मासिक संग्रह: जून, २०१४

प्रिय मोदी,

भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्यकांच्या मनावर ओरखडे उमटलेले आहेत. फक्त मुस्लिमच नव्हे तर पश्चिम पंजाबमधून विस्थापित झालेले हिंदू व शीख तसेच काश्मीरी पंडितही असे ओरखडे बाळगून आहेत. खऱ्याखुऱ्या किंवा घडवून आणलेल्या चिथावणीमुळे अचानक दंगली भडकण्याचे व त्याचा अनेकपटीने, सूड घेण्यासाठी महिलांना लक्ष्यित केले जाईल ह्याचे भय सगळ्यांच्या मनात आहे. दलित, आदिवासी व विशेषतः स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील मिनिटामिनिटाला अवहेलना व शोषण ह्यांचाच अनुभव घेत आहेत. अवमान, भेदाभेद आणि दडपशाही ह्यांच्यामुळे सतत मानगुटीवर बसणारी अस्वस्थता ही नागरिक म्हणून द्यावयाचा साधा सन्मान, नीतिमत्ता आणि माणुसकी हिरावून घेणारीच असते.

पुढे वाचा

स्वच्छतेची घडी

दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट.

सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या होत्या. ती त्यांना घाणेरडा फडका म्हणत होती. पाळीसाठी बाजारू पॅड का वापरीत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली, मी जर ते वापरले तर आपल्याला घरात दूध आणता येणार नाही.

पुढे वाचा

ज्यू आणि ख्रिस्ती कल्पना

पॅलेस्टाइनमधील ज्यू विचारवंत, नंतरच्या काळातील ख्रिस्तप्रणीत धर्म आणि तज्जन्य विवेचन ह्यातून आलेले इतिहासविषयक सिद्धान्तसुद्धा असेच ईश्वरी सूत्राच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. ज्यू तत्त्वज्ञांच्या मते मानवाचा आणि मानवाच्या इतिहासाचा परमेश्वर हा जनकच आहे. माणसाच्या इतिहासातील सर्व चढउतार, यशापयश हे ईश्वरी हस्तक्षेपानेच होत असतात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्या आज्ञा प्रत्यक्षात माणसांना कधी धर्मगुरूंमार्फत किंवा उपदेशकांमार्फत समजतील, तर कधी राज्यकर्त्यांमार्फत. धर्मोपदेशक आणि राजे हे दोघेही ईश्वरांचे अधिकृत प्रतिनिधीच आहेच. पुष्कळदा दुष्काळ, युद्ध वगैरे ज्या आपत्ती येतात त्यांत ईश्वराचा हेतू माणसांना धडे शिकविण्याचा असतो.

पुढे वाचा

नेहरू नसते तर

(अनुवाद: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) इ.स. 2014 हे वर्ष जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यस्मरणाचे पन्नासावे वर्ष आहे. योगायोग असा की यंदा 14 नोव्हेंबरला त्यांची 125 वी जयंती आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महान् व्यक्तींपैकी इतक्या प्रेमादराने ज्यांची अजूनही आठवण काढली जाते असे नेहरूंसारखे महापुरुष विरळाच!

अर्थात आपल्याला हेदेखील विसरून चालणार नाही की त्यांच्या प्रदीर्घ व उज्ज्वल राजकीय कारकीर्दीत त्यांना बहुसंख्य देशवासीयांचे अलोट प्रेम मिळाले असले तरी आज मात्र देशातील अनेकजण भारतातील बहुसंख्य समस्यांबद्दल नेहरूंनाच जबाबदार धरतात. आता तर त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले आहे.

पुढे वाचा

ग्रीक आणि रोमन कल्पना

प्राचीन ग्रीक लोकांनी विश्वाविषयी आणि मानवी जीवनाविषयी अनेक अंगानी व अनेक दृष्टींनी विचार केला. अनेक ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत ग्रीकांचे विचार तर्कशुद्ध, मूलभूत आणि पुरोगामी असे होते. रोमन लोक हे ग्रीकांइतके ज्ञानपिपासू नव्हते. ते अधिक व्यवहारी होते, तथापि रोममध्येही अनेक वचारवंतांनी ग्रीकांचे विविधा विचार आत्मसात करून पुढे त्यांचा विस्तार केलेला आढळून येतो.

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 4 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ‘मतसंग्रामा’च्या बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाच्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत. अंदाज / भाकितं निकाल निष्कर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही चूक कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजप 282 चूक काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही युती 334+ चूक भाजपला 155 ते 165 जागा 282 चूक काँग्रेसला 115 ते 126 जागा 44 चूक राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा 6 चूक शिवसेनेला 10 ते 12 जागा 18 चूक समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा 5 चूक बसपाला 16 ते 18 जागा 0 चूक महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूक आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही बरोबर वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल बरोबर वाराणसीत त्यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेल फरक 371784 चूक एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही बरोबर पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढत फरक 315769 चूक विश्वजित कदम यांची सरशी होणार चूक मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.

