मासिक संग्रह: जून, १९९९

संपादकीय

विवेकाचे उग्र व्रत
सोनिया गांधी यांची उमेदवारी ही आपल्या देशातली एक फारच मोठी घटना झाली आहे. सगळ्या देशाचे लक्ष सध्या त्यांच्याकडे लागले आहे. आपल्या देशातली लोकशाही ही किती अपरिपक्व आहे त्याचे हे लक्षण आहे. भाजपासारख्या सत्तारूढ पक्षाला विदेशात जन्मलेल्या, जिने आजवर राजकीय आकांक्षा दाखविली नव्हती अशा एका साधारण बुद्धीच्या महिलेने आपली उमेदवारी जाहीर केल्याबरोबर भीतीने कापरे भरावे ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने नामुष्कीची आहे. काँग्रेस पक्षाजवळ सोनिया गांधींच्यापेक्षा अधिक मातब्बर व्यक्ती नाही. आपण सारेच किती व्यक्तिपूजक आहेत हेच ही घटना स्पष्ट करते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मनुष्याचा आत्मा अन् विज्ञान
संपादक, आजचा सुधारक यांस,
प्रस्तावना : मनुष्याचा आत्मा व विज्ञान. यांमधील परस्पर संबंधावर इंग्लंडमधील फिजिक्स वर्ल्ड (मे १९९२) या नियतकलिकात काही वेधक विचार वाचावयास मिळाले. त्यांचा स्वैर व संक्षिप्त अनुवाद येथे दिला आहे. मनुष्य जी बुद्धिमत्तेची कामे करू शकतो, त्यांचा कर्ता असतो त्याचा आत्मा. ही संकल्पना होती देकार्त यांची! याच अर्थाने (फंक्शनल) येथे आत्मा ही संज्ञा वापरली आहे. इंग्लंडमध्ये वैज्ञानिक विचाराची एक दीर्घ परंपरा आढळते. आधुनिक विज्ञानाचा आद्यप्रणेता न्यूटन याचा जन्म इंग्लंडमध्येच झाला होता. त्यानंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडात ज्या युरोपिअन देशांनी विज्ञानाचा विकास करण्यास साहाय्य केले त्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग महत्त्वाचा होता.

पुढे वाचा

सत्यदर्शनातील अडथळा

आजचा सुधारक च्या जानेवारी ९९ च्या अंकात सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता? ह्या शीर्पकाखाली मी एक जिज्ञासा व्यक्त केली होती. त्या संदर्भात दोन पत्रे आली. पैकी पहिले पत्र श्री. अनन्त महाजन यांचे एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित झाले आहे. त्याचा प्रथम विचार करू . ते म्हणतातः “लेखिकेने आपल्या निवेदनात वापरलेला conditioning हा शब्द जे. कृष्णमूर्ती यांच्या लिखाणात सर्वत्र दिसतो; त्याचा अर्थ मला समजला नाही.” असे म्हणून त्यांनी त्यासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे मानसशास्त्राच्या जाणकारांनीच द्यावयाला हवीत. याशिवाय “विश्वरूपाचे निरनिराळे आविष्कार म्हणजेच सुवर्णपात्र आहे” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे वाचा

स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप
एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे.
कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, मात्र भांडवलाच्या विपयीची आपली अगोदरची कल्पना ही शोपणाधिष्ठित असल्या मुळे एका वाजूला उत्पादन वाढत राहिले तरी दुस-या वाजूला विपमता कायम राहते. शोषणाचे पूर्वीचे स्वरूप आता थोडे फार वदलले असले, जो शोषित आहे तो अगदी सर्वहारा, सर्वस्व गमावलेला नसला तरी विषमता आणि शोपण हे शब्द पर्यायवाची वनले आहेत, आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केलेल्या आहेत असे जाणवते.

पुढे वाचा

स्वदेशी चळवळ : एक मुक्त चिंतन

मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि आहे की, संपूर्ण हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय आक्रमक शक्तींचा प्रतिकार करणे शक्य नाही. पूर्वीच अस्तित्वात आलेली हिंदु-महासभा ही हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांत हेतुतः साम्य असल्याने राजकारणाचे आकर्षण व अगत्य असणारी संघाची काही माणसे हिंदु-महासभेत गेली.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.

पुढे वाचा

समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र

सप्रेम नमस्कार,
मुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल.

पुढे वाचा

भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको

इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें पाहिजे. ज्याप्रमाणे तेच रस शरीरास हितावह होत, की जे शरीर प्रकृतीस मानवून जीवतत्त्वास ढका लावणार नाहींत; त्याचप्रमाणे जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीस अगदी बरोबर उतरून तिच्या रचनेस यत्किंचितही अपाय न करतील तेच मात्र तीस वर्धक होतील.

पुढे वाचा