मासिक संग्रह: एप्रिल, २०२३

मनोगत

‘आजचा सुधारक’ विवेकवादी चिंतनाला वाहिलेले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवेकाधीष्ठित विचारांना यात प्राधान्य असणे साहजिकच आहे. १८ डिसेंबरला ब्राइट्स सोसायटीने पुणे येथे ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ आयोजित केली होती. परिषदेच्या पहिल्या भागात नास्तिकता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्याला मिळणारे आणि मिळायला हवे असणारे कायद्याचे संरक्षण यावर आमंत्रितांची भाषणे झाली. तर दुसऱ्या भागात काही चर्चासत्रे त्यांनी घेतली. या साऱ्याचे समालोचन वाचकांपर्यंत पोहोचावे असे आम्हाला वाटले. ब्राइट्स सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी या अंकाच्या संपादनाची जबाबदारी घ्यावी असे आम्ही सुचवले. कुठलेही चांगले काम हे एकेकट्याने केले तर मोठे होत नसते.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांचे भाषण

‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित या नॅशनल एथिस्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटनसमारंभाच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच इतर सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी भारतीय सांवैधानिक व्यवस्थेने दिलेल्या अधिकाराला मूर्त स्वरूप दिलेले आहे. संस्थेची नोंदणी करून जे काही अधिकार, स्वातंत्र्य मिळवलेले आहे ते पुढच्या काळात ब्राइट्सच्या वतीने चाललेल्या, चालवायच्या कामाला एक मोठा अवकाश निर्माण करून देऊ शकेल. तो अवकाश काय असू शकतो? कदाचित ॲड. असीम आपल्याला सांगतील. पण एक महत्त्वाची पायरी आपण ओलांडली आहे आणि ती पायरी ओलांडल्यामुळे आता आपल्या संसदेला पर्याय म्हणून ‘धर्मसंसद’ उभी करणाऱ्यांनादेखील आपण ‘काटे की टक्कर’-अगदी कॉन्स्टिट्यूशनली आणि लीगली-देऊ शकतो; अनुषंगाने आपली पायाभरणी झाली आहे असं म्हणू शकतो आणि यासाठी पुन्हा एकदा ब्राइट्सच्या सात-आठ हजार सहकाऱ्यांचं, सदस्यांचं, हितचिंतकांचं अभिनंदन.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांच्या भाषणाचे समालोचन

डिसेंबर २०२२ च्या १८ तारखेला पुण्यातल्या गोखले सभागृहात राष्ट्रीय नास्तिक परिषद थाटात सम्पन्न झाली. परिषदेची सुरुवात अविनाश पाटील यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. अविनाश हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ब्राइट्सचे जुने स्नेही आणि सहयोगी आहेत. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आपल्यातून हिरावले गेले, त्यावेळी बसलेल्या तीव्र धक्क्यातून आणि कठोर अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्यासाठी अविनाश यांनी अंधश्रद्धांशी लढ्याचा अधिक तीव्र निर्धार केला. दाभोलकरांची हत्या ही कदाचित अजूनही त्याचा ‘तपास’ करणाऱ्या CBI साठी एक रहस्य असेल, पण जगभरच्या विवेकवादींसाठी ते तसे नाही.

पुढे वाचा

शिवप्रसाद महाजन ह्यांचे भाषण

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या या ब्राइट्स सोसायटीच्या परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रविवारची सकाळ असूनदेखील सर्वांनी उत्साह दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. ब्राइट्स सोसायटीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. जे अनेक विचारवंत, लेखक, मान्यवर यांची भाषणं ऐकत आणि व्हिडीओ पहात मी इथपर्यंत आलो आहे, ते बरेच मान्यवर समोर बसलेले पाहून थोडं दडपण येतं. तसचं दडपण मलाही आलेलं आहे. ब्राइट्स सोसायटीने आजपर्यंत अनेक परिषदा-मेळावे केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या, त्या प्रकाशित केल्या, पुस्तकसुद्धा प्रकाशित केलेलं आहे.

पुढे वाचा

असीम सरोदे ह्यांचे भाषण

कुमार नागे यांची एक वेगळी स्टाईल आहे, जी कोणालाही कॉपी करता येत नाही आणि अशी त्यांनी माणसं जोडलेली आहे. तर ही ताकद आणि सम्यक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषत: सामाजिक आणि रचनात्मक काम करताना. मंचावर उपस्थित मान्यवर आणि पुढे बसलेले मित्र-मैत्रिणींनो, मी आज काही महत्त्वाचं बोलणार आहे असं सांगितल्यामुळे खूप मोठी जबाबदारी येऊन पडते की महत्त्वाचंच बोलायला पाहिजे, त्यामुळे ते ऐकल्यावर तुम्हीच ठरवा की ते महत्त्वाचं आहे का? तर मागेही मी या विषयावर बोललो होतो, पण काही नवीन गोष्टी आहेत त्यांबद्दल उल्लेख करायला पाहिजे.

