राजीव साने - लेख सूची

नैतिक इहवादाच्या आड येणाऱ्या अस्तिकता नेमक्या कोणत्या?

राजकीय संदर्भात ‘सेक्युलॅरिझम’चा इहवाद हा सरळ अर्थ घेऊन, कायदे बनविताना कोणत्याच संप्रदायाचा आधार न घेणे आणि नागरिकाचा संप्रदाय कोणता या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, अशा स्वरूपात हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. त्याऐवजी सर्वधर्मसमभाव हा संभ्रम वाढवणारा शब्द रुळला आहे. कोणताही जमातवाद हा ‘बाहेरच्यां’चे अधिकार नाकारणारा समूहवाद असतो व म्हणून त्याज्य असतो असे न मानले …

आपण मेंदूचे गुलाम नव्हे, तर मालक!

[निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न आणि मेंदू-विज्ञान] मेंदू-विज्ञानामुळे जे अवघड प्रश्न पुढे आणलेले आहेत त्यांतला सर्वांत कठीण प्रश्न आहे तो फ्री विलसंबंधीचा. फ्री विल म्हणजे स्वेच्छा किंवा मुक्त इच्छा. आपण आपला स्वतःचा म्हणून, स्वायत्तपणे काही निर्णय घेऊ शकतो की मेंदूतल्या पेशींच्या जुळण्या आणि मेंदूतली रसायने मिळून आपण काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, ते सगळे ठरवत असतात? याची …

संगीतातील ‘श्रुति’प्रामाण्याचा वैज्ञानिक उलगडा

[विवेक चिंतनाच्या वाटेवर संगीताचा विचार कुठे आला असा प्रश्न काही वाचकांना पडेल, आणि ते साहजिकही आहे. सुंदरता हे बघणाऱ्या/ऐकणाऱ्या इ. च्या ज्ञानेंद्रियांच्या समजुतीचेच केवळ फलित असते की एखादी गोष्ट वा परिस्थिती आस्वादकनिरपेक्षही सुंदर असू शकते, हा प्रश्न सौंदर्यशास्त्राने निश्चितच हाताळलेला असला तरी आस्वादकासाठी त्याची जाणीव समजुतीने येतेच असे नाही. शब्दांच्या वाटेने येणाऱ्या लेखन, नाट्य यांसारख्या …

धनशुद्धीः स्वप्नरंजन आणि वास्तविकता

प्रामाणिक नागरिकाला एकीकडे सरकारदप्तरी छळवणूक सहन करावी लागते आहे आणि दुसरीकडे विक्रमी आकड्यांचे घोटाळे त्याच्या कानांवर (वाहिन्यांमुळे डोळ्यांवरही) पडत आहेत. संताप होणे अगदी स्वाभाविक आहे. या संतापातून निर्माण होणारी भ्रष्टाचार-विरोधी राजकीय ऊर्जा मोठी आहे व मोलाची आहे. ही ऊर्जा, सध्याची भ्रष्ट-दुरवस्था सुधारणाऱ्या विधायक प्रक्रियेचे इंजिन चालविण्यात वापरायची की डोळे दिपवणाऱ्या(स्पेक्टॅक्युलर) व दणदणीत काही केल्यासारखे वाटावे …

सँडेल व्याख्यानांची चिकित्सा – भाग दोन

सामाजिक संकेत हीच ‘सारतत्त्वे’? आणि जनुकासुर मातू नये म्हणून एखाद्या गोष्टीचे सारतत्त्व म्हणजे काय? हे सांगण्यासाठी सँडेल यांनी दिलेले बासऱ्यांचे वाटप करण्याचे उदाहरण पूर्णतः फसलेले आहे. सँडेल सांगतात की, चांगल्या बासऱ्या उत्तम बासरी वादकांना मिळाव्यात कारण ते चांगले संगीत निर्माण करू शकतील, असे आपण सामान्य माणसे म्हणू, “पण अरिस्टॉटलचे उत्तर वेगळे आहे.” (6/238) चांगले वाजवले …

भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका

अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते. मग भौतिक जग नियत …

करदात्यांचा पैसा आणि भाग्यांचे फेरवाटप

युक्तिवादात, बेमालूमपणे ‘ट्रॅक’ बदलणे व अर्धे सत्य अधोरेखित करून अर्धे अनुल्लेखित ठेवणे हे लेखातील दोष आहेत. समता म्हणजेच न्याय हे गृहीतकही विवाद्य आहे. ‘माझा पैसा’ म्हणणारे नवश्रीमंत हे यशात भाग्याचाही वाटा असतो याकडे दुर्लक्ष करणारे असतीलही परंतु या योगायोगाचा फायदा घेत मुरुगकरांनी ‘करदात्यांचा पैसा’ हा कळीचा मुद्दा ‘माझा पैसा’ या संकुचित मुद्द्यात रूपांतरित केला. विशेषतः …

