मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०१६

संपादकीय 

‘आजचा सुधारक’च्या तरुण चमूने घडवलेल्या विचारभिन्नता विशेषांकाचे आमच्या नव्या-जुन्या वाचकांनी जोरात स्वागत केले. नागपूर येथे ह्या अंकाचे एका देखण्या कार्यक्रमात विमोचन झाले. त्यानिमित्त ‘आजचा सुधारक’ व ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या भारतीय समाजात वेगळे मत मांडण्याचा अवकाश आक्रसत चालला आहे का?’ ह्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विभिन्न विचारधारांशी संबंधित वक्त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. ह्या सर्व बाबी आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातही सौहार्द व परस्पर संवादाची परंपरा अद्याप तग धरून आहे असा आशावाद जागवतात.

पुढे वाचा

जसे 

मला नाही ऐकू येत खूपसे आवाज 

मुंग्यांच्या साखर कुरतडण्याचा आवाज 

पाकळ्या उमलतात एक-एक त्यांचा आवाज 

गर्भात पडतो जीवनाचा थेंब त्याचा आवाज 

पेशी नष्ट होतात आपल्याच शरीरात त्याचा आवाज 

या वेगातल्या, खूप वेगातल्या पृथ्वीच्या झंझावातात 

मला ऐकू येत नाहीत खूप आवाज 

तसंच तर 

असणार त्याही लोकांच 

ज्यांना ऐकू येत नाही गोळ्या चालवण्याचे आवाज 

तात्काळ 

आणि विचारतात कुठे आहे पृथ्वीवर किंकाळी ? 

(अनुवाद सतीश काळसेकर) 

नव्या वसाहतीत या साहित्य अकादमीतर्फे २०११ साली प्रकाशित पुस्तकातून साभार 

स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग: नक्की काय समजायचे? 

तुरुंग, गुन्हेगारी, वचक, सामाजिक मानसशास्त्र 

तुरुंगरक्षकांमध्ये असलेले क्रूरपणा व आक्रमकता हे गुण ‘स्वाभाविक’ असतात की परिस्थितिजन्य ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रयोगाचीही कहाणी. प्रयोगासोबातच प्रयोगकार्त्यांचे मानस उलगडून दाखवणारी व आपल्या आसपास असणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे सुचविणारी.. 

१७ ऑगस्ट १९७१ च्या सकाळी, कॅलिफोर्नियामधील पालो अल्टो परिसरात नऊ तरुणांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकसत्र चालवलं. त्या तरुणांवर कलम २११ आणि ४५९ (सशस्त्र दरोडा आणि घरफोडी) यांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला होता. रीतसर झडती, बेड्या वगैरे सोपस्कार उरकून त्यांना वाजत गाजत (सायरनच्या आवाजात) पालो अल्टो पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पुढे वाचा

संधिकाल 

स्वातंत्र्यलढा, सत्याग्रह, टिळक, गांधी 

लोकमान्य ते महात्मा ह्या दोन युगांमधील स्थित्यंतराचा हा मागोवा. ह्या दोन्ही लोकोत्तर नेत्यांमधील साम्य-भेद व त्यांचे परस्परांविषयीचे मूल्यांकन टिपणारा. 

इ.स. 1914 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण होते. मंडालेमधील सहा वर्षांचा कारावास भोगून 16 जून 1914 रोजी लोकमान्य टिळक मायदेशी परतले. याच वर्षी साउथ अफ्रिकेतील सत्याग्रहाची यशस्वी सांगता होऊन गांधीदेखील भारताला परतण्यासाठी निघाले. परंतु वाटेत इंग्लंडला पोहोचता पोहोचता पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि गांधीचे स्वगृही परतणे जानेवारी 1915 पर्यंत लांबले. इ.स. 1914 ते 1920 हा कालखंड स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील संधिकाल होता.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती (भाग २)

: वादपद्धतीशी समांतर संकल्पना आणि वादपद्धतीचे महत्त्व :

चर्चापद्धती, वाद, ब्रह्मोद्य, वाकोवाक्यम्, ब्रह्मपरिषद 

ह्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ ह्या संकल्पनेच्या स्वरूपाची चर्चा केली. भारतीय परंपरेत चर्चेच्या इतरही काही पद्धती होत्या, ज्यांना चर्चाविश्वात प्राधान्य मिळाले नाही. त्या सर्व संकल्पनांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अंतर्गत संघर्ष झाला असावा, किंवा त्यांच्या स्वरूपाविषयी अधिक चर्चा होऊन त्यांच्यात अधिक विकास होऊन ‘वाद’ ही संकल्पना सुनिश्चित झाली असावी. त्या संकल्पनांचा हा अल्प परिचय. 

