मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००१

पत्रसंवाद

सूचना
क) काही महिन्यांपूर्वी ‘सायंटिफिक टेंपर प्रमोशन ट्रस्ट’ने आम्हाला रु. ५००/- पुरस्कार दिला होता. आता या संस्थेने दिलेल्या इतर पुरस्कारांची माहिती उपलब्ध झाली आहे, ती अशी—-
१. डॉ. विठ्ठल प्रभु :– स्त्री-पुरुष-संबंधाविषयी वास्तवपूर्ण आणि सडेतोड विचार प्रचारासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गेली ४० वर्षे अविश्रांत धडपड
२. आजचा सुधारक :– गेली ५ वर्षे सातत्याने वैचारिक आणि संशोधनपर लेख लिहून पुरोगामी विचार प्रसृत करण्याबद्दल
३. मासिक चालना :– जातिभेद नष्ट करणे आणि पुरोगामी विचार गेली ५० वर्षे सातत्याने मांडणे ह्याबद्दल.
४. स्त्रीमुक्ति संघटना :– स्त्रियांचे प्र न झुंजारवृत्तीने सातत्याने मांडून त्याविषयीची जनजागृती करण्याबद्दल
५.

पुढे वाचा

तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे

(प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान ह्या ग्रंथ प्रकाशनसमयी दि. १७ डिसेंबरला, प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांनी केलेले भाषण)
हा गौरवग्रंथ आहे. रेग्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सिद्ध केलेला. रेगे तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या विद्यार्थिनी, नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक सुनीती देव यांनी तो संपादित केलेला आहे.
प्रा. रेग्यांचे समग्र तत्त्वज्ञान या ग्रंथात नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा-बाहेरही रेग्यांना ओळखणारे, चाहणारे, त्यांच्या विचारांकडे आणि मांडणीकडे आस्थेने आणि आपुलकीने पाहणारे पुष्कळ विद्वान आहेत. त्यांना आवाहन केले असते तर अधिक सांगोपांग, अधिक भरीव ग्रंथ निर्माण होऊ शकला असता.

पुढे वाचा

“AIDS”! : एडसची भयावहता

आज आपण २००१ च्या—-नव्या वर्षाच्या, नव्या शतकाच्या—-नव्या सहस्रकाच्या जानेवारी महिन्यात पोचले आहोत. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यात Information & Technology Industry च्या बरोबर Genetic Engineering पासून क्लोनिंग आणि मानवी Genome पर्यंत पोचलो आहोत. अनेक रोगांचा नायनाट करण्याचे सामर्थ्यही आपल्यात आज आहे. आपण बऱ्याच रोगांपासून बचाव करू शकतो. मनुष्याच्या आयुष्याची लांबी वाढत जाते आहे. लांबी बरोबरच व्याप्तीही वाढते आहे का? असा प्र न मला पडतो. या वैज्ञानिक प्रगतीच्या बरोबरीने मानवी संस्कृती, मानवी वर्तन यातही प्रगती झाली असती तर समाजाचा खऱ्या अर्थाने विकासही झाला असता.

पुढे वाचा

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ३)

४. शाळा–परिसर, सोयी, वातावरण १. अपुऱ्या सोयी —-
प्रोब सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली आहे. शाळेला क्रीडांगण असणे, शाळेत खडू–फळा असणे, ह्यासारख्या सोयीही वाढल्या आहेत. पण तरीही शाळेच्या एकूण घडणीसाठी ह्या सोयी फार अपुऱ्या आहेत. नियमानुसार शाळेला निदान दोन पक्क्या खोल्या, दोन शिक्षक, शिकवण्यासाठी फळे, नकाशे, तक्ते, ग्रंथालये यांसारखी साधने असायला हवीत. प्रोब राज्यांमधल्या अगदी मोजक्या शाळांमध्ये ह्या सोयी आहेत. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह ह्यासारख्या किमान गरजासुद्धा अनेक शाळा भागवत नाहीत त्यामुळे स्त्रीशिक्षिकांची फार अडचण होते. शाळेचा वापर इतर कामांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो.

पुढे वाचा

मी “गृहिणी’ होतो

एकोणीसशे सत्याण्णवच्या मार्च महिन्यात माझी पत्नी निवर्तली. घरात मी, वय वर्षे ६४, चार हृदयविकाराचे झटके आलेल्या माझ्या सासूबाई, वय वर्षे ७७ आणि माझा नोकरी करणारा अविवाहित मुलगा, वय वर्षे २७, असे उरलो. ओघानेच घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पत्नी जाण्याआधी तिच्या दुखण्यात पोळीभाजी करायला एक बाई ठेवल्या होत्या, ती व्यवस्था चालू ठेवली. मला स्वतःला सर्व स्वयंपाक येत असल्यामुळे सकाळची न्याहरी, दुपारचे चहा खाणे, रात्री काही लागले तर करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. सर्वसामान्यपणे आता मुलाचे लग्न करून टाकून प्रश्न सोडवावा असा विचार असतो.

