मासिक संग्रह: ऑगस्ट, २०११

मराठी तरुण काय वाचतात ?

1.0. छप्पन्न तरुण-तरुणी. वये, 18 ते 25 वर्षे. शिक्षणे, बारावी ते पी.एच.डी. करत असलेले; पण डॉक्टर-एंजिनियरांची संख्या भरपूर. गावे, महाराष्ट्रभर विखुरलेली. निर्माणसाठी (हा एक युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम आहे, अभय व राणी बंग यांनी सुरू केलेला.) एकत्र आलेली ही मुले. एका अर्थी महाराष्ट्रातल्या संवेदनशील, सामाजिक जाणिवा जाग्या असलेल्या मुलीचा हा छेद किंवा सूचिपरीक्षा.
1.1. तर या मुलांना दोन याद्या घडवायला सांगितले. प्रत्येकाने आपल्याला सर्वांत आवडलेली पाच पुस्तके आणि पाच चित्रपट नोंदायचे होते. सध्या माणसे वापरत असलेली ही ज्ञान कमावण्याची व मनोरंजन करवून घेण्याची दोन महत्त्वाची माध्यमे.

पुढे वाचा

प्रकाशित झाले मेंदूच्या अंतरंगात,

[ एक साक्षात्कारी अनुभवकथन या नावाने चित्रा बेडेकरांचा लेख आसुच्या —– अंकात छापला गेला होता. बेडेकरांनी आता ती पूर्ण कहाणी तपशिलात पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्याचा हा त्रोटक परिचय. – सं. ]
माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, अनाकलनीय मन, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व, त्याचं अवघं अस्तित्व हे सर्व कशात सामावलंय याचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याचं मूळ मेंदूत सापडतं. ‘मी’ म्हणून आपण अस्तित्वात असतो, आपल्याभोवती जग असतं, ते जग आपल्याला कसं वाटतं, कसं जाणवतं किंवा कसं भासतं हे आपल्या मेंदूतल्या क्रियाप्रकियांवरून ठरत असतं.
कॉर्पस कॅलोजमने जोडले गेलेले मेंदूचे दोन अर्धगोल बाहेरच्या जगाचं आपल्याला एकसंध आकलन करून देण्यात वाकबगार असतात.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण – Putting Women First, Women and Health in a Rural Community.

माणसाच्या आरोग्याची पाळेमुळे तो राहतो, त्या भोवतालात दडलेली असतात. त्याचे कुटुंबातील व समाजातील स्थान, त्याचा आर्थिक स्तर, आसपासचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण, तसेच त्याच्या मनातील श्रद्धा/विश्वास हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. म्हणूनच पश्चिमी वैद्यकशास्त्राचा आद्य जनक हिपोक्रेटस म्हणाला होता. “माणसाला कोणता आजार झाला आहे हे जाणण्यापेक्षा कोणत्या आणि कशा प्रकारच्या माणसाला आजार झाला आहे, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.”
वरील विधान निर्धन, ग्रामीण स्त्रियांना अधिक प्रकर्षाने लागू होते, कारण अशा स्त्रियांभोवती रूढी, परंपरा, सामाजिक संकेत, सांस्कृतिक निर्बंध यांचा विळखा अधिक घट्ट असतो.

पुढे वाचा

पॉपरचा खंडनक्षमता हा निकष

‘विवेक व विज्ञान’ ‘श्रद्धा व अध्यात्म’ हा वाद अनेक शतकांपूर्वी चालू झाला व अजूनही चालू आहे. या प्रक्रियेमध्ये पाश्चात्त्य-भारतीय हा फरक स्पष्ट दिसतो. युरोप अमेरिकेतील वादांत लोक केवळ पुरातन तत्त्वज्ञानावर विसंबून राहत नाहीत. दोन्ही पक्षाचे लोक विरुद्ध पक्षातील आजच्या नवीन विचारांचा संदर्भ लक्षात घेऊन वाद-प्रतिवाद करतात. भारतात ही स्थिती नाही. उदाहरणार्थ, श्रद्धा-धर्म-अध्यात्म मानणारे लोक विवेकी साहित्य वाचत नाहीत. एवढेच नव्हे तर अशा साहित्यात नवनवीन विचारांची भर पडत आहे, हेही त्यांना माहीत नसते, व माहीत करून घ्यायचे नसते. गेल्या सहासात दशकांत नव्याने आलेल्या तत्त्वांची संक्षिप्त माहिती सोप्या शब्दांत देण्याकरिता हा लेख लिहीत आहे.

पुढे वाचा

शिक्षणहक्क कायदा : पाच निवडक मुद्दे

बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा कायदा एप्रिलपासून लागू झाला. गेल्या एक वर्षात ह्या कायद्याची माहिती देणारे तसेच त्याच्या अनेक पैलूंची चर्चा करणारे अनेक लेख, पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अतिशय क्रांतिकारक बदल घडेल अशा आशावादापासून विषमतेला बळकट करणारा कायदा अशा टोकाच्या प्रतिक्रिया ह्या चर्चामध्ये दिसून आल्या आहेत. परंतु ही सर्व माहिती परत एकदा संक्षिप्त रूपात सांगणे हा काही ह्या लेखाचा हेतू नाही.
सोमवारपासून मी काय करू? अशा अर्थाचे शीर्षक असलेले जॉन होल्ट या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाचे एक इंग्रजी पुस्तक आहे. लांबलचक, उलटसुलट तात्त्विक चर्चा झाल्यावर आता नक्की काय करू हे शिक्षकांना, पालकांना समजत नाही ह्याकडे त्या नावाचा रोख आहे.