कोणत्याही चर्चेत, वादात प्रश्न विचारणे अपरिहार्य असते. आपण प्रश्न म्हणजे काय?’

पुढे वाचा

पाळत 

संगणक, संगणकाची सर्वव्यापकता 

आपल्या सर्व हालचाली व व्यवहार ह्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे व ती माहिती परस्पर कंपन्या किंवा सरकारला पुरवली जात आहे. कोणत्या जहागिरदाराची पळत सहन करायची, एव्हढेच आपण ठरवू शकतो. ह्या वास्तवाचे आपल्याला भान करून देणारा ब्रूस श्रीयरच्या ‘डेटा अँड गोलायथ’ (प्रकाशक नॉर्टन बुक्स) या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख, 

गेल्या वर्षी माझा फ्रिज बिघडला तेव्हा दुरुस्ती करणाऱ्याने त्याचा संगणक बदलला. मला वाटत होते तसा फ्रिज संगणकाने चालवला जात नव्हता, तर संगणकच यंत्राद्वारे अन्न थंड ठेवत होता.

पुढे वाचा

युद्ध माझं सुरू

स्त्री, दुःख, हिंसा, बलात्कार, समस्या
—————————————————————————–
पुण्यात राहणारी लष्करातली उच्चपदस्थ महिला अधिकारी परळी वैजनाथहून परतत असताना तिच्यावर 2010 च्या एप्रिल महिन्यात चार दरोडेखोरांनी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर खचून न जाता तिनं या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर तिला न्याय मिळाला आहे. या चौघा नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालानं दिली आहे. या सहा वर्षांच्या कालखंडात तिला कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं, तिलाकाय काय सहन करावं लागलं, पोलिस खात्याचं सहकार्य कसं मिळालं या सगळ्याचा तिच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलून घेतलेला हा वेध…
—————————————————————————–
लष्करातली त्रेचाळीसवर्षीय उच्चपदस्थ महिला अधिकारी परळीवैजनाथच्या दर्शनाहून पुण्याला परतत असताना चार तडीपार गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पुढे वाचा

धर्म-विचार

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हें सगळें तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचें समाधान होतें. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणें सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थअसा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवतो, देवाचें नांव घेतो तेव्हा त्याला बरें वाटतें. म्हणून तो एकादशीच्या दिवशीं देवाच्या नांवाने उपवास करतो. तसें पाहिलें तर एकादशीच्या उपवासानेहि त्याला पूर्ण समाधान मिळत नसतें.

पुढे वाचा

जागतिकीकरणाच्या आवारात खेडे

येत्या काळात चार मोठे औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पहिला दिल्ली ते मुंबई कॉरिडॉर, दुसरा अमृतसर ते कोलकाता, तिसरा चेन्न ते बंगलोर आणि चौथा मुंबई ते बंगलोर. यामद्ये देशाची 40 टक्के जमीन सामावलेली आहे. ही सर्व जमीन संपादित होणार नसली तरी त्या पट्ट्यात 100 शहरे नव्याने वसवली जाणार आहेत. त्यासाठी प्रचंड जमीन लागणार आहे. एकट्या दिल्ली ते मुंबई कॉरिडॉरचे प्रभावित क्षेत्र आहे 4 लाख 34 हजार 486 चौ.कि.मी. यामध्ये 24 विभाग पाडण्यात आले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी जमीन संपादन होऊ घातले आहे.

पुढे वाचा

प्रतिसाद

१ आजचा सुधारकच्या विचारभिन्नता विशेषांक वाचला. अंकातील लेख चांगले असले आणि गूगलवर शोधून इंग्रजीत मिळणाऱ्या माहितीचे मराठीतून केलेले संकलन म्हणून महत्वाचेही असले तरी समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये (शिवाय भविष्याचा वेध घेणारं लेखनही अंकात नाही) त्यामुळे खरं सांगायचं तर किंचित निराशा (नि अपेक्षाभंग) झाला. मी जेव्हा म्हणतो की समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये, तेव्हा मला बरंच काही म्हणायचंय. आधी एक स्पष्ट करतो की यातील बहुतांश लेख ‘महत्त्वाचे’ आहेत.

पुढे वाचा