Author archives

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळाः भाग-१

एक राजकीय आदर्श

‘सार्वभौमता’ ह्या संकल्पनेसारखी ‘सेक्युलॅरिझम’ची एक संकल्पना म्हणून ओळख सहज पटते पण तिची व्याख्या दुष्कर आहे. समाजशास्त्राच्या व राज्यशास्त्राच्या पंडितांत बौद्धिक व्यवहारात ह्या संज्ञेचा सर्रास प्रयोग होत असला तरी ह्या संकल्पनेतला नेमका व्यवच्छेदक अंश कोणता ह्याबद्दल मतभेद आहेत. भिन्न काळी भिन्न देशांत ‘सेक्युलर’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ ह्या संज्ञा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक आशयांनी परिप्लुत झालेल्या आहेत.
“अतीन्द्रिय आणि साक्षात्कारमूलक पूर्वगृहीतांचे ज्यांमधून निर्मूलन केलेले आहे असा स्वयंशासित ज्ञानप्रदेश म्हणजे सेक्युलॅरिझम” अशी व्याख्या करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्रांच्या (Encyeclopaedia of Social Sciences) ज्ञानकोशातून घेतलेली ही व्याख्यासुद्धा वर्जनात्मक (restrictive) आहे.

पुढे वाचा

विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी झाली व त्याला संकटकाळात आधार प्राप्त झाला. पुढे धर्मात नवनवीन कल्पनांची भर पडत गेली. काही संकल्पना मागे पडल्या. धर्माचे स्वरूपही बदलत गेले. या बदलत्या धर्माचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

पुढे वाचा

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात.

पुढे वाचा

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’

पुढे वाचा

संपादकीयः श्रद्धा-अंधश्रद्धा-खरी(?) श्रद्धा

श्रद्धा म्हणजे दृढविश्वास. ज्याला अनुकूल पुरावा लागत नाही, प्रतिकूल पुरावा बाधत नाही; तरी तो कायम राहतो. जरासंधासारखा. उदाहरणार्थ, मनुष्य मेल्याने आत्मा मरत नाही. आत्मा अमर आहे असे शास्त्रांनी सांगितले त्या अर्थी ते खरे असलेच पाहिजे. ही श्रद्धा.
पुढे सत्ययुग येणार आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल असे गुरु महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, पण त्यासाठी त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. अविश्वास दाखवू नका, विश्वास ठेवा. श्रद्धस्व!
सत्कर्म कोणते? दुष्कर्म कोणते ? योग्य कायह्नअयोग्य काय ? कशाने स्वर्गहह्नकशाने नरक लाभेल ? धर्म काय-अधर्म काय हे सगळे जुन्या जाणत्यांनी सांगून ठेवले आहे.

पुढे वाचा

खरी पूजा

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला झंडीच्या झुंडी अंगारिकेला जातात याबद्दल अंनिसने केलेली टीका मी वाचली. त्याबद्दल मला कीव वाटली तरी दुःख होत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड हे त्या झुंडीत दर्शनासाठी उभे होते, (म.टा.ता.३०-०३-०५). हे वाचल्यावर अत्यंत दुःख वाटले. मी स्वतः पुण्याचा आहे. मला डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे शिकवायला होते. आम्हाला आगरकरांचे चरित्र ‘देव न मानणारा देवमाणूस’ हे पुस्तक अभ्यासाला होते. मी ८० वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक आहे. माझ्यावर डॉ. सहस्रबुद्ध्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार दृढ झालेले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी रुईया कॉलेजचे माजी प्राचार्य द. के. केळकर यांचे ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ हे पुस्तक आणि प्रा.

पुढे वाचा

हे ज्ञानिचि पवित्रता अखंड राहो

‘मराठवाडा’ या नावाने ३५ वर्षे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ या नावाने १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या औरंगाबादेतील विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक मोठी घटना आहे. उच्चशिक्षण आधुनिक वळणाचे व काळानुरूप देण्याचा पाया मुंबईहून थेट मराठवाड्यात येऊन घालणारे डॉ. आंबेडकर आणि त्यांची दूरