संपादक, नवा सुधारक यांस
स. न. वि.वि
‘नवा सुधारक’ (जून) मिळाला.
तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे.
“पुरुष हा बहुस्त्रीक (पॉलीगामस्) आहे व प्रकृतितः स्त्री तशी नाही ” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे का? की त्यात पितृसत्ताक कुटुंबनीतीचेच दर्शन आहे? स्त्री पुरुषांतील प्रीती आणि त्या प्रीतीतील ‘एकनिष्ठा’ सहजात आहे की ‘अक्वायर्ड’ आणि ‘एन्व्हायरनमेंटल’ आहे ?