मासिक संग्रह: ऑगस्ट, १९९५

पत्रव्यवहार – प्रतिक्रिया हवी

प्रतिक्रिया हवी
संपादक, आजचा सुधारक यांस,
आजचा सुधारक मधील काही मतांशी मी सहमत होऊ शकत नाही. ज्या मतांशी मी सहमत होऊ शकत नाही त्यांबाबत माझे आकलनही कमी पडत असेल. तरीसुद्धा ज्याशी आपण सहमत नाही ती मते तरी आपल्याला नीट माहिती हवीत ह्या दृष्टीने आपल्या मासिकाची उपयुक्तता निश्चितच आहे.
‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ या शीर्षकाखाली नागपूरच्या प्रा. श्री. गो. काशीकरांचा एक लेख २८-४-९५च्या तरुण भारतात वाचण्यात आला. माझ्यासारख्या सामान्याला (Layman) या विषयात गम्य नाही; तरीदेखील ह्या लेखासंबंधी आपली प्रतिक्रिया समजून घेण्यास मात्र मी उत्सुक आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परीक्षण- ‘ज्याचा त्याचा प्रश्न’

‘देव’ ही आजची ज्वलंत समस्या आहे हे जाणून त्या समस्येवर घणाघाती प्रहार करणारे, प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ‘ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक रंगभूमीवर आले आहे. प्रेक्षकातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्तीच्या द्योतक असलेल्या चार प्रमुख व्यक्तिरेखा नाटकात आहेत. या व्यक्तिरेखांच्या मनातले विचार हे प्रेक्षकांपैकी कुणाचेही असू शकतात. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे जास्त कर्मकांडात रमून न जाता देव मानणारी निर्मला. अगोदर नीतिवादी व नियतिवादी असल्यामुळे हार पत्करणारा परंतु भौतिक यश प्राप्त झाल्यावर नीति-अनीतीचीही पर्वा न करणारा निर्मलेचा पती-सुभाष. कोवळ्या वयात समाजाकडून देवाबद्दल घडवल्या जाणार्याण संस्कारांत वाढणारा व घरातून नास्तिकतेच्या संस्कारांत वाढणारा मनू.

पुढे वाचा

अमेरिकेमधील वास्तव परिस्थिती

डॉ. र. वि. पंडित यांच्या “अमेरिकन लोकांची लैंगिकता’ या लेखात आफ्रिकन अमेरिकन लोकांचा “काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्याप व वनचरांना शोभेशी नैतिक मूल्ये असणार्या ” असा उल्लेख आहे. त्यांच्या मूल्यांची तुलना डॉ. पंडित कोणाशी करीत आहेत?
डॉ. पंडितांच्या मते ह्या माणसांना पळवून अमेरिकेत आणून गुलाम म्हणून । विकणाच्या समाजाची मूल्ये कुठल्या दर्जाची होती?साधारण त्याच काळी पेशवाईत पुण्यातही “स्लेव्ह मार्केट” चालविणार्याु आपल्या पूर्वजांचा नैतिक दर्जा काय होता?
डॉ. पंडित यांनी श्री प्रल्हाद केशव अत्रे यांचे “आम्ही चावट होतो’ हे पुस्तक वाचले तर आपल्या भारतीय पायांखाली तेव्हा काय जळत होते हे त्यांना समजेल.

पुढे वाचा

इस्लाम आणि लैंगिकता

आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा, पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते”. येथे डॉ. पंडितांनी धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम आणि संबंधित धर्माचे अनुयायी पाळत असलेल्या प्रथा, या दोन गोष्टींची गल्लत करून, इस्लामी धर्मशास्त्राच्या नियमामुळे मुसलमानांतील लैगिक आचरण मोकळे असल्याचे सूचित केले आहे.

पुढे वाचा

अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.

पुढे वाचा

चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)

उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.

पुढे वाचा

खरं, पुनर्जन्म आहे?

आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.

पुढे वाचा

इतर

आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!

पुढे वाचा