दिवाकर मोहनी - लेख सूची

जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त

जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता …

जातिभेद आणि निवडणूक

आपल्या देशातील सार्वत्रिक निवडणुका अगदी तोंडाशी आल्या आहेत. त्या निमित्ताने प्रचार- अपप्रचार मतमतांतरे, बदनामीची चिखलफेक व त्यावरील प्रत्युत्तरे ह्या साऱ्याला ऊत आला आहे. पैशाची उधळमाधळ किती होते ह्याची तर गणतीच नाही. अमर्याद सत्ताकांक्षा व आपपरभाव ह्यांनी तर स्वच्छ व मोकळ्या वातावरणातील निवडणुका हे ध्येय असंभव करून टाकले आहे. राष्ट्र ही कृत्रिम संकल्पना आहे खरी, परंतु …

पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)

ग्रामोद्योग व चंगळवाद अंदाजे गेल्या 200 वर्षांपासून उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाच्या पद्धतीत विलक्षण फरक पडला आहे. आणि तो फरक यूरोपातून इकडे आला आहे. आपल्या भारतीय पद्धतीत, गरज पडल्यानंतर ती निर्मिती करायची अशी पद्धत होती आणि अजून आहे. शेतीला लागणारी अवजारे, गावातले सुतार व लोहार लोकांच्या मागणीवरून तयार करीत. घरे बांधण्याचे कामसुद्धा गरजेपुरती होत असे. वस्तू आधी …

पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)

वैयक्तिक श्रीमंती आणि सार्वजनिक श्रीमंती यांतील फरक आतार्पत समजला असेलच. सार्वजनिक श्रीमंती कशी निर्माण करायची व वाढवत न्यायची, हे आम्हा भारतीयांना अजूनपर्यंत कळलेले नाही. त्यामुळे आमच्या देशात इतक्या समस्या (सामाजिक, आर्थिक) निर्माण झाल्या आहेत. सध्या भ्रष्टाचाराच्या अनेक घटना एकामागे एक उघडकीस येत आहेत आणि त्यांच्या खमंग चर्चा करण्यातच देशवासीयांच्या बहुमोल वेळाचा अपव्यय होत आहे. आपल्या …

पैशाने श्रीमंती येते का?

जगातल्या अनेक देशांपैकी भ्रष्टाचार ज्या देशांमध्ये अधिक आहे त्यांपैकी आपला एक देश आहे.जे भ्रष्टाचार करतात ते स्वतः श्रीमंत व्हावे म्हणन करतात. भ्रष्टाचाराने श्रीमंती आली नसती किंवा आपल्याला श्रीमंती येते असे वाटले नसते तर भ्रष्टाचार कोणी केला असता काय? श्रीमंती दोन प्रकारची असते; पहिली असते वैयक्तिक श्रीमंती आणि दुसरी असते सार्वजनिक श्रीमंती. वैयक्तिक श्रीमंती म्हणजे धन, …

कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीवर उपाय

मी ह्या विषयातला तज्ज्ञ नाही; फक्त माझ्या मनात विचार, त्यावर चर्चा सुरू व्हावी ह्यासाठी, पुढे मांडत आहे. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील कोरडवाहू शेतकरी आज मरणासन्न स्थितीत आहे. त्याच्या करुण अवस्थेची वर्णने सर्वत्र वाचायला मिळतात. त्यातल्या त्यात कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालांना तर सीमाच नाही, त्यांचे हाल कुत्रादेखील खात नाही. त्यांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन करण्याची गरज नाही. पन्नास …

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (२)

औद्योगिक क्रान्तीमुळे पडलेला फरक — अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. तिची बीजे मात्र त्यापूर्वी अंदाजे 500 वर्षे आधी पडली. गतानुगतिक विचारांतून इंग्लंडचे लोक बाहेर पडू लागले. ह्याचा पहिला पुरावा मॅग्ना कार्टा च्या स्वरूपात दिसतो. इंग्लंडच्या सरदारांनी मिळून राजाचे अधिकार सीमित केले, ह्याचा तो दस्तावेज आहे. आणखी काही वर्षांनी इंग्लंडने पोपचे वर्चस्व झुगारून दिले. ह्या …

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (१)

कोणत्याही वस्तूला. मूल्य येते. ते तिला असलेल्या मागणीमुळे. ज्या वस्तूला मागणी नाही, तिला किंमत नाही. ही मागणी एकतर गरजेपोटी किंवा हावेपोटी असते. गरज लवकर पुरी होते आणि हाव कधीच संपत नाही. ज्या वस्तूची गरज लवकर संपेल, तिला किंमत असली तरी ती अत्यल्प असते. उदाहरणार्थ, तर अन्न! ….. सोन्याला व रजांना जी किंमत असते ती त्यांच्याविषयी …

बोलीभाषा व प्रमाणभाषा

बोलीभाषा व प्रमाणभाषा ह्यांचे एकमेकींशी नाते समजून घेण्याच्या आधी आपण त्यांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. बोलीभाषा ही बहुधा न लिहिली गेलेली भाषा असते. तिचे क्षेत्र मर्यादित असते. तिचे स्वरूप दर दहा कोसांवर बदलू शकते; इतकेच नव्हे तर एका प्रदेशात राहणाऱ्या निरनिराळ्या जातींची बोली विभिन्न असू शकते. ठाणे जिल्ह्यात धोडी, वारली, कातकरी अश्या निरनिराळ्या आदिवासी …

अभिप्राय : लिहावे नेटके

माधुरी पुरंदरे ह्यांचे नाव वाचू आनंदे ह्या अद्वितीय पुस्तकाच्या कर्त्या म्हणून आपणाला माहीत आहे. आता लिहावे नेटके हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. वाचनामध्ये गोडी निर्माण झाली की लेखनाला सुरुवात करावी आणि त्यामध्ये सर्वांनी प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची इच्छा त्यांच्या ह्या उपक्रमांतून आपणाला दिसून येते. त्या नुसती इच्छा मनात बाळगून स्वस्थ बसल्या नाहीत तर ते …

मराठीच्या प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना विदर्भ साहित्य संघात ‘शुद्धलेखनाचे सुलभीकरण’ ह्या विषयावर घडलेल्या चर्चासत्रात वाचलेला निबंध

( या निबंधाचे लेखन शासनमान्य नियमांनुसार केले आहे. कारण शासनाचे नियम वापरणे बंधनकारक (mandatory) आहे.) मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते. म्हणजे त्यांचा परिघ वाढत जातो; त्याचप्रमाणे त्या विषयांची खोली देखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या …