Category «विवेकवाद»

पुरुष: एक वाट चुकलेला मित्र

स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?”
हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही.

पुढे वाचा

मन केले ग्वाही: (भाग दोन) प्रजा अडाणीच ठेवावी!

भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे बहुतेक नेते उच्चशिक्षित होते. बरेचसे बॅरिस्टर होते. इतर बरेच मानव्यविद्यांचे विद्यार्थी होते. यामुळे सुरुवातीची मंत्रीमंडळेही बहुतांशी उच्चशिक्षित असत. कायदा-मानव्यविद्यांसोबत त्यांत काही डॉक्टर -इंजिनीयरही असत. हे स्वाभाविक होते कारण चळवळींचे नेते लढाऊ असावे लागतात, तर मंत्री व्यवहारी आणि नियोजनाचा विचार करणारे असावे लागतात.
पहिली चाळीस-पन्नास वर्षे मंत्रिमंडळे अशी वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांमधून निवडली जात. अगदी सुरुवातीला तर हे फारच आवश्यक होते, कारण तुटपुंज्या संसाधनांमधून नवे, महाकाय राष्ट्र उभारायचे होते, आणि यासाठी योद्ध्यांऐवजी तंत्रज्ञ जास्त आवश्यक होते. त्याहीपेक्षा आवश्यक होते शिक्षक, जे चांगले, तंत्र जाणणारे नागरिक घडवू शकतील.

पुढे वाचा

अतीत व विवेकवाद

फेब्रुवारी ९४च्या दि. १९ व २० या दोन दिवशी सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने आयोजित केलेले पहिले विचारवेध संमेलन भरले होते. विषय होता। ‘धर्म आणि संमेलनाचे अध्यक्ष होते प्रा. मे. पुं. रेगे. आपल्या प्रदीर्घ छापील अध्यक्षीय भाषणात प्रा. रेग्यांनी ज्याला ते ‘अतीत’ हे नाव देतात त्यावर एक अतिशय प्रभावी निबंध सादर केला. प्रा. रेग्यांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि त्यावरील अधिकार हे दोन्ही अव्वल दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांनी धर्माच्या वतीने दिलेल्या समर्थनाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्याविषयी मतभेद नोंदवणे ही धाडसाची गोष्ट आहे.

पुढे वाचा

प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा

सातार्‍याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.
विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विचारसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.
धार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा
इंद्रियांना प्रतीत होणार्‍या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – २०

नीतीचा आणखी थोडा विचार
या लेखमालेत नीतीचा विचार अनेक लेखांकांत आला आहे. विवेकवाद – ९, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (जाने. ९१), विवेकवाद -१२ व १३, ‘उपयोगितावाद, १ व २’ (मे, जून १९९१), विवेकवाद – १८, नैतिक मूल्यांविषयी
आणखी थोडेसे (डिसेंबर ९१)- हे ते लेखांक.
या लेखांकांत जे विवेचन आले आहे त्याच्याविषयी अनेक वाचकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे नीतीच्या काही कल्पनांचे थोडे विस्ताराने विवेचन झाल्यास बरे होईल असे वाटते.
विवेकवादाचे विवेचन करताना विवेकाचे कार्य ज्ञान आणि कर्म या दोन क्षेत्रांत काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागला.

पुढे वाचा