मासिक संग्रह: जून, १९९५

संपादकीय

आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते मानल्याशिवाय आम्हाला राहवत नाही.
हा आगरकर विशेषांक प्रसिद्ध करीत असताना गेल्या वर्षी वर्षारंभी दिलेले एक आश्वासन मात्र आम्ही पाळू शकलो नाही ह्याबद्दल वाचकांची क्षमा मागणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.

पुढे वाचा

आगरकरांचा जातिविचार भास्कर

आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला कशी मारक ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या मते, जन्मतः सारखेच हक्क व योग्यता घेऊनआलेल्या व्यक्तींचे ते हक्क व योग्यता पुढे त्याच्या जातिधर्मावर नव्हे तर कमीअधिक बुद्धिविकासावर व उद्यमशीलतेवर अवलंबून असावी.

पुढे वाचा

आगरकर आणि हिंदू-मुस्लिम प्रश्न

महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत विवेकवादाचे अध्वर्यु गोपाळराव आगरकर यांचे स्थान हे अग्रमानाचे आहे. गोपाळराव आगरकरांनी विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेच्या विचाराला राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेले होते. अर्थात सामाजिक प्रश्नांवर लढत असतानाच आगरकरांनी राजकीय प्रश्नांना चाच्यावर सोडलेले नव्हते. नातू देशपांडे संपादित “आगरकर-वाङ्मयाच्या दुसर्‍या खंडात आगरकरांचे राजकीय विषयावरील लेख आहेत. त्यांमध्ये त्यांनी मुंबईत आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांच्या संबंधाने लिहिलेले सहा लेख आहेत. त्यातून हिंदूमुसलमान प्रश्नासंबंधीची त्यांची संतुलित दृष्टी दिसते. या लेखांच्या अनुषंगानेच या प्रश्नावरील आगरकरांच्या विचारांचे हे विश्लेषण असल्याने माझ्या विश्लेषणाचे मर्यादित स्वरूप कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.

पुढे वाचा

आगरकरांचे समाजशास्त्र

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात सामाजिक परिस्थितीचा व समाजरचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात झाली. त्याबाबतचे आपले परखड विचार प्रथम लोकहितवादी यांनी मांडले आणि म. ज्योतीराव फुले यांनी ह्या विचारांना एक नवे वळण दिले. त्यांच्या मांडणीत जातिव्यवस्थेस विरोध आणि समतेच्या आधारावर नव्या विवेकनिष्ठ समाजाची स्थापना या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सुधारकार गोपाळ गणेश । आगरकर हे सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते आणि समाजाच्या स्थितिगतीबाबतचे त्यांचे विचार आधुनिक आणि परंपराविरोधी होते. त्यांच्या सामाजिक शास्त्रविषयक विचारांवर स्पेन्सरच्या व मिल्लच्या विचारांचा प्रभाव पडला होता. म्हणून निसर्ग व मानवयांच्या विकासाची ते सातत्याने तुलना करताना दिसतात.

पुढे वाचा

आगरकर आणि स्त्री

गोपाळ गणेश आगरकरांचे निधन झाले त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.या विलक्षण ताकदीच्या माणसाला अवघे एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले आणि त्यातही जेमतेम पंधरा वर्षांचा काळाचा तुकडा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या हाती लागला. या अवधीमध्ये त्यांनी कितीतरी विषयांची, सखोल विचार आणि अभ्यास करून, मांडणी केली. त्यापैकी स्त्रियांच्या संदर्भात किंवा स्त्रीपुरुप-समतेच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या काही विचारांपुरताच माझा लेख मी मर्यादित करून घेतला आहे.
१ ऑगस्ट १८८८ या दिवशी सुधारक या त्यांच्या साप्ताहिकांसंबंधीचे एक जाहीर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुधारक सुरू करण्याचा उद्देश काय आणि त्यामध्ये प्रसिद्ध होणार्‍या साहित्याचे स्वरूप कसे असेल यासंबंधीची माहिती या पत्रकात आहे.

पुढे वाचा

आगरकरप्रणीत धर्मचिकित्सेचा आशय

गोपाळ गणेश आगरकर (१८५६ ते १८९५) हे धर्मवेत्ते नव्हते. डॉ. भांडारकर किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याप्रमाणे ते तुलनात्मक धर्मशास्त्राचे अभ्यासकही नव्हते. रूढ अर्थाने ज्याला आपण धार्मिक वृत्ती म्हणतो तिचा त्यांच्या ठायी अभावच होता. अशी व्यक्ती जेव्हा धर्मविषयक प्रश्नांसंबंधी बोलू लागते तेव्हा आपल्या मनात दोन प्रतिक्रिया निर्माण होतात. एक, अशा अधार्मिक व्यक्तीला धर्मसंबंधाने बोलायचा खराच काहीअधिकार आहे काय, आणि दोन, अशी अधार्मिक व्यक्ती जेव्हा धर्माबाबत बोलेल तेव्हा ते धर्मविरोधीच असणार. आगरकरांना त्यांच्या हयातीतच या दोन्ही प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागले होते आणि त्यांनी ते समर्थपणे दिलेही!

