मासिक संग्रह: सप्टेंबर, २०१०

संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग २)

शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न हे शब्दप्रयोग भेटले रे भेटले, की तपशिलांचा भडिमार व्हायला लागतो. शेतांचे इकॉनॉमिक आकार. सघन शेती. सिंचन आणि त्याचा अभाव. अतिसिंचन. माती अडवा-पाणी जिरवा. सेंद्रिय खते विरुद्ध रासायनिक खते. देशी वाणे-बियाणे. बीटी व तत्सम जीनपरिवर्तित वाणे-बियाणे. कीटकनाशके व त्यांचा अतिवापर. मित्रकिडी व मित्रपिके. सहकारी चळवळ. दलालांच्या चळती. सार्वजनिक वितरण. शेतमालाचे भाव आणि त्यातला शेतकऱ्यांचा वाटा. अनुदाने. अमेरिकन व युरोपीय अनुदाने. भारतीय शहरी प्रजेला मिळणारी अघोषित अनुदाने. अनुदान म्हणजे पांगुळगाडा. अनुदान म्हणजे बुडत्याला हात. दहा गुंठे. अडीच एकर. वनशेती.

पुढे वाचा

हिमालय वितळतो आहे

डेव्हिड ब्रीशीअर्स (D. Breashears) पाचदा एव्हरेस्ट चढून गेला आहे. १९८३च्या पहिल्या चढाईनंतर प्रत्येक फेरीत त्याला भूचित्रबदल आणि हिमनदांचे आकुंचन जाणवू लागले. जुनी छायाचित्रे आणि ताजी छायाचित्रे यांची तुलना करताना हिमनदांची प्रचंड पीछेहाट दिसू लागली. १९२१ साली जॉर्ज मॅलरीने घेतलेल्या एका छायाचित्राची (मॅलरीने छायाचित्र घेतले तिथूनच) नवी आवृत्ती हिमनद शंभर मीटर मागे गेल्याचे दाखवते. ब्रीशीअर्स आता यावर लक्ष ठेवण्यासाठी खास उपकरणे बसवत आहे.
जागतिक तापमान मोजायला १८८० पासून सुरुवात झाली. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते जानेवारी-जून २०१० हा १८७० पासूनचा सर्वांत गरम काळ होता.

पुढे वाचा

अणुकचरा आणि जैतापूर प्रकल्पः वास्तव व त्यासंदर्भातील एकवीस वैज्ञानिक प्रश्न

दै. लोकसत्ता दि.२१ जुलै २०१० मध्ये माजी शास्त्रज्ञ रवींद्र काळे यांनी ‘अणुकचरा : भीती व वास्तव’ हा लेख लिहिला आहे. या विषयावर वैज्ञानिक चर्चा होणे, विशेषतः जैतापूरच्या संदर्भाने, हे खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळात भारताच्या अणुकार्यक्रमाबाबत काटेकोर व परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा गुप्ततेच्या कारणांमुळे कधीच होऊ शकली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जैतापूर हा नागरी ऊर्जाप्रकल्प आहे आणि त्यामुळे त्यात गुप्ततेची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांबाबत गुप्तता राखणे हे लोकहिताचेही नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाच्या सर्व अंगांबाबत परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा झाल्याशिवाय असा प्रकल्प पुढे जाणे देशहिताचेही नाही.

पुढे वाचा

अणुकचराः भीती व वास्तव

अणुकचरा जनसामान्यांसाठी एक कठीण व अमूर्त विचारधारणा असल्याने त्याबद्दल गैरसमज पुष्कळ आहेत. तसेच त्यामुळे अणुकचऱ्याबद्दल भीती निर्माण होणेही स्वाभाविक आहे. या सगळ्यामागचे मुख्य कारण किरणोत्सार किंवा ‘रेडिएशन’ या शब्दाने मानवी मनात जी कल्पनासृष्टी रुजवलेली आहे तीत सापडते. अणुकचरा काय असतो, तो कसा निर्माण होतो व त्याची सुरक्षित साठवण व योग्य विल्हेवाट कशी लावता येते, हे जरा पाहू.
सन १९९१ मध्ये अमेरिकेच्या ‘ऊर्जाविषयक जाणीव’ समिती (USCEA) साठी केलेल्या सर्वेक्षणातून ‘किरणोत्सार’ हा शब्द शारीरिक इजा (उदा. कॅन्सर व इतर असाध्य रोग, मृत्यू इ.)

पुढे वाचा

अणुकचरा

[ अणुऊर्जा नेहेमीच वादग्रस्त राहिली आहे. ती तयार करायला लागणारे पदार्थ आणि तंत्रज्ञानच अणुबॉम्ब तयार करायलाही लागतात. त्यामुळे जबाबदार देशांना आपले अणुऊर्जा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तपासण्यांसाठी खुले करावे लागतात. यामुळे होणारा सार्वभौमत्वाचा संकोच, यावर मोठाले वाद झडतात. अणुऊर्जा बनवण्याशी संबंधित तंत्रज्ञान नवे व्यामिश्र आणि उच्च प्रतीचे विज्ञान वापरणारे असते. त्यामुळे ती बनवायला तज्ज्ञ तंत्रज्ञ घडवण्यापासून सुरुवात करावी लागते. त्या ऊर्जाउत्पादनात काटकसर, तंत्रज्ञानाबाहेरचे घटक, घाईगर्दी, यांना थारा नसतो. जर अशा गोष्टींना वजन देत स्थळकाळ वा खर्चाचा अयोग्य संकोच केला गेला, तर अपघात होऊ शकतात, व ते भीषण असू शकतात.

