मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९१

धर्म, धर्मनिरपेक्षता, इ.

आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत.

पुढे वाचा

सावरकरांचा हिंदुत्वविचार

आजचा सुधारक च्या एप्रिल १९९१ (वर्ष २ अंक १) ह्या अंकात ‘धर्मनिरपेक्षताः काही प्रश्न ह्या शीर्षकाखाली डॉ. भा. ल. भोळे आणि श्री. वसंत पळशीकर ह्यांनी परिसंवादासाठी तयार केलेली एक प्रश्नावली प्रसिद्ध झाली. प्रश्नावलीतील एका प्रश्नावर आक्षेप घेणारे माझे पत्र जून १९९१ (वर्ष ३, अंक ३) ह्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याला उत्तर देणारे पळशीकर ह्यांचे पत्र जुलै १९९१ (वर्ष २, अंक ४) ह्या अंकात आले आहे.

हा छोटा लेख म्हणजे पळशीकरांच्या उत्तरावरची प्रतिक्रिया आहे. त्याला पत्राचे रूप न देता लेखाचे देत आहे ह्याचे कारण ह्या निमित्ताने मी सुधारकने योजिलेल्या परिसंवादातच भाग घेतल्यासारखे होत आहे.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता / सेक्युलरिझम

व्याज-धर्मनिरपेक्षता आणि खरी धर्मनिरपेक्षता असा भेद करणे म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा होय. सेक्युलरिझम ही संज्ञा ख्रिश्चन परंपरेमधून उगम पावली आहे. ईश्वराला देय असेल ते त्याला दे व राजाला देय असेल ते राजाला दे असा बायबलमध्ये मानवाला उपदेश आहे. त्यामुळे मानवी जीवन हितावह ठरते. भारतीय परंपरेत अशी संज्ञा आढळत नाही. ईश्वरी क्षेत्र आणि मानवी क्षेत्र स्वायत्त आहेत ही भूमिका भारतीय विचारपरंपरेमधे आढळत नाही. आस्तिकता आणि नास्तिकता एकत्र नांदू शकत नाहीत ही भारतीय विचारांची मूलभूत भूमिका आहे. विज्ञानाच्या विकासामुळे पाश्चिमात्य विचारामधील ईश्वरी क्षेत्र व मानवी क्षेत्र अशी द्वन्द्वात्मक स्वायत्तता ही संज्ञा मागील काही शतकात क्षीण होत जाऊन आज अनीश्वरवाद वैचारिक पातळीवर स्थिर होत चालला आहे.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता

धर्म हा शब्द घृ धातूपासून बनला असून त्याचा अर्थ, मनूने सांगितल्याप्रमाणे, धारण करतो तो धर्म असा आहे. धर्म प्रजेचे धारण करतो. सत्य, भूतदया, प्रेम, करुणा, शांति, न्याय इत्यादि मूलभूत तत्त्वांचे माणसांनी पालन करण्यासाठी जे नियम केले गेले तो धर्म होय. म्हणून मानवाचा असा हा एकच धर्म आहे. त्यामुळे धर्मामुळे विसंवाद वाढतो, दंगे होतात, इत्यादि मीमांसा धर्म शब्दाच्या वरील व्याख्येतून निष्पन्न होत नाही. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादि खऱ्या अर्थाने धर्मसंप्रदाय आहेत व या अनि हे आज विसंवाद वाढण्यास कारण बनत आहेत हे नाकारता येत नाही.

पुढे वाचा

इहवाद व हिंदू राष्ट्र

१९४७ च्या सत्तान्तरानन्तर आमचे राज्य secular आहे असे म्हणण्यास पं. नेहरूंनी सुरवात केली. वस्तुतः आमच्या संविधानात, हा प्रचार सुरू झाला तेव्हा secular हा शब्द नव्हता. तो पुढे इन्दिरा गांधीनी घातला. आज बहुधा सर्व पक्षांची secular म्हणवून घेण्यात अहमहमिका लागली आहे.

