विषय «विवेकवाद»

देवाची भीती काढून घेतली तर काय होईल?

मी नास्तिक आहे. सध्याचे प्रचलित धर्म जे शिकवतात तसा कुठलाही ईश्वर/अल्ला/प्रभू अस्तित्वात नाही, तसेच स्वर्ग-नरक अस्तित्वात नाही असंच माझं मत आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पनेतून मांडलेल्या पाप-पुण्याच्या थोतांडावर माझ्यासह हजारो नास्तिकांचा विश्वास नाही. पण प्रश्न इथेच संपत नाही. 

माझ्या सभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी श्रद्धा ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे. अशा भोळ्याभाबड्या लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं.

पुढे वाचा

स्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत

एका गोष्टीत अकबर एकदा बिरबलाला विचारतो की आपल्याला सर्वांत प्रिय काय असते. उत्तरादाखल बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासोबत एका रिकाम्या हौदात उतरवतो व हौदातील पाण्याची पातळी वाढवणे सुरू करतो. सुरुवातीला पिल्लाला वाचवायचे म्हणून माकडीण त्याला आपल्या डोक्यावर घेते. पण पुढे जेव्हा तिच्या जीवावर बेतते, तेव्हा ती सरळ पिल्लाला खाली टाकून त्याच्यावर चढून स्वत:चा जीव वाचवू पहाते.

गोष्टींवरून व उदाहरणांवरून स्वार्थासारख्या गुंतागुंतीच्या विषयाची काही अंगे कळली व कदाचित पटली जरी, तरी काही वेगळ्या परिस्थितींमधे इतर अनेक पैलू समोर येऊ शकतात. पृथ्वीतलावरील सर्वांत स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे.

पुढे वाचा

कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती

आतापर्यंत कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती, सर्व नागरिकांच्या लक्षात आलेली असणार. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधी भरभरून लिहिले गेले आहे. त्यामुळे, कोरोना महामारी, त्याने बाधित असलेल्यांचे आकडे, त्याची लक्षणे, त्याचे आरोग्यावर, समाजव्यवस्थेवर, अर्थकारणावर, राजकारणावर होणारे परिणाम, तसेच या आजारापासून आपला बचाव कसा करायचा, असे सर्व व या अनुषंगाने अनुलग्न इतर सर्व बाबी सविस्तरपणे चर्चिल्या गेल्या आहेत. सबब, त्या तपशीलात मी जाणार नाही. पण, हे सर्व डोळ्यांसमोर आणले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, संपूर्ण प्रशासन यंत्रणा, मग ते प्रशासकीय अधिकारी असोत, राज्यकर्ते असोत, आरोग्यसेवा देणारे, कायदा-सुव्यवस्था राखणारे, स्वच्छताकर्मचारी इत्यादी असोत, सर्वच आपापल्या ताकतीने ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न

आम्हां नास्तिक मित्रांचा एक छोटासा गट आहे. या गटात चर्चा करताना, आम्ही काही महत्त्वाचे नियम पाळतो ते असे. चर्चेचा विषय ठरल्यावर विषयबाह्य लिहायचे नाही, चर्चा करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. ‘मला माहीत नाही’, असे उत्तर दिले तरी चालते पण ते द्यायचे. अशा नियमबद्ध चर्चेचा प्रत्येकाला चांगला फायदा होतो. एक तर प्रश्नांच्या खाचाखोचा कळतात. आणि दुसरे म्हणजे आपल्या गैरसमजुती दूर होतात.

तर या गटात भरतने रसेलच्या एका निबंधाकडे आमचे लक्ष वेधले. हा निबंध ‘तत्त्वज्ञानातील कूट प्रश्न’ (problems of philosophy) या रसेलच्या पुस्तकात आला आहे.

पुढे वाचा

श्रद्धेची बेडी तोडावी

माणसाने बुद्धिप्रामाण्यवादी असावे. सत्य काय, असत्य काय ते स्वबुद्धीने विचार करून जाणावे. सत्याचा स्वीकार करावा. असत्याचा त्याग करावा. हे कोणत्याही बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असते.

जगन्निर्माता, जगन्नियंता, पूजा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव आहे असे बहुसंख्य आस्तिक माणसे मानतात. खरेतर असा देव अस्तित्वात नाही हे सहज समजते. कारण वर वर्णन केलेल्या दैवी गुणांचा कोणालाही, कधीही प्रत्यय आलेला नाही, येत नाही. तसेच अमर आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मोक्ष अश्या संकल्पना सत्य आहेत असेही अनेक जण मानतात. वस्तुत: या सर्व गोष्टी खोट्या, काल्पनिक आहेत.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य काय असू शकते याचा विचार करताना आपल्याला चार गोष्टींचा विचार करावा लागतो: बुद्धी, प्रामाण्य, आस्तिक्य; आणि या तीनही गोष्टींना पायाभूत असणारी चौथी संकल्पना, म्हणजे ज्ञान.

यांपैकी आस्तिक्य आपण तात्पुरते बाजूला ठेवू आणि उरलेल्या तीन गोष्टींचा प्रथमतः अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. या तीन संकल्पनांचा परामर्श घेणारे शास्त्र म्हणजे ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणशास्त्र. याचा भारतीय दर्शनांच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ ते सर्व ज्ञान. आता यात ‘इंद्रिये’ आणि ‘समजणे’ हासुद्धा मानसप्रक्रियेचाच भाग झाला.

*१. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, स्वाद, गंध यांचा अनुभव देणारी पाच ज्ञानेंद्रिये.

पुढे वाचा

भावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज

‘भारतीय दंड विधाना’च्या (Indian Penal Code) कलम 295A नुसार, ‘मुद्दामहून धार्मिक भावना दुखविण्यासाठी कोणत्याही गटाच्या धर्मश्रद्धेचा अपमान करणे’ हा गुन्हा आहे. तसेच, कलम 298 नुसार, ‘मुद्दामहून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अभिव्यक्त होणे’ हा गुन्हा आहे. देवाचा अपमान करणार्‍या कृतीमुळे/वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या जाऊ शकतात, त्यामुळे ह्या कलमांना ईशनिंदा-बंदी (anti-blasphemy laws) असेही म्हणतात. ही कलमे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध कशी आहेत ते पाहू.

कोणताही (एक किंवा अधिक) धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा किंवा सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचा मूलभूत हक्क सर्वांना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 अन्वये मिळाला आहे.

पुढे वाचा

रॅशनल जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता

‘ब्राईट’ (ठाणे)चे श्री. कुमार नागे यांचेकडून मला मोबाईलवर आलेल्या एका मेजेसमध्ये, ‘आजचा सुधारक’ला  बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य (नास्तिकता) ह्या विषयावर एक विषेशांक काढण्याचा मानस आहे असे व त्या अंकाची मध्यवर्ती कल्पना ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा मानवास हितकारक आहे’ ही असेल असे लिहिले होते. त्यासाठी लिहिलेल्या या लेखात आधी आपण ‘बुद्धी’ व ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ म्हणजे काय ते पाहू. नंतर तो बुद्धिप्रामाण्यवाद मानवाला कसा हितकारक आहे ते समजून घेऊ व त्यानंतर अखेरीस त्याचा नास्तिकतेशी काय संबंध आहे ते पाहू.

बुद्धीचा अर्थ ‘ज्ञानशक्ति’ म्हणजे ‘मानवी मेंदूची योग्य तर्क करण्याची क्षमता किंवा विवेकी विचार करण्याची क्षमता’ होय.

पुढे वाचा

राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता

निरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.

पुढे वाचा