रामचंद्र गुहा आणि माधव गाडगीळ - लेख सूची

धिस फिशर्ड लँड : लेख ११

……भुईंत खंदक रुंद पडुनि शें तुकडे झाले आपण भारताच्या पर्यावरणी-सांस्कृतिक वाटचालीच्या चित्राची रूपरेषा पाहिली. संकलक आणि शेतकरी जीवनशैलीवर औद्योगिक ठसा उमटवण्याचे आजही होत असलेले प्रयत्न आपण पाहिले. या साऱ्यांवर वसाहतवादाची विशेष छाप आहे. या अंगाने भारतीय उपखंड आशियातील इतर दोन मोठ्या राष्ट्रांपेक्षा वेगळा आहे. जपान व चीन हे योगायोगाने वसाहतवादापासून मुक्त राहिले. जपानच्या पर्यावरणाचा प्रवास …

धिस फिशर्ड लँड : लेख १०

स्वातंत्र्योत्तर वनसंघर्ष १९८० साली नव्या वन-कायद्याचा मसुदा चर्चेत आला. कायदा घडवणाऱ्यांना वन-खात्याचे अधिकार वाढवायचे होते, तर लोकांच्या संघटनांना हे नको होते. त्यांच्या मते आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांवर या नव्या कायद्याने जुलमी शिक्षांची तलवार टांगली जाणार होती. यातून एकूण वन-व्यवहारांवर चर्चा घडू लागली. यातून काही प्रशासकीय बदल झाले आहेत. एका दिशेचे बदल उद्योगांसाठी वने राखावी, व …

धिस फिशर्ड लँड : लेख ९

व्यापारी वनिकी स्वातंत्र्याच्या चळवळीने भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाजाच्या पुनर्निर्माणाचे दोन ‘नमुने’ पुढे आणले. पंचायत राज, खादी ग्रामोद्योग, प्रार्थना-उपवासासारख्या लोकतंत्रांचा वापर, हा म. गांधींचा नमुना होता—-अभिजात हिंदू परंपरेपेक्षा सामान्य लोकधाटीला जवळ असलेला. गांधींची जनमानसाला ‘हलते’ करण्याची हातोटीही विलक्षण प्रभावी होती. त्यांच्या आदर्शाचा भर शेतकऱ्यावर होता, पण उद्योजकाला ‘वि वस्त’ मानण्याच्या ढगळ कल्पनेमुळे भारतीय उद्योजक-भांडवलशहांनाही त्या आदर्शात …

धिस फिशर्ड लँड : लेख ८

संघर्षाच्या वाटा आणि व्याप्ती इंग्रज भारतात येण्याच्या आधीही संकलक समाजांच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या समाजांचा दबाव असे. पण शेतकऱ्यांचा जंगलांवरचा दबाव सौम्य असे. मिरे, वेलदोडा, हस्तिदंत अशी उत्पादने वगळता शेतकरी जंगलांकडून फार अपेक्षा ठेवत नसत. व्यापारीकरणाने मात्र हे चित्र बदलले. स्थानिक लोकांचे वनावरील हक्क संपुष्टात आले; वनव्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावरून हटली; आणि जंगलांचे स्वरूपही बदलले. ओक …

धिस फिशर्ड लँड : लेख ७

बाजारपेठेला कायदा ‘साक्षी’ संस्कृतिसंघर्ष: जातीपातींच्या श्रेणींच्या अन्याय्य चळतीने जखडलेला, पण तरीही सुसंगत स्थैर्य पावलेला, असा भारतीय समाज कसा घडला ते आपण पाहिले. सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी कसे वागावे याबद्दलच्या वहिवाटी आणि जाती आणि जातसमूहांची वीण, अश्या साऱ्या यंत्रणेतून समाजाचे ‘शासन’ होत असे. त्या मानाने राजे कमी महत्त्वाचे इंग्रज मात्र आले तेच औद्योगिक क्रांतीने आमूलाग्र बदललेली जीवनशैली …

धिस फिशर्ड लँड : लेख ६

जाती आणि निसर्गाचे दोहन भारताच्या सर्वच भागांमध्ये संकलक जीवनशैलीला ‘संपवून’ स्थिर शेतीची शैली घडली नाही. गंगेच्या तीरावर पुरांचा धोका, पूर्व घाट आणि सह्याद्रीच्या आसपास समतल जमिनीचा अभाव, तराई भाग डासांनी आणि दलदलींनी ग्रस्त, काही क्षेत्रांत पाऊस बिनभरवशाचा, अशा अनेक अडचणींमुळे या ‘कठिण’ क्षेत्रांमध्ये संकलन-पशुपालन करणारे समाज तगून राहिले. इतर भागांत मात्र शेती स्थिरावली. शेतीचा प्रसार …

धिस फिशर्ड लँड : लेख ५

खांडववन भारतातील सर्वांत जुने मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्म (fossils) आहेत १.३ कोटी वर्षांपूर्वीचे. सत्तरेक लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्राणी वावरत. मग मात्र त्यांचे अवशेष सापडत नाहीत. ज्यांना मानव म्हणता येईल अशा प्राण्यांचा भारतातला इतिहास सुमारे सात लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. तेव्हापासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतभर छोटे छोटे संकलक गट पसरले. या गटांच्या संसाधन-वापराबद्दल आपण …

धिस फिशर्ड लँड : लेख ४

संघर्ष संसाधन-वापराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणाऱ्या दोन समाजांची गाठ पडली की खूप तणाव उत्पन्न होतो. समाजरचना वेगवेगळ्या असतात. विचारधारा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. इतिहासात वारंवार अशा तणावांमधून तीव्र संघर्ष उपजताना दिसतात. कधीकधी तर वंशविच्छेदापर्यंत मजल जाते. अमेरिकन (रेड) इंडियन्सची संकलकपद्धती जेव्हा यूरोपीय वसाहतवाद्यांच्या शेतकरी-समाजापुढे आली तेव्हा हे घडले. महाभारतातली खांडववन जाळण्याची घटनाही मुळात संकलकांच्या …

धिस फिशर्ड लँड : लेख ३

शेती आणि उद्योग जमिनीच्या एखाद्या तुकड्यावर थोड्याच जातींच्या वनस्पतींपासून बरेच उत्पादन घेत राहिल्यास त्या जमिनीतील अनेक द्रव्ये शोषून घेतली जाऊन जमिनीचा कस उतरतो. यावर एक उपाय म्हणजे जमिनीला काही काळ न वापरणे, ज्यामुळे तिच्यावर नैसर्गिक झाडोरा येऊन द्रव्यांची साठवण होते. हे झाले फिरत्या शेतीचे तंत्र. जर कस उतरलेल्या जमिनीला गाळ, खते वगैरेंमधून पोषक द्रव्यांचा पुरवठा …

धिस फिशर्ड लँड : लेख १

विवेक आणि उधळेपणा [माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड : अॅन इकॉलॉजि-कल हिस्टरी ऑफ इंडिया’ (ऑक्स्फर्ड इंडिया पेपरबॅक्स, १९९२) हे पुस्तक भारताची सद्यःस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत शिस्तबद्ध संशोधन-पद्धती, प्रचंड आवाका आणि अनेक विषयांची सांगड घालण्याची लेखकांची हातोटी, हे स्तिमित करणारे आहे. या पुस्तकाचा संक्षेप करून काही लेखांमधून तो …