सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात मतभिन्नता

समूहाच्या मताच्या विरुद्ध जाऊन आपला आवाज व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहेच. पण याबद्दलचे मानसशास्त्रीय अभ्यास काय सांगतात? सामाजिक मानसशास्त्रातील एका प्रसिद्ध प्रयोगाची तोंडओळख करून देणारा हा लेख
——————————————————————————–

ओळख
’dissent’ या इंग्रजी शब्दामध्ये फक्त वेगळे मत किंवा विचार एवढेच अपेक्षित नाही, तर ही मतभिन्नता सर्वसाधारण किंवा अधिकृत मतापेक्षा वेगळे मत असलेली आहे. हा ’वेगळा आवाज’ बहुमतापेक्षा वेगळा किंवा अल्पमतातील आवाज आहे. “To dissent is democracy” असे म्हटले जाते ते या संदर्भातच. बहुमतापेक्षा वेगळे मत असणे, ते मांडता येणे आणि ते मांडण्यासाठी जागा असणे म्हणजे लोकशाही जागृत असण्याचे लक्षण आहे.

पुढे वाचा

उंबरीच्या लीला

इंटरनेट आणि विशेषतः मराठी संकेतस्थळांवर सहिष्णुता नांदते आहे का? या प्रश्नाचा या जगाशी चांगला परिचय असणाऱ्या एकीने घेतलेला हा शोध. लेखिका ’ऎसी अक्षरे’ या संकेतस्थळाच्या एक संपादक आहेत.
——————————————————————————–

‘युनेस्को’ने भावना दुखावणं हा रोग जगातला सगळ्यात भयंकर रोग असल्याचं जाहीर केलं आहे; अशी पोस्ट फेसबुकवर दिसण्याची मी रोज वाट बघते.

थोडा श्रॉडिंजरी विचार करायचा तर – (श्रॉडिंजरचा सिद्धांत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात — श्रॉडिंजरी विचार म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ पण त्यात दोन्ही अश्वत्थामे जिवंत आहेत किंवा दोन्ही जिवंत नाहीत.) एक बाजू ही की, चहाटळ लोकही अशी पोस्ट लिहिणार नाहीत.

पुढे वाचा

राष्ट्रवादाच्या तीरावर

राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आणि त्यांच्या प्रासंगिकतेचा एका संवेदनशील मनाच्या लेखकाने आपल्या स्वतःच्या बुद्धी, अनुभव आणि आकलनाच्या कक्षेत घेतलेला शोध.
——————————————————————————–
हा एक जुना प्रसंग आहे. २००५-०६ मधला. मध्य प्रदेशात बडवानीमध्ये ’नर्मदा बचाओ आंदोलना’चं ऑफिस आहे. मी मेधाताईंना प्रथम पाहिलं ते या छोट्याशा ऑफिसमध्ये. माझ्या या पहिल्या भेटीच्या वेळी पुण्यातून माझ्याबरोबर असीम सरोदे आणि शिल्पा बल्लाळ हे दोघेजणही होते. त्या दिवशी बडवानीमध्ये एक मोठी सभा होती. पुष्कळ लोक होते. स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. डोक्यावरून लाल-हिरव्या रंगाचे पदर घेतलेल्या स्त्रिया घोळक्याने बसल्या होत्या.

पुढे वाचा

चौफुलीवर उभे राष्ट्र

हिंदुत्ववादी विचारसरणी आणि हिंदूराष्ट्रवाद या कायम चर्चेत राहिलेल्या विषयावर हा नव्याने टाकलेला प्रकाशझोत.
——————————————————————————–
‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण –अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)

वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आजबर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते. पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न विचारसरणीचा पक्ष स्वबळावर संपूर्ण बहूमतासह केंद्रात सत्तेवर आहे. आज चौदा राज्यांमध्येभाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्तेत आहे.

पुढे वाचा

उजवा प्रतिक्रिया वाद की स्व-अस्तित्वाची लढाई?

