मासिक संग्रह: ऑक्टोबर , 1998

संपादकीय

एका वेगळ्या प्रकारची परिस्थितिशरणता
आपल्या देशामध्ये, ह्या भारतभूमीत असे पुष्कळ लोक आहेत की जे आपल्यापुरतेच पाहत नाहीत, आपल्या शेजारपाजारच्यांची त्यांना आठवण असते. त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा एकट्याने उपभोग घेण्याचा त्यांना संकोच होतो. महात्मा गांधींनी तर त्या बाबतीत आपणा सर्वांना आदर्शच घालून दिला. दरिद्रनारायणाला जे मिळत नाही ते वापरण्याला त्यांनी आपल्या उत्तरायुष्यात नेहमीच नकार दिला. सर्वसाधारण भारतीयाइतकेच आपले जीवनमान राखण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राहण्यासाठी मोठमोठे वाडे त्यांना मिळू शकत असताना त्यांनी झोपडीचा आश्रय केला. अशी दीनदयाळु, सुमनस्, दयार्द्र किंवा करुणाकर मंडळी भारतात बहुसंख्य नसली तरी पुष्कळ मोठ्या संख्येने आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

राजेंद्र व्होरा यांच्या आगरकरांविषयीच्या टीकेस आपण प्रत्युत्तर देणे आवश्यक होतेच का? व्होरा यांचे आगरकरांच्या लिखाणाविषयीचे निरीक्षण आपण अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे, त्यांचा निष्कर्ष आपणास मान्य नाही. पण आगरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असले तरी त्यालाही मर्यादा असल्यास हरकत नसावी.
– मधुकर देशपांडे
३ राज अपार्टमेंटस्, ४४/१
शिवदर्शन चौक, विद्यानगरी, पुणे ४११००९

संपादक,
आजचा सुधारक
आपल्या मासिकाचा मी नुकताच वर्गणीदार झालो आहे. मागील १०-१५ अंक मागून घेतले होते तेही माझ्याजवळ आहेत. सहज अंक चाळून पहात असता मला काही विचार सुचले ते आपल्यापुढे मांडत आहे.

पुढे वाचा

स्फुटलेख

महाराष्ट्रातल्या एकूण सर्व रहिवाशापैकी २०% लोक सोडले तर बाकीचे ८०% लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शासकीय मदतीला कमीअधिक प्रमाणात पात्र ठरत असावे.
जे मदतीला पात्र ठरत नाहीत त्यांच्यापैकी अर्धे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १०% लोक असे साहाय्य घेणे नामुष्कीचे वाटून त्यासाठी जात बदलणार नाहीत अशी आशा आहे. म्हणजे दाखला मागण्यातल्या, मिळविण्यातल्या अडचणी पार करून जास्तीत जास्त १०% लोक त्या सवलतींसाठी लायक नसताना सवलती मागतील असा अंदाज करता येतो.
आपल्याला ह्या जातींच्या गुंत्यातून बाहेर पडावयाचे असेल तर त्यासाठी दोन उपाय आम्हाला सुचतात.

पुढे वाचा

बाराखडीतील अं’ चे स्वरूप

आजचा सुधारकच्या जुलै ९८ च्या अंकात ‘अ’ च्या स्थानाविषयी काही उद्बोधक चर्चा ‘स्फुटलेख’ या शीर्षकाने केलेली आढळली. हा ‘शिक्षाशास्त्र (उच्चारणशास्त्र) व व्याकरणशास्त्र’ यांच्या अंतर्गत येणारा विषय, त्या दृष्टीने पुढील माहिती उपयोगी होण्याचा संभव वाटतो. अ आ च्या बाराखडीत “अं अः’ का येतात, तर ते अनुस्वार-विसर्गाची ओळख व्हावी म्हणून. ‘अं’ व ‘अ’ हे स्वरापुढे क्रमाने येणारे अनुस्वार व विसर्ग होत, (अं अः इत्यचःपरौ अनुस्वारविसग) अशी स्पष्ट नोंद व्याकरणशास्त्रात केलेली आहे. अनुस्वार व विसर्ग हे नेहमी स्वरापुढेच येतात, व्यंजनापुढे कधीही येत नाहीत. यास्तव मुलांना त्यांची ओळख व्हावी म्हणून सोयीसाठी स्वरांतला आदिस्वर ‘अ’ म्हणून त्याच्या साहाय्याने ही ओळख करून देण्यात येते.