असे असले तरी या शब्दाच्या अर्थाबद्दल मात्र विलक्षण गोंधळ आहे. काँग्रेसजन साधारणतः secular च्या विरुद्ध communal असा शब्द वापरतात, व रामजन्मभूमीच्या विमोचनाच्या चळवळीला communal म्हणतात. उलट रामजन्मभूमीचे विमोचन ही secular चळवळ आहे असा दावा या चळवळीचे नेते मांडतात.

चेम्बर्सच्या कोशात ‘Secular’ या शब्दाचा अर्थ “Pertaining to the present world or things not spiritual’ असा दिला आहे.

पुढे वाचा

सेक्युलरिझम्

आजचा सुधारक च्या संपादकांनी ‘सेक्युलरिझम् ‘ वर मला लिहावयाला सांगितले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांची प्रश्नावली आणि त्यानंतर आमचे मित्र श्री दिवाकरराव मोहनी यांचे आजचा सुधारकमधील लेख मी वाचले. त्या लेखातील प्रत्येक मुद्याला उत्तर देण्याऐवजी प्रथम आपली भूमिका विशद करावी आणि या विशदीकरणातून त्यांचे काही मुद्दे सुटले, तर त्यांचा परामर्श घ्यावा, असे मी ठरविले आहे. संपादकांनी घालून दिलेल्या शब्दमर्यादेचा भंग न करता मी हे करणार आहे. त्यामुळे काही मुद्दे सुटण्याचीही शक्यता आहे. पण आजचा सुधारक मध्ये या विषयावर चर्चा चालू राहणार आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १५)

घटस्फोट
बहुतेक सर्व देशांत आणि बहुतेक सर्व युगांत घटस्फोटाला काही कारणांकरिता संमती होती. घटस्फोटाची संकल्पना एकपतिक-एकपत्नीक (monogamous) कुटुंबाचा पर्याय म्हणून कधीच केली गेली नाही. त्याचा उद्देश जिथे विवाहितावस्था कायम ठेवणे असह्य झाले असे वाटते तिथे क्लेश कमी करणे हाच राहिला आहे. या विषयातील कायदा भिन्न देशांत आणि भिन्न काळी अतिशय भिन्न राहिलेला आहे. आजही एकट्या संयुक्त संस्थानांत तो एका टोकाला दक्षिण कॅरोलिनात घटस्फोट मुळीच शक्य नसणे येथपासून तो दुसऱ्या टोकाला नेव्हाडामध्ये तो अतिसुलभ असणे येथपर्यंत विविध आहे. अनेक ख्रिस्तीतर नागरणांत (civilizations) पतीला घटस्फोट सहज मिळे, तर काहीमध्ये तो पत्नीला सहज मिळे.

पुढे वाचा

विवेकवाद -१६

गीतेतील नीतिशास्त्र

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका आक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच, अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म-किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे?’

पुढे वाचा

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणाऱ्या देवासुरानी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला, किंवा विश्वकम्यनि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक’ यांस
जून १९९१ च्या अंकात श्री. दिवाकर मोहनी यांचा ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न हा विस्तृत लेख आपण प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या संदर्भातील काही विचार.

श्री. दिवाकर मोहनी आणि तत्सम विचारवंत धर्म, धर्मनिरपेक्षता. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी संकल्पना, त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील आविष्कार यांचा विचार तात्त्विक पातळीवरून करतात आणि व्यावहारिक बाजूकडे जाणून दुर्लक्ष करतात. कधी तर वाटू लागते की हे लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत ! श्री. मोहनी आपल्या प्रतिपादनाची सुरुवातच ‘समजा या शब्दाने करतात, आणि मग ज्या गोष्टी गृहीत धरून चालतात त्यातील काहींची चर्चा एखाद्या महात्म्याच्या वा आचार्याच्या बौद्धिक व भावनिक पातळीवरून करू लागतात.

पुढे वाचा