पुढे वाचा

विवेकवाद आणि आगरकर

आगरकरांच्या संपूर्ण विचाराचे सूत्र सांगायचे झाले तर ते विवेकवाद (rationalism) होय असे आपण निभ्रांतपणे म्हणू शकतो. या विवेकवादाचे स्वरूप त्यांनी कोठे तपशीलवार सविस्तर सांगितले आहे असे म्हणता येत नाही. त्यांनी आपल्या सुधारणावादाचा पुरस्कार करण्याकरिता साप्ताहिक वृत्तपत्र हे माध्यम स्वीकारल्यामुळे त्यांच्या विवेचनाला मर्यादा पडल्या होत्या. राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक, धार्मिक इत्यादि विषयांची साधकबाधक, सविस्तर आणि मूलगामी चर्चा त्या माध्यमात करणे अशक्यप्राय होते. त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यामुळे त्यांना ग्रंथरचना करण्यासही सवड झाली नाही. शिक्षण संपल्याबरोबर ते वृत्तपत्रीय व्यवसायात पडले, आणि प्रथम सात वर्षे केसरीचे संपादन करून पुढील सात वर्षे सुधारकचे संपादन करीत असतानाच त्यांचे वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी अकाली निधन झाले.

पुढे वाचा

शारदासदनासंबंधीचा वाद

(पं. रमाबाईंनी शारदासदनाची स्थापना करून त्यामध्ये अनाथ स्त्रियांना आश्रय दिला. तेथील वातावरणामुळे त्या स्त्रियांना ख्रिस्ती धर्माबद्दल आपुलकी वाटू लागली व त्यांपैकी काहींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याबरोबर शारदासदनाची लोकप्रियता घटू लागली व पालकांनी भराभर आपल्या मुली तेथून काढून घेतल्या. य. दि. फडके लिखित आगरकरचरित्रामधल्या त्या कालखंडाविषयी ..- सं.)
टिळकांनी संमतिवयाच्या विधेयकाविरुद्ध रान उठवण्यास सुरुवात केली तेव्हा नोव्हेंबर १८९० च्या नॅशनल रिव्ह्यू या नियतकालिकाच्या अंकात लायनेल अॅशबर्नर या साहेबाने हिंदु विधवा या ‘सनदी स्वेच्छाचारिणी’ असतात असा निर्गल आरोप करताच गोपाळराव आगरकर संतापले.

पुढे वाचा

आगरकर व रानडे यांच्यातील वैचारिक द्वंद्व

दहा मे १८५८ रोजी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर एक ऐतिहासिक चर्चा घडून आली. ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती. सुप्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भांडारकरांनी मांडलेल्या एका मुक्ष्याच्या निमित्ताने ही चर्चा उत्स्फूर्तपणे सुरू झाली. इच्छित सामाजिक बदलासाठी धर्मसुधारणा आधी घडून येणे अत्यंत आवश्यक आहे, असा भांडारकरांचा मुद्दा होता. माधवराव रानडे, विष्णु मोरेश्वर महाजनी, लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर इ.विख्यात व्यक्ती त्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ‘अज्ञेयवादी तत्त्वज्ञानाचे प्राथमिक धडे देऊ पाहणारे अनिष्ट पुस्तक’ अशी ज्याची रानड्यांनी संभावना केली होती त्या ‘बटलर्स मेथडऑफ एथिक्स’ या पुस्तिकेचे लेखक व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य फ्रांसिस सेल्बी आणि विश्वविख्यात कवी वर्डस्वर्थचे नातू व एलफिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य विल्यम वर्डस्वर्थ हेही त्यावेळी उपस्थित होते.

पुढे वाचा

आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम

… सामाजिक सुधारणांपेक्षांहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, आणि म्हणून राजकीय सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करूं पाहाते, हे आश्चर्य नव्हे काय!.
….. जातिभेद, बालविवाह, असंमत वैधव्य, केशवपन वगैरे दुष्ट चालींपासूनआम्हांस पुष्कळ त्रास होत आहे; पणमिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी आमच्या जमिनीच्या बोकांडीस बसणारा रेव्हेन्यू सर्वेचा फेरा, व यमोदराप्रमाणे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये भक्ष्यस्थानी पडले तरी फिरून आपलें हपापल्यासारखे करणारे लष्करी खाते इत्यादिकांपासून आम्हांस जो त्रास होत आहे, त्यापुढे सामाजिक शोचनीय दुराचारापासून होणारा त्रास कांहींच नाही, असे म्हटले तरी चालेल.

पुढे वाचा