पुढे वाचा

उत्तम निरौला ह्यांचे भाषण

नमस्कार, आणि आपणां सगळ्यांनाच धन्यवाद. विशेषकरून कुमारजींना, विशेष अतिथी अलकाजी, प्रसन्नजी, अविनाश पाटीलजी, असीमजी, प्रो. नायक-ज्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो आहे आणि महाजनजी-यांनी मला अनेक प्रकारची मदत केली आहे. तसेच या नास्तिक परिषदेत आलेले सुज्ञ, विचारवंत यांचेही आभार. 

या परिषदेत सहभागी होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी भारतात अनेकदा आलो आहे, परंतु अशाप्रकारे लोकांशी संवाद साधण्याची माझी ही पहिलीच वेळ! मी भारतात साधारणपणे ज्या कार्यक्रमांसाठी येतो, त्या कार्यक्रमांत लोक भरपूर असतात, पण तिथे संवाद कमी आणि भाषणं जास्त होतात. इथे मात्र संवादाला अधिक जागा दिलेली दिसते आहे.

पुढे वाचा

नरेन्द्र नायक ह्यांचे भाषण

नमस्कार मित्रांनो. आज या नास्तिक परिषदेसाठी तुम्ही मला आमंत्रण दिले, याबद्दल धन्यवाद. हा माझा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा मला आमच्या चळवळीचा सन्मान वाटतो. गेली अनेक वर्षे जवळजवळ ८० संस्थांचे मिळून FIRA हे संघटन आम्ही चालवतो आहोत. या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्या कामाचाच हा सन्मान आहे असे मी समजतो.

मी गेले ६० वर्षांपासून नास्तिक आहे. मी नास्तिक म्हणून दोनदा जन्माला आलो. जन्माला येणारं प्रत्येक मूल नास्तिक म्हणून जन्माला येतं. वाढत्या वयात देव, धर्म या निरर्थक गोष्टी त्याच्या मेंदूत कोंबल्या जातात.

पुढे वाचा

अलका धुपकर ह्यांचे भाषण

गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या बोलणार आहेत. सगळ्यात आधी थँक्यू म्हणते. माझ्या धडाडीसाठी मला पुरस्कार दिला जात आहे. आणि चुकीची गोष्ट म्हणणार नाही पण गैरसमज दूर करते. धडाडी वगैरे असं काहीही नाही. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. आणि हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अनेक ओळखी-अनोळखी लोकांनी मदत केली आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपाची मदत आहे. सोर्सेस म्हणून आम्हाला बातमी देणं, पोलिसखात्यात असल्यावर ती कन्फर्म करण्याचं काम असेल, इत्यादी. पाटील यांच्यासारखे गोव्याचे सीनियर अधिकारी होते, ज्यांनी सनातन संस्थेविषयीचा रिपोर्ट दिला.

पुढे वाचा

प्रसन्न जोशी ह्यांचे भाषण

नास्तिकांच्या परिषदेत सगळ्यांना नमस्कार केला तर चालतो का? बरं मला लँग्वेज ऑफ इंस्ट्र्क्शन काय आहे? नाही, म्हणजे सगळे बहुतांश कोण आहेत? मराठी चालेल ना? Ok. तसेही, महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय गोष्टी वस्तुतः पुणे, लोणावळा, ठाणे, कल्याण, डोंबिवली याच लेव्हलला असतात त्यामुळे मराठीच बोलावं लागतं. मी फार वेळ घेत नाही कारण वस्तुतः शेड्यूलनुसार आता लंचटाईम होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त पंधरा मिनिटं घेईन. आणि त्यानंतर आपण परब्रह्माच्या आराधनेसाठी बाहेर जाऊ. तर मी विचारपीठावरील-नास्तिक परिषदेमध्ये व्यासपीठ म्हणायचे नसते, विचारपीठ म्हणायचे असते. विचारपीठावरील सगळे मान्यवर, आणि पुरस्कारार्थी, त्यामध्ये अलकासुद्धा आहे.

पुढे वाचा

प्रसन्न जोशी ह्यांच्या सूचनांबद्दल आयोजकांची मते व खुलासे

१. पारलौकिक संदर्भ असलेल्या ‘शुभेच्छा’, ‘दुर्दैव’, इ. शब्दांच्या आणि रूढींच्या सयुक्तिकतेविषयी जोशी यांनी विनोद केले. परंतु, गांभीर्याने पाहिले तर अनेक शब्दांचे आणि रूढींचे अर्थ कालौघात बदललेले आहेत. समाजावर पारलौकिक धारणांचा पगडा होता तेव्हा भाषेत आणि संस्कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसणारच. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुत्’-नरकातून वाचवणारा अशी आहे. Mundane या शब्दाचा मूळ अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थही ‘वेदप्रामाण्य न मानणारे’ असा आहे. हे शब्द आता वेगळ्या अर्थाने वापरले जातात. मूळ अर्थ टाळणे पूर्णपणे शक्य किंवा आवश्यक आहे का याविषयी आम्हाला खात्री नाही आणि ऐहिकतेसाठी भाषाशुद्धी हा विषय आमच्या प्राधान्यक्रमातही नाही.

पुढे वाचा