पुढे वाचा

उपयोगितावादाचे टीकाकार

उपयोगितावाद म्हणजे काय याविषयी आजचा सुधारक या मासिकात आजपर्यंत अनेक वेळा लिहून झाले असल्यामुळे त्याच्या टीकाकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचारही अनेक वेळा केला गेला आहे. परंतु आज एक नव्या आक्षेपाचा विचार करायचा आहे. त्यामुळे त्याच्यावर घेतल्या गेलेल्या जुन्या आक्षेपांचा विचार त्रोटकस्याने केला तरी चालण्यासारखे आहे असे मी धस्न चालतो. उपयोगितावादावर गेल्या शंभरावर वर्षांत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. पण त्यापैकी बरेच आक्षेप शाब्दिक आहेत, आणि अनेक गैरसमजावर आधारले आहेत. उदाहरणार्थ एक आक्षेप असा होता की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे जे उपयोगितावादानुसार आपल्या कर्मांचे अंतिम उद्दिष्ट ते मुळात अशक्य आहे.

पुढे वाचा

मराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श

औद्योगीकरणाच्या प्रारंभापासूनच जगात सर्वत्र लोकसंख्या-केन्द्रीकरणात झपाट्याने वाढ झाली. जी ठिकाणे औद्योगिक दृष्टीने सोईची आणि मोक्याची होती तेथील लोकसंख्येची घनता सतत वाढत राहिली व तेथे महानगरे उत्पन्न झाली. भारतातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, पुणे, इंदूर, कानपूर, पाटणा, अहमदाबाद यांसारखी महानगरे गेल्या शतकात ४०-५० पटीने मोठी झाली आहेत. ज्या प्रमाणात या शहरांची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात या शहरांजवळ भूमी, धन, जलसंपदा, योजनाकौशल्य व कार्यक्षम स्थानिक शासन याचा कायमचाच अभाव राहला, त्यामुळे ही महानगरे मानवी समूहांचे कोंडवाडे झाल्याची आजची परिस्थिती आहे. उपरोक्त दहा महानगरांमध्येच भारतीयांची सुमारे ७-८ टक्के लोकसंख्या राहते हे लक्षात घेतल्यास या महानगरांची भीषण अवस्था हा नि िचतपणे एक राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतो.

पुढे वाचा

पुस्तक परिचय दि रिव्हर अँड लाइफ

आतापर्यंत नर्मदा नदीवरील सरदार धरणास विरोध करणारे आणि धरण-विरोधाची चिकित्सक तसेच विवेकी कारणमीमांसा देणारे बरेच साहित्य प्रकाशात आलेले आहे. बाबा आमटे (Cry the Beloved Narmada), क्लॉड अल्वारिस आणि रमेश बिलोरे (Damming the Narmada), अश्विन शाह (Water for Gujarat), जसभाई पटेल (Myths Exploded: Unscientific Ways of Big Dams on Narmada), हिमांशु ठक्कर (Can Sardar Sarovar Project ever be financed?), राहुल राम (Muddy Waters), विजय परांजपे (High Dams on the River Narmada), आणि यांखेरीज इतरांनीही या विषयावर वेळोवेळी पुरेसे सविस्तर लिखाण केले आहे.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल

रसेल यांना जर कुणी विचारले असते – रसेल यांचे नाव केवळ उदा-हरणादाखल आहे की, तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्र न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार कस्न मी माझे स्वतःचे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कुणीही लहान मोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते.

पुढे वाचा

औषधाविषयी

प्रत्येक मनुष्याला स्वतां औषधीशास्त्र समजावें हेच उत्तम. आत्मज्ञाना-पेक्षांहि ह्या शास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. पण आत्मज्ञान मिळविण्याची मनुष्ये जितकी खटपट करतात तिच्या शतांशहि औषधिज्ञान मिळविण्याची खटपट मनुष्ये करीत नाहीत. फार काय सांगावें, तज्ज्ञ डॉक्टर म्हणविणारेहि जशी खटपट करावी तशी करीत नाहीत. तशी त्यांनी खटपट केली असती तर आलोपथी, होमिओ-पथी, नेचरोपथी, हकीमी अशी अनेक औषधीशास्त्रे न राहातां एकच औषधिशास्त्र राहिले असते. कारण ईश्वरनिर्मित नियम सांगणारें असें औषधिशास्त्र गणितशास्त्रा-प्रमाणे एकच असले पाहिजे. तें एकच खरे शास्त्र कोणतें हे ठरविण्यापुरता तरी अभ्यास सामान्य माणसांनी करून त्या शास्त्राप्रमाणेच चिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांचा आश्रय त्यांनी करावा; नाहींतर अनेक प्रयोग आपल्या शरीरावर करवून घेण्याची व शेवटी निराश होण्याची व खरा वैद्य भेटला असतां त्याविषयींहि साशंक असण्याची आपत्ति उत्पन्न होते.

पुढे वाचा