू व्यक्तीला जेवढ्या स्वच्छ शब्दांत स्वतः स्वीकारीत असलेली भूमिका मांडता आली नसती तेवढ्या स्पष्ट शब्दांत रेगेसरांनी ती मांडलेली आहे.

पुढे वाचा

बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत

या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे.
हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून तो जवळजवळ २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत. इतक्या दीर्घकाळात जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षेत्रात आल्या. त्यात पहिले जागतिक महायुद्ध आणि विज्ञानातील भरीव, लक्षणीय प्रगती या मुख्य घटना.

पुढे वाचा

समाजस्वास्थ्य

‘…. असेच एक विद्वान ‘मन्वंतर’ मासिकात देशभक्तीच्या गोष्टी लिहीत असतात आणि बूटपाटलूण पाहिली की त्यांच्या पायाची तिडीक पुस्तकाला जाते. का ? कारण बूटपाटलूण हा राज्यकर्त्यांचा वेश आहे. पण त्यांच्या एक साधी गोष्ट लक्षात येत नाही, की देशभक्ती वेशावर अवलंबत नाही. हा त्यांचा न्यूनगंड आहे. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की शिवाजीनेही राज्यकर्त्यांचाच वेश उचलला होता, असे त्याच्या चित्रावरून दिसते. तेव्हा राज्यकत्र्याचा वेश घेण्यात त्याला काही कमीपणा वाटत होता असे दिसत नाही. आणि स्वतंत्र राष्ट्रातले लोक देखील परक्या रीतिभाती उचलीत नाहीत असे थोडेच आहे ?

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक यांस,
चीनचा उल्लेख आला म्हणून का होईना, श्री. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी राष्ट्रवादावरील चर्चेत भाग घेतला, याचा आनंद झाला (आ.सु. जाने. ९८). नोव्हेंबरच्या अंकात माझे जे टिपण प्रसिद्ध झाले आहे, त्यातील काही मुद्द्यांवर जाता जाता बरीच शेरेबाजी श्री. गो. पु. देशपांडे यांनी केली आहे, पण त्यांचा प्रमुख आक्षेप आहे, तो अमेरिकी अभ्यासकाचा हवाला देऊन चीनमधील राष्ट्रवादाविषयी लिहिले हा. वास्तविक, गो. पु. देशपांडे यांनीच जर आम्हाला चीनमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला असता तर इंग्रजी लिहिणारया देशांतील राष्ट्रवाद अधिक चांगल्या रीतीने समजावून घेता येईल, हा मुद्दाही काही वाईट नाही.

पुढे वाचा

मागे वळून पाहता

आजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज.
आठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यावेळी आपले सामाजिक जीवन अतिशय असमाधानकारक अवस्थेत आहे असे आमच्या लक्षात आले होते. अनेक दुष्ट रूढी आणि प्रवृत्ती जीवनात अनिबंध्रपणे थैमान घालत होत्या.

पुढे वाचा

कौटुंबिक समारंभातील उपस्थिती

माननीय संपादक
आजचा सुधारक,
आ. सु. मध्ये बर्‍याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु आपले मत सौम्य शब्दांत कळवून, समारंभानंतर यथावकाश संबंधितांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करावी असे उत्तर दिले आहे. या विषयावर मलाही काही सांगावयाचे आहे.

पुढे वाचा

बुद्धिवाद विरुद्ध भावविश्व

आंबेडकरी जीवनमूल्यांचा त्यांच्याच अनुयायांकडून पराभव आणि बुद्धिवाद्यांचा त्यांच्याच प्रकृतीकडून पराजय अशा दोन पराजय-कथा आ. सु. च्या जानेवारी अंकात आल्या आहेत. दोन्ही पराजयांचे कारण एकच आहे. ते म्हणजे बुद्धिवाद या नवीन मूल्यानेजुने सगळे काही एकदम बदलते असा समज.
श्री. भोळे यांनी पहिल्या पराभवाची मीमांसा समर्थपणे आणि विद्वत्तापूर्ण भाषेत केली आहे. त्यांच्या मीमांसेचे सार असे की संस्कृतीचे अनेक पैलू असतात, भाषा त्या सर्व पैलूंची अभिव्यक्ती करत असते, त्या संस्कृतीविरुद्ध बुद्धिवादी बंड पुकारल्याबरोबर ती बहुआयामी भाषा पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
लग्न-मुंज या समारंभाचेही असेच आहे.

पुढे वाचा

जगावेगळं नातं ‘एकत्वाचं’

दूरवर बिहारमधील राजगीर परिसरातील पहाडांच्या पायथ्याशी पिलखी निवासात मिणमिणत्या दिव्यांनी दिवाळी प्रकाशली होती. सारा परिसर आनंदित होता.
प्रत्येक कुटुंब ही एक संस्था असते. तिच्यातील समाधान, प्रेम, जिव्हाळा, सुख, शांती हीच एक शक्ती बनते. त्याच शक्तीतून स्नेहाचा परिघ विस्तारत जातो. आणि मग व्यक्तिगत कुटुंबाचे विश्वकुटुंब बनते. सहजतेने समाजाशी वेगळेच स्नेहपूर्ण नाते जुळते.
असेच घडत गेले! आजपर्यंत… पण आता?माझी मैत्रीण उषा शरण सांगत होती.
‘आयुष्यात कधी-कधी अचानक अशा काही घटना घडतात की ज्यांचा अर्थ लावणं मानवी शक्तीच्या आवाक्यातलं राहत नाही.’
बिहारचे मेजर शरण व नागपूरची उषा मोहनी एकत्र का आले व आज अचानक का दुरावले, ह्याला उत्तर नाही.

पुढे वाचा

भारतीयांचे सामाजिक चिंतन

प्रस्तुत लघुलेख हा एका वैयक्तिक(?) जिज्ञासेची प्रकट मांडणी करण्यासाठी लिहीत आहे. ‘वैयक्तिक’ पुढे प्रश्नचिन्ह अशासाठी टाकले आहे की आजच्या बर्याचच विचारंवतांच्या मानसांतही कुठेतरी ही जिज्ञासा सुप्त स्वरूपात वास करत असावी अशी लेखकाची समजूत आहे. तसे असल्यास(च) या प्रकटीकरणाला थोडाफार अर्थ येईल.अन्यथा लेखकाने आपला वैयक्तिक शोध वैयक्तिकपणेच चालू ठेवणे इष्ट.
अशाच दुसऱ्या एका गोष्टीचाही खुलासा सुरुवातीलाच करणे आवश्यक आहे. ती म्हणजे प्रस्तुत लेख एका प्रामाणिक (genuine) वैचारिक जिज्ञासेपोटी लिहिला आहे. त्यामागील अज्ञानाचे कुणी वाभाडे काढले किंवा त्याची कीव केली तर त्यात वावगे काहीच ठरणार नाही कारण ती वस्तुस्थिती आहे.

पुढे वाचा

डॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार

‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.
‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’.

पुढे वाचा