चर्चा

संपादक, आजचा सुधारक
ऑक्टोबर ९७ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. विवेक गोखले ह्यांचा ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ हा लेख वाचला. या लेखातील जगात अशिव असले तरी ते ईश्वराचे अस्तित्व असिद्ध करण्यापेक्षा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारेच वाटते’ ह्या विधानाविषयी थोडेसे.
हा युक्तिवाद भासतो तसा नवा नाही. ‘देव करतो ते भल्यासाठीच’हाच त्याचा अर्थ. (Euphemism for a cliche.)
माझे एक अतिशय विद्वान मित्र श्री. धनेश पटेल यांनीदेखील ‘शिव’ हा शब्द ‘शंकर’ आणि ‘मंगल’ ह्या दोन्ही अर्थांनी वापरून दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवाद कसा संपुष्टात आला याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे वाचा

मानवी शरीर – एक यंत्र वा त्याहून अधिक?

अलीकडे पर्यायी वैद्यकाचा अथवा पारंपारिक उपचार पद्धतींचा बराच गवगवा होऊ लागला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. मॉल्यिक्यूलर बायॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो-इंजिनियरिंग ही विज्ञानाची नवी दालने विकसित झाल्यामुळे, लुई पास्टरचे जंतुशास्त्र आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने पाया घातलेले जंतुविरोधक (antibiotics) औषधशास्त्र यापुढे आधुनिक वैद्यकाने फार मोठा पल्ला गाठला आहे. गुणसूत्रे व जीन्स, नैसर्गिक प्रतिकारसंस्था (immuno-system); रोगनिदानासाठी विविध प्रकारची साधने व पद्धती, उदाहरणार्थ क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, कॅटस्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, पॉइस्ट्रान इमिशन टोमोग्राफी इत्यादी, तसेच लेसर किरणांचा वाढता वापर या सर्वांमुळे मानवी शरीराच्या रोगांची व बिघाडाची कारणे शोधणे सहजसुलभ झाले आहे.

पुढे वाचा

स्पार्टाची लोकशाही

ग्रीस हा देश अनेक बेटांचा, उंच डोंगर व खोल दन्यांचा आहे. ह्या देशाला वेडावाकडा समुद्रकिनारा आहे. परिणामी जरी ग्रीक स्वत:ला “एकच विशिष्ट जमात’ असे मानत असले तरी सगळ्या ग्रीसला एकाच राजवटीच्या अंमलाखाली आणणे कुणाला जमले नाही. ख्रिस्तपूर्व ५०० सनाच्या सुमाराला ग्रीसमध्ये फक्त एकाच शहराचा देश (city state) असे ३०० देश स्थापन झालेले होते.
ह्या सर्व देशांत स्पार्टा (Sparta) व अथेन्स (Athens) हे सर्वांत प्रसिद्ध आहेत. त्यांत स्पार्टा ह्या देशाचे पायदळ (land force) सगळ्या राष्ट्रांत बलाढ्य होते. स्पार्टा हे अक्षरशः लष्करी राष्ट्र होते.

पुढे वाचा

विश्वाची उत्पत्ती

विश्वाच्या (ब्रह्मांडाच्या) स्वरूपाविषयी डॉ. र.वि. पंडित यांनी (आ.सु. ८.७; २०७-२०८) बरेच प्रश्न विचारले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी हा लेख.
प्राचीन मते :
विश्वाच्या पसाच्याबद्दल, त्याच्या उत्पत्तीविषयी धर्मग्रंथात आणि तत्त्वचिंतकांमध्ये विविध मते होती. मनुष्याची दृष्टी मर्यादित असल्यामुळे दृष्टीस पडलेल्या घटनांच्या आधारावर प्रतिपादन केलेली विचारसरणी संकुचित स्वरूपाची नसती तरच नवल. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांत विश्वाची आणि सर्व सृष्टीची परमेश्वराने कशी आणि केव्हा निर्मिती केली आहे याचा तपशील दिला आहे. दुसऱ्याण बाजूने साध्या डोळ्यांना विशाल गगनांत ग्रहांच्या गतीव्यतिरिक्त इतर कोणतेही बदल दिसत नसल्यामुळे आणि तारे अतिशय दूर असले तरी किती अंतरावर आहेत याचे ज्ञान नसल्याकारणाने हे विश्व अनंत आहे, अफाट आहे अशी कल्पना प्रसृत झाली.

पुढे वाचा

विवाहाचा रोग

विवाह हा समाजाला जडलेला एक रोग आहे, आणि त्याच्या परिणामी उत्पन्न होणारी विवाहसंस्था ही जुलमी राज्यकारभाराला पोषक होते हे माहीत असूनही राजकीय जुलमाविरुद्ध झगडणारे लोक तिकडे लक्ष देत नाहीत. राजकीय जुलमाच्या ज्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व बीजरूपाने कुटुंबसंस्थेत आढळतात.
अनियंत्रित सत्ता, सत्ताधान्याची प्रचंड शक्ती, शिक्षणाच्या व न्यायाच्या सबबीवर केलेले कायदे आणि शिक्षा, मृत्युदंडाचा अधिकार, इतकेच काय पण कर घेण्याची योजना, या सर्वांचे मूळ कुटुंबसंस्थेत सापडते, आणि झोटिंगशाहीत राहण्याचे शिक्षण प्रथम कुटुंबात मिळते, आणि सर्व प्रकारचा जुलूम विवाहसंस्थेत पाहायला मिळतो. तनुविक्रय, मर्जीविरुद्ध समागम, या गोष्टींमुळे वेश्यावृत्ति मात्र वाईट समजतात, आणि याच गोष्टी विवाहात असूनही त्या मात्र कायदेशीर, इतकेच नव्हे तर पवित्र समजायच्या!