पुढे वाचा

मनोगतः ‘मेंदूतला माणूस’ विषयीचे

‘मेंदूतला माणूस’ हे डॉ. जोशी आणि श्री जावडेकर ह्यांचे पुस्तक वैद्यकीय, वैज्ञानिक तसेच मानवीय अभ्यासशाखांमध्ये क्रांती घडवून आणणारे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात, मानसशास्त्र आत्मा, मन आणि त्यानंतर जाणीव (Consciousness) इ.चा अभ्यास करीत असे. नैसर्गिक विज्ञानांच्या प्रसारानंतर, शास्त्राचा अभ्यासविषय निरीक्षणक्षम असला पाहिजे, हे लक्षात घेऊन मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून आजवर मानसशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. तथापि स्मृती, अवधान, कल्पन, भावना, विचार इ. मानवी प्रक्रिया निरीक्षणक्षम नसल्याने त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात अडचणी जाणवू लागल्या. ते मनाचे व्यापार समजले जात.

पुढे वाचा

एक साक्षात्कारी अनुभवकथन

साहित्यिक असो वा कलावंत असो, त्यांच्या प्रतिभेची किंवा सृजनाची निर्मिती कुठून होते ? ज्या मेंदूमुळे आपल्याला खरेखुरे माणूसपण लाभलेले असते त्या मेंदूतच जर काही बिघाड झाला तर कसली कला आणि कसले साहित्य! हा विचार मनात येताक्षणीच मी अलीकडे वाचलेले एक पुस्तक नजरेसमोर आले.
स्वतः ‘न्यूरोसायंटिस्ट’ असणाऱ्या सदतीस वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव होऊन अवघ्या चार तासांत तिची दारुण अवस्था होते. त्या अवस्थेत तिने जे चित्रविचित्र अनुभव घेतले, स्वतःला निकामी होण्यापासून वाचवण्याची जी धडपड केली ती इतरांनी समजून घेतली तर ते वेगळीच सावधगिरी बाळगून स्वतःला वाचवू शकतील, या तळमळीतून साकारली गेलेली एक विलक्षण साहित्यकृती म्हणजे डॉ.

पुढे वाचा

राजकारणातील नैतिकता

मूळ लेखक : मायकेल सँडेल

रीथ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान राजकारणातील नैतिकता (Morality in Politics) ह्या विषयावर होते. व्याख्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रसारित करण्यात आले; जिथे मायकेल सँडल होड्स् स्कॉलर म्हणून काही काळ राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेले सत्य आणि धैर्य (Truth and Courage) हे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना होड्स् स्कॉलरशिप दिली जाते. समाजाबाबत नागरिकांची कर्तव्ये कोणती हाच सँडल ह्यांच्या व्याख्यानमालेचा गाभा असल्याने ऑक्सफर्डच्या ‘होड्स् हाऊस’मधून त्यातील एक व्याख्यान प्रसारित होणे उचित होते.

सुरुवातीच्या प्रास्ताविकात स्यू लॉली ह्या संयोजिकेने सँडल लॉस एंजलीसमध्ये शाळेत शिकत असताना घडलेली एक घटना सांगितली.

पुढे वाचा

सूर्यकुलातील लोक

सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवराआवर झाली का नाही ? ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार ? अजून तुझी फुले माळून झालीत का नाही ? कशाला हवे कोठीला टाळे ? उघडीच ठेव दारे अजून तुला इथला मोह सोडवत का नाही? ते रुद्राक्ष, पोथ्या, ते खुंटीवर टांगलेले देव कालच म्हणालीस “कुणीही भले केलेले नाही.” मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार : “सूर्यकुलांतील लोकांना थांबणे माहीत नाही.” खाली कशासाठी हवे नाव ; निनावे म्हणतील म्हणून आपल्या हातांचे ठसे पुरेसे का नाहीत?

पुढे वाचा

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज ४१६४१०, मो.९४२१२२१७८२
‘गुंडोपंत’ या नावाने सायबरावकाशात काही अन्य संदर्भात आलेल्या प्रतिक्रियेत ‘आसु हिंदुत्वविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबाबत’ आक्षेप घेण्यात आला आहे. (जून २०१०, अंक २१.३) असे नमूद करून नंदा खरे यांनी आसुचे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला जे उत्तर दिले होते त्याचा त्यांना समजलेला गाभा म्हणून जी भूमिका स्पष्ट केली आहे ती पुढीलप्रमाणे ‘वाचकांपैकी, वाचक ज्या क्षेत्रातून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदू धर्मात जन्मलेले आहेत. त्यांना जागे करण्याने इतर १५% किंवा कमींनाही जाग येईल.

पुढे वाचा