पुढे वाचा

करा आणि शिका

बहुतेक शाळांमध्ये विज्ञान हा विषय फक्त व्याख्यानांच्या रूपात शिकविला जातो. शिक्षकांनी व्याख्यान द्यावे आणि मुलांनी ते ऐकावे हीच पद्धत वापरली जाते. प्रयोगातून विज्ञान क्वचितच शिकविले जाते. आणि ज्या थोड्या शाळांत प्रयोग केले जातात तेही फक्त शिक्षकाने तीस चाळीस (किंवा जास्तच) मुलांना एकदा करून दाखवायचे आणि सर्वांनी ते पाहायचे असा प्रकार असतो. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून पहाता येत नाहीत. वर्गातील विद्यार्थी संख्या, विज्ञान-तासिकेत असणारा वेळ, वर्षातील सुट्यांची संख्या हे सर्व पाहता उत्साही शिक्षकालाही फारसे वेगळे करता येत असेल असे वाटत नाही. अशा नीरस पद्धतीमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होणे कठीणच.

पुढे वाचा

नीती आणि समाज

अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो.

बहुतेक सर्व मानवी समाजांमध्ये आजतागायत ‘धर्म’ मार्गदर्शक नियम घालून देत असे. पण त्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्यामुळे आता बहुतेक विचारी व्यक्ती धर्माची जागा ‘नीती’ ने घ्यावी असे मानू व बोलू लागल्या आहेत.

पुढे वाचा

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास: लेखक: पवन वर्मा (१)

भारतातील मध्यम-वर्गाचा हा संशोधनपूर्वक अभ्यास पवन वर्मानी अतिशय प्रभावीपणे आणि आश्चर्यकारक पोटतिडकेने सादर केला आहे. इतिहासाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले वर्मा भारतीय विदेशसेवेत एक अधिकारी आहेत. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी म्हणून आणि इतर अनेक जबाबदारीच्या अधिकारपदांवर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ते विदेश कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, प्रवक्ते (spokesman) आहेत.
ह्या आधीची वर्माची पुस्तके वेगळ्या प्रकारची आहेत. उदा. Krishna: The Playful Divine; Ghalib: The Man, the Times; Mansions at Dusk – The Havelis of old Delhi (with Raghu Rai) वगैरे. ह्या पुस्तकांवरून त्यांचा उर्दू काव्याचा, पौराणिक वाङ्मयाचा आणि इतिहासाचा अभ्यास लक्षात येतो.

पुढे वाचा

अमेरिकेतील शिक्षकसंघ: सामर्थ्य आणि संघर्ष

आज अमेरिकेत शिक्षकांच्या हक्कांसाठी झगडणारे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले नॅशनल एज्युकेशनल असोसिएशन (एन्.ई.ए.) व अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स (ए.एफ.टी.) असे दोन संघ आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ह्या दोन संघटना कुत्र्या-मांजरांसारख्या उघडपणे मांडत आहेत. दरवर्षी ह्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या वार्षिक संमेलनात एक संघटनेच्या मागणीचा प्रस्तावही मांडतात. पण दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी तो बहुमतांनी फेटाळून लावतात. हा तमाशा अनेक वर्षांपासून अमेरिकन जनतेला फुकटात पाहावयास मिळतो. ह्या वर्षी जुलै महिन्यात दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी बहुमताने एकीकरणाचा ठराव पुन्हा एकदा बहुमतांनी नामंजूर केला.
ह्या दोन्ही संघटनांची सभासद-संख्या जवळजवळ ३० लाख आहे.

पुढे वाचा

खेड्यांतली शाळा कशी असावी?

खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्यापाड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, ते बेताचे असेल त्या वेळी एकवक्त आणि त्याचा भर असेल त्यावेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरावी. शाळेत शारीरिक बळवृद्धीला महत्त्व दिले पाहिजे; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा कीं, शिकणाराला बाजारांत अडचण पडू नये, सावकाराशीं तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टके, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल तीं तो जरूरीप्रमाणे पुढे शिकेल.)

पुढे वाचा