मासिक संग्रह: जुलै, १९९९

संपादकीय

अन्यायकर्त्याला सर्व समाजाचे संमोदन वा मूक अनुमोदन असते
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. नाना ढाकुलकरांची दोन पत्रे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पत्राला आम्ही जे उत्तर दिले त्याने त्यांचे समाधान झाले नाही हे उघड आहे. आजचा सुधारकचे धोरण व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर (एखाद्या जातिविशेपावर) केलेली टीका शक्यतोवर न छापण्याचे आहे. त्या धोरणाला अपवाद करून ही पत्रे छापत आहोत. आमच्याकडे आलेल्या आणखीही काही लेखांत व्यक्तीवर टीका करणारा मजकूर आलेला आहे. तेवढा प्रसिद्ध करून ह्यानंतर असा मजकूर वगळला जाईल. आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तींशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे.

पुढे वाचा

चर्चा

हिन्दु कोण?
आपल्या में ९९ च्या संपादकीयामध्ये “ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले त्याला आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. हिंदुत्वाचे मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा आहे” अशा धर्तीची विधाने आहेत. मला संपादकांना पुढील प्रश्न विचारावयाचे आहेत.
१. भारताचा नकाशा कायम वदलत आलेला आहे. (उदा. वांगला देश, पाकिस्तान) असे झाले तर भारतावाहेर राहिलेले हिंदू अहिंदू होणार का?
२. जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भारतात पाऊलही ठेवलेले नाही पण ते स्वतःला हिंदू मानतात. अगदी छोट्या कॉस्टारिका ह्या देशात स्वतःला हिंदू मानणारी माणस मला भेटलेली आहेत.

पुढे वाचा

जिज्ञासा

सत्यदर्शनातील अडथळ : उदाहरणे द्यावी.
संपादक, आजचा सुधारक, यांस –
जानेवारी ९९ च्या अंकात “जिज्ञासा” ह्या शीर्षकाखाली ‘हेमलेखा’ ह्यांनी “सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता?” ह्या विपयावर “हिरण्यमयेन पात्रेण – – ” ह्या पंक्तींच्या आधारे काही विचार मांडले आहेत. त्यात शेवटी “- – – आज व्यवहारात वस्तूच्या यथार्थज्ञानासाठी पूर्वसंस्कारांचा पडदा (मनाचे conditioning) दूर करणे अत्यावश्यक आहे” असे त्यांना वाटत असल्याचे लिहिले आहे. व त्यानंतर त्या लिखाणासंबंधी आलेल्या दोन पत्रांना उत्तरे देताना जून ९९ च्या अंकात, “दैनंदिन जीवनातील अनुभव घेत असताना त्याचा (म्हणजे मनावरील पूर्व संस्कार (conditioning of mind) हाच सत्यदर्शनातील खरा अडथळा आहे याचा) सतत प्रत्यय येत असतो” असे म्हटले आहे.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ

प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे.

पुढे वाचा

विद्रोही विवेकवाद

दोन ईश्वरांतील विद्रोह हा माझा लेख एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित करून त्यावर संपादकीय स्पष्टीकरणही दिल्यामुळे आजचा सुधारक विषयीचा माझ्यातील आदर दुणावला. परंतु आपले (व वाचकांचेही) गैरसमज झालेले दिसतात. माझे स्पष्टीकरण प्रकाशित करावे ही नम्र प्रार्थना.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित-ब्राह्मण-हित केंद्री ह्या माझ्या वाक्यातील लाक्षणिक अर्थ लक्षात घ्यावा. (१) मानवहित केंद्री : साधुसंतांनी मानलेला ईश्वर. मध्यस्थ-पुरोहित-ब्राह्मणांना डावलून संतांनी सरळ आपापल्या ईश्वराशी (विठ्ठल, राम, कृष्ण) संवाद साधण्याचा सत्याग्रह, विद्रोह मांडला होता. त्यांचा ईश्वरसुद्धा भक्तांना अभिप्रेत असलेल्या रूपात येऊन चंदन घासणे, दळण दळणे, ढोरे ओढणे, वगैरे अति सामान्यांची कामे करीत होता.

पुढे वाचा

सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील आलेला आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्यकलापाचे यथायोग्य आकलन होण्यास साह्य होईल, त्याचप्रमाणे त्यांनी काढलेले निष्कर्प योग्य आहेत वा नाहीत याची चर्चा करण्यास मदत होऊ शकेल असे वाटल्यामुळे तो समग्र वृत्तान्त येथे प्रकाशित करीत आहोत.]

पुढे वाचा

सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग वैयक्तिक व सामाजिक जवाबदारी यांचा भेद लयास जाऊन सर्वच त्या वातावरणाचे कैदी होऊन वसतात याचा पुरावा महाराष्ट्राच्या इतिहासात चांगलाच प्रत्ययास येतो. एका युगपुरुषाच्या नेतृत्वामुळे मराठी समाजात एकोपा व स्वातंत्र्य यांचे अननुभूत वारे खेळू लागले.

पुढे वाचा