पुढे वाचा

ग्रंथ-परीक्षण

नववसाहतवाद आणि आधुनिक भारत, लेखक : डॉ. गोपाळ राणे, प्रकाशक : कालिंदी राणे, गोरेगाव, मुंबई-६२, प्रकाशनाचे वर्ष : १९९५, पृष्ठसंख्या : २९७, किंमत रु. २५०
मराठी अर्थशास्त्र-परिषदेचे ‘उत्कृष्ट-पुस्तक’ पारितोषिक प्रा. राणे यांच्या ‘नववसाहतवाद आणि आधुनिक भारत’ या ग्रंथाला १९९५-९६ या वर्षासाठी बहाल करण्यात आले. हे एक सरळ-सोप्या भाषेत लिहिलेले, भरपूर माहिती देणारे, असे वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. आधीच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये ह्या दृष्टीने इतिहासाचा अभ्यास केला जातो. भारताच्या आर्थिक इतिहासात मात्र १६०९ पासून इंग्रजांच्या आर्थिक धोरणातले धोके वेळीच लक्षात न घेतल्यामुळे त्याच त्याच चुका झाल्याचे, अजूनही होत असल्याचे प्रा.

पुढे वाचा

प्राथमिक उर्दू शाळामधील मुलींचे शिक्षण

समाजातील स्त्री शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करावा आणि अभ्यास करता करताच काही कृती कार्यक्रम घ्यावे या उद्देशाने आम्ही मुलींच्या शिक्षणासंबंधी काम सुरू केले. भारतीय शिक्षणसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुलींच्या शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन उर्दू प्राथमिक शाळा निवडल्या. त्यात एक सरकारी आणि एक खाजगी शाळा निवडावी असे आम्हीठरवले होते. मात्र खाजगी शाळेने शाळा अभ्यासासाठी घ्यायला परवानगी नाकारली.. मात्र एक गोष्ट याबाबतीत विशेष वाटली ती म्हणजे या खाजगी शाळेच्या संस्था चालकांपैकी सर्वच सदस्याचे मत परवानगी नाकारण्याचे नव्हते. काही सदस्यांना वाटत होते की, या शाळेत बाहेरच्या काही सामाजिक आणि शिक्षणात संशोधन करणार्या.

पुढे वाचा

माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश?

काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला अॅडमिशन?
(पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि हॉस्टेलमध्ये पण मिळाली.
छान, रूम पार्टनर कोण मिळाली आहे? चांगली आहे ना?
आहे बाई कुणीतरी मराठी मीडियमची, नाव पण अजून विचारलं नाही.
म्हणजे?
अग, होस्टेलप्रवेश मिळालेल्या मुलींमध्ये तीन मुली सोडून सगळ्या माझ्यासारख्या इंग्लिश मीडियमच्याच आहेत. त्या तिघींना कुणी पार्टनर म्हणून घेईना. मग रेक्टरनी त्यांतल्या दोघींना एक खोलीत टाकलं. तिसरीचं काय करायचं?मला दयाआली आणि मी तिला रूम पार्टनर म्हणून घ्यायला कबूल झाले झालं!
हा चुटका पुष्कळ वर्षांपूर्वी भाषा आणि जीवन मध्ये वाचला होता.

पुढे वाचा

ब्रेन-ड्रेन – दुसरी बाजू

संपादक आजचा सुधारक, नागपूर.
स.न.वि.वि.
ऑक्टोबर महिन्याचा आजचा सुधारक वाचला. या अंकातील पान २१८ वरील ‘कावळे आणि कोकिळा’ हा सुभाष म, आठले, कोल्हापूर, यांचा लेख छापून आपण आपल्या मासिकास खालच्या दर्जावर उतरविले आहे. कोणतीही आकडेवारी किंवा संशोधन याचा आधार न घेता, प्रस्तुत लेखकाने अतिशय बेजबाबदार विधाने केलेली आहेत. उपमेचा आधार घेऊनही लेखकाला नेमक्या सामाजिक वैगुण्यावर बोट ठेवणे जमलेले नाही. एखाद्या ‘मिसफिट’ ठरलेल्या व्यक्तीवरून जर लेखकाचा मानसिक उद्रेक बाहेर पडलेला असेल तर त्या ‘मिसफिट्’ केसबद्दल विस्तृत माहिती उदाहरणादाखल त्याने द्यावयास हवी होती.‘कुतरओढ’

पुढे वाचा

माध्यमिक शिक्षणाची सुधारणा

भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) या क्षेत्रांत, जगातील सर्वाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे असा दावा वारंवार करण्यात येतो. त्याचप्रमाणे इंग्रजी लेखन-वाचनास सक्षम अशा सुशिक्षितांची संख्याही, जगातील २-३ इंग्रजी-भाषिक राष्ट्रे वगळता, भारतात सर्वाधिक आहे असेही सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात हे दावे सयुक्तिक नाहीत असेच जाणवते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये होणारी प्रचंड कत्तल व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषा, गणित आणि विज्ञान या प्रमुख विषयांबरोबरच इतिहास, भूगोल यांसारख्या मानव्यविद्येतील प्रकांड अज्ञान व अनास्था पाहिली म्हणजे चिंता वाटू लागते. कोणत्याही भाषेत शेदोनशे शब्दांचे मुद्देसूद लेखन आमच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना येत नाही, तसेच त्यांची आपल्याच देशाची इतिहास-भूगोलविषयक जाण नगण्य असल्याचे आढळते.

पुढे वाचा