मे २०१४ मधील सत्तांतरानंतर सार्वजनिक चर्चाविश्वात जोमाने सुरू झालेल्या सहिष्णुता-असहिष्णुता, पुरोगामी-प्रतिगामी या वादांच्या पार्श्वभूमीवर डाव्या ’लिबरल्स’चं परखड मूल्यमापन करणारा लेख.
——————————————————————————–
‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्‍या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्‍याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. त्यांनी स्वत:चे असे विचारविश्व तयार केले आहे व ते त्यांच्या दृष्टीने स्वयंघोषित सत्य असते.

पुढे वाचा

सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

मुलाखत : श्राबोंती बागची
——————————————————————————–
रामचंद्र गुहा यांची ’सोशल मीडिया’ या विषयाला धरून घेतलेली मे २०१६ मध्ये factordaily.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली मुलाखत सोशल मीडियाआणि विचारभिन्नता या विषयासंदर्भात महत्त्वाची आहे. मूळ इंग्रजीमधील मुलाखतीचा हा संपादित अनुवाद.
——————————————————————————–

प्रश्नइतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का?

उत्तर- सोशल मीडियावरील भारतीय तरुण इतिहासाकडे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे राजकारण असल्यासारखे बघत आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर यासाठी सर्वप्रथम काँग्रेस दोषी आहे कारण राजीव-सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसने आधुनिक भारतीय इतिहासाचे जे चित्र उभे केले आहे त्यातील महात्मा गांधी वगळता इतर सर्व महनीय व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत.

पुढे वाचा

भाबडी परिभाषा

‘जिथून सुरू होतं दुसऱ्याचं नाक
तिथेच माझ्या स्वातंत्र्याचा अंत होतो’

अशा तऱ्हेने स्वातंत्र्याला परिभाषित करताना
स्त्रियांचा विसर पडला
की
त्यांच्यापाशी नाकाहून अधिक
उन्नत जे काही आहे
त्याला तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यात सामील करून घेतलं?

अनुभव: एच आय व्ही पॉझिटिव्ह

एच आय व्ही
———————————————————————————–
तशी कुणाची काहीच चूक नसता अचानक छोटासा अपघात होतो आणि त्याची शिक्षा एवढी मोठी! आयुष्यभर दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या ‘ति’ला एच आय व्ही ची लागण होते आणि आयुष्य पार बदलून जातं. ही गोष्ट आहे तिच्या झुंजीची, तिच्या जिवलग मैत्रिणीने सांगितलेली…
————————————————————————————

‘क्ष’ गेल्याची बातमी आठवडाभरापूर्वी आली तेव्हा मी डेडलाईनमध्ये होते. गोव्याहून आलेला फोन म्हणून पटकन उचलला, वाटलं आजी पलीकडून म्हणेल, “पाऊस झडोमडोन् लागलाय…मंम्बय्यचं काय?”… कान ठार गेले आहेत म्हणते, तरीही हिच्या कानात पावसाची सर कशी वाजते,कुणास ठाऊक..मनात हे पावसाचं असलं असताना ती बातमी मिळाली.

पुढे वाचा

‘सैराट’च्या निमित्ताने

‘सैराट’ चित्रपटाने इतिहास घडविला. त्याच्या लोकप्रियतेचे व वेगळेपणाचे विश्लेषण अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून केले. त्या निमित्ताने एका तरुण कार्यकर्त्याने व्यक्ती किंवा समूहाला एखादी गोष्ट का आवडते ह्या प्रश्नाचा घेतलेला हा वेध.
————————————————————————————

देख रे शिंदे,

     उपर चाँद का टुकडा

     गालिब की गज़ल सताती है

     बेकार जिंदगी ने इसल्या को निकम्मा कर दिया,

     वरना इसल्या भी आदमी था,

     इश्कके काम आता!

– नारायण सुर्वे

* * * *

“सैराट पाहिला का रे?”

पुढे वाचा

साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग २)

देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
—————————————————————–
अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा ऐकतात. महामानव आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास लाखोंनी येतात. त्याचबरोबर विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, राजयोग सेंटर, योगातील ध्यानधारणा; कपालभाती, भस्रिका यांच्यासारखे प्राणायाम करतात. ओशो रजनीशांच्या आश्रमात (नंगा) नाच करतात.

पुढे वाचा