पुढे वाचा

धनशुद्धीः स्वप्नरंजन आणि वास्तविकता

प्रामाणिक नागरिकाला एकीकडे सरकारदप्तरी छळवणूक सहन करावी लागते आहे आणि दुसरीकडे विक्रमी आकड्यांचे घोटाळे त्याच्या कानांवर (वाहिन्यांमुळे डोळ्यांवरही) पडत आहेत. संताप होणे अगदी स्वाभाविक आहे. या संतापातून निर्माण होणारी भ्रष्टाचार-विरोधी राजकीय ऊर्जा मोठी आहे व मोलाची आहे. ही ऊर्जा, सध्याची भ्रष्ट-दुरवस्था सुधारणाऱ्या विधायक प्रक्रियेचे इंजिन चालविण्यात वापरायची की डोळे दिपवणाऱ्या(स्पेक्टॅक्युलर) व दणदणीत काही केल्यासारखे वाटावे अशा विघातक स्फोटात उधळायची? हा खरा प्रश्न आहे. परंतु वलयांकित, एककल्ली, एककलमी आणि ‘एककिल्ली’ नेतृत्वाखाली होणारी आंदोलने, ही ऊर्जा स्फोटात उधळण्याचेच काम करत आहेत. इतकेच नव्हे तर ते समांतर अर्थव्यवस्थेचे कारण म्हणजे ‘उच्चपदस्थांचा लोभीपणा’ व उपाय म्हणजे त्यांना वठणीवर आणणे’ असे सुटसुटीत आकलन प्रसृत करून ‘अर्थशास्त्रीय निरक्षरता’ अधिकच वाढवीत आहेत.

पुढे वाचा

ग्रामीण संस्कृती

‘संस्कृती’ हा मोठा सर्वसमावेशक शब्द आहे! त्यात काय काय अंतर्भूत होते हे एखाद्या व्याख्येत बसविणे कठीण! तरीपण हा शब्द सर्रास वापरला जातो व बहतेक ठिकाणी त्याचा उपयोग योग्य त-हेनेच झालेला असतो. एका मताप्रमाणे या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात व संदर्भाने त्याचा अर्थ लावला जातो! साधारणपणे संस्कृती म्हणजे ‘कोणत्या प्रसंगी कोणा व्यक्तीने कसे वागावे, बोलावे विचार करावा या बाबतीत असलेले संकेत’ अशीही या शब्दाची व्याख्या होऊ शकेल! आता ग्रामीण संस्कृती अथवा ग्रामीण सांस्कृतिक जीवन यात अनेक भाग येऊ शकतात, धार्मिक, शैक्षणिक, श्रमिक, संगीतविषयक खेळविषयक, शेती-विज्ञानविषयक, राजकारणाविषयक इत्यादी.

पुढे वाचा

व्याघेश्वरीचे पुराण

या वर्षाच्या सुरुवातीला Battle Hymn of the Tiger Mother नावाचे एक पुस्तक ब्लूम्सबरी पब्लिशिंग तर्फे बाजारात आले आहे, आणि बालसंगोपनाबद्दलचे पुस्तक म्हणून बहुवितरितही होते आहे. त्या पुस्तकाच्या लेखिका अॅमी चुआ ह्या मूळ चिनी वंशाच्या आणि त्यांच्या वडलांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या दोघी मुलींना खास चिनी पद्धतीने शिस्तीच्या धारेवर धरून कसे वाढवले, आणि मुलांना वाढवण्याची ही चिनी पद्धतच कशी योग्य आणि किफायतशीर आहे हे त्यांना सांगायचे आहे. पुस्तकाची सुरुवात त्यांनी तशीच केली आहे. पुस्तक लिहिण्याच्या भरात आपल्या विषयाशी सुसंगती ठेवणे मात्र त्यांना साधलेले नाही.

पुढे वाचा

नियंत्रण आणि विश्वास

नियंत्रणाच्या हेतूबद्दलची शिक्षकाची कल्पना काय, यावर बरेच काही अवलंबून असते. नियंत्रणाची गरजच नसल्याचे लक्षात आणून देणे हाच त्याचा अंतिम हेतू असेल; मुलांनी ठाम, समर्थ, जबाबदार बनावे असे शिक्षकाला वाटत असेल आणि ती तशी बनू शकतात असा त्याला विश्वास असेल, तर शिकण्याला मुलांनी नकार देण्याचा असा धोका खूपच कमी होईल याची मला खात्री आहे. शिक्षक मुलांची कदर करतात का आणि मुलांना त्याची जाणीव आहे का, या मुद्द्याकडेच आपण पुन्हा एकदा येतो. एवढी एक गोष्ट सांभाळली गेली तर बांधीव वातावरणात शिकण्यास मार्गदर्शन करणे तुरुंगरक्षकाच्या कामासारखे भयावह वाटणार नाही.

पुढे वाचा