करदात्यांचा पैसा आणि भाग्यांचे फेरवाटप

युक्तिवादात, बेमालूमपणे ‘ट्रॅक’ बदलणे व अर्धे सत्य अधोरेखित करून अर्धे अनुल्लेखित ठेवणे हे लेखातील दोष आहेत. समता म्हणजेच न्याय हे गृहीतकही विवाद्य आहे. ‘माझा पैसा’ म्हणणारे नवश्रीमंत हे यशात भाग्याचाही वाटा असतो याकडे दुर्लक्ष करणारे असतीलही परंतु या योगायोगाचा फायदा घेत मुरुगकरांनी ‘करदात्यांचा पैसा’ हा कळीचा मुद्दा ‘माझा पैसा’ या संकुचित मुद्द्यात रूपांतरित केला. विशेषतः …

गरिबांसाठीचा निधी श्रीमंतांच्या घशात का घालत आहात?

सध्या आपल्या देशात जी स्वस्त धान्य योजना आहे ती वार्षिक एक लाख रु. किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठीच लागू आहे. दारिद्र्यविषयक वाद हा वार्षिक १२ हजार रु. की ३६ हजार रु. असा आहे. (अगदी अर्जुन सेनगुप्ताप्रणीत दारिद्रयरेषा मानली तरी ती वार्षिक ३६००० रु.च येते). तेव्हा एक लाख मर्यादेमुळे कोणी गरीब या योजनेपासून वंचित राहण्याचा प्रश्नच …

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’

[ सूचनाः १) मनुष्यांबाबत सांस्कृतिक अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठिका एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी. २) या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स व मॅट रिडली यांचे आहे.] स्वतःच्या प्रती छापल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करत असतात. ही वर्तने …

‘आधुनिकतावादी’ या संज्ञेत प्रस्तुत लेखकास काय अभिप्रेत आहे? (नवपार्थहृद्गत ह्या पुस्तकामधील प्रास्ताविक विभागः चार)

खरे तर नवपार्थाने आत्मसात् केलेला आधुनिकतावाद, ही गोष्ट, ज्या भावनांनी तो गीतासंहितेला अनुसाद/प्रतिसाद देतो, त्या भावनांच्या अभिव्यक्तीतून वाचकांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. किंबहुना हृद्गत-वाचनाच्या अनुभवातून आधुनिकतावादही उमगणे हे जास्त समृद्ध करणारे आहे. अगोदरच कोरडी व्याख्या देण्याने काहीसा रसभंगच पत्करावा लागेल. ज्या वाचकांना संज्ञेपेक्षा भाव जवळचा वाटतो त्यांनी खालील मजकूर आत्ता टाळून हृद्गतवाचनानंतर तो वाचण्यात त्यांना लाभ …

पौर्वात्य आत्मविद्याः धन आणि ऋण

हा लेख वाचकांना दिलासा देण्यासाठी किंवा एखादी उपचारपद्धती (थेरपी) समजावून सांगण्यासाठी लिहिलेला नाही. अनेक उपचारपद्धती अशा आहेत, की ज्या तात्कालिक विश्राम व शुश्रूषा मिळवून देण्यात यशस्वी ठरतातही; पण थेरपीजना लगटून थिअरीजही (सिद्धान्त) डोक्यात घुसतात. त्यातील अनेक धारणा, जीवनदृष्टीबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि म्हणूनच सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या घातक ठरणाऱ्या असतात. परिणामतः मनःस्वास्थ्याचे जे नुकसान होते ते थेरपीतून …

अर्हतार्जनाची आकांक्षा (विल टु डिझर्व)

अंक 14:4 मध्ये प्रा. दि. य. देशपांडे यांनी तव्य (ऑट) आणि कर्तव्य (ड्यूटी) संकल्पनांचे स्पष्टीकरण व ‘नीतीची अनुभववादी उपपत्ती’ मांडली आहे. या लेखाचा मथितार्थ (1) मुळात शिक्षेच्या भयाने (वा पारितोषिकाच्या आशेने) विधिदत्त कर्तव्यांचे पालन होते. (2) पालनाच्या सवयीने प्रत्यक्ष शिक्षा/पारितोषिक उपस्थित नसतानाही पालनाच्या कल्पनेचे अनुकरण होते. (3) हे करताना माणसे स्वतःला किंवा इतरांना विध्यर्थक/आज्ञार्थक भाषेत …