पुढे वाचा

इस्लामी कल्पना

इस्लामी संस्कृतीच्या क्षेत्रातही अशीच ईश्वरनिष्ठ आणि कालचक्र निष्ठ इतिहासमीमांसा आढळते. तथापि इस्लामी विचार मुख्यतः किंवा जवळजवळ सर्वस्वीच सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वराच्या अल्लाच्या अनुरोधानेच मांडलेला आहे. चौदाव्या शतकातील इब्न खाल्दुनने निरनिराळ्या राज्ये नि सत्ता ह्यांचे उदय, वृद्धी व अस्त ह्यासंबंधी काही ठोकळ नियम सांगितले. पण तोही कुराणप्रणीत अल्लाच्या सामर्थ्याविषयी शंका उपस्थित करू शकत नव्हता. हा एक लहानसा प्रयत्न सोडला, तर कुराण व इतर प्राचीन इस्लामी साहित्य ह्यांतून प्रसंगवशात जे इतिहासभाष्य आलेले दिसते ते सगळे ईश्वरी इच्छेच्या पायावर आधारलेले आहे. मानवी जीवनात, समाजांच्या, राष्ट्रांच्या जीवनात बदल घडतात, स्थित्यंतरे होतात.

पुढे वाचा

‘शब्दानंदोत्सव’

[इंग्रजी शब्दांचे हिंदी-मराठी अर्थ तपासत असताना, त्या शब्दांच्या व्युत्पत्तीच्या अनुषंगाने कोशकाराला कित्येक रंजक गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यांविषयी हा लेख आहे. सामंतबाईंच्या निधनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमिताने त्यांची आठवण करण्यासाठी हा लेख प्रकाशित करीत आहोत. कार्यकारी संपादक]

कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकात शकुंतलेची सासरी पाठवणी करण्याचा एक प्रसंग आहे. निसर्गसुंदर आश्रमात वाढलेल्या आपल्यासारख्या निरागस युवतीचा राजधानीसारख्या गजबजलेल्या शहरात आधुनिक सभ्यतेत मुरलेल्या राजवाड्यात कसा निभाव लागणार अशी चिंता करणारी शकुंतला म्हणते – कथमिदानीं मलयतटोन्मूलिता चंदनलतेव देशांतरे जीवितं धारयिष्ये? पण माहेराहून सासरी जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ होणाऱ्या मुली ज्याप्रमाणें थोड्याच दिवसांत सासरीं रमतात आणि तिथल्याच होऊन जातात त्याप्रमाणें कित्येक वनस्पतीदेखील एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्या तरी अनेकदा त्या देशांतरींच्या वातावरणाशीं एकरूप होऊन जातात.

पुढे वाचा

बौद्धवाद आणि मेंदू

गेल्या अनेक दशकांपासून काही मेंदूवैज्ञानिक आणि बौद्धधर्मीय अभ्यासकांनी बौद्धवादाचा आणि मेंदूविज्ञानाचा संबंध जोडला आहे. मला मात्र खाजगीरीत्या हा संबंध मंजूर नव्हता आणि तो मी नाकारत आलेलो आहे. अशा प्रकारे विज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रकार इतर अनेक धर्मांबाबतही होत आलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या बाबतीतही खोलात जाऊन वैज्ञानिकरीत्या तपासणी केल्यास त्यातला फोलपणा उघड होईल याची मला खात्री वाटत होती.

‘जेव्हा धार्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक शोधाद्वारे पाठिंबा मिळतो तेव्हा त्या धर्मातील अनेकजण असा दावा करतात की पहा, आमचा अनुभव हा सत्यपरिस्थितीवर आधारलेला आहे. पण वैज्ञानिक पुरावा जर त्यांच्या पूर्वग्रहित धार्मिक मतांच्या कितीही विरोधी आला तर तो अशा धार्मिक लोकांना पटत नाही.

पुढे वाचा

पुरुषांचे गट नेहमी एकेकट्या स्त्रियांवरच हल्ले का करतात ?

डेव्हिड कियॉस्क हे खून व बलात्कार ह्यांच्यासारख्या हिंसक गुन्ह्यांवरचे तज्ज्ञ समजले जातात. त्यांनी मॅसेच्युसेट्स विद्यापीठात ह्या विषयावरील अभ्यासक्रम बावीस वर्षे शिकवला. विद्यापीठात न्यायवैद्यक सल्लागार म्हणून काम करीत असताना त्यांनी अमेरिकन लष्करी व कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांबरोबरही काम केले. अमेरिकेत 2003 साली लैंगिक कांड झाल्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांचे प्रबोधनही केले आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर ‘इंडिया इंक’ ने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा स्त्रियांवर हल्ला करण्याच्या मागे पुरुषांची नेमकी प्रेरणा काय असते. व सरकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रकारावर आळा कसा घालता येईल ह्यावर त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावर डॉ.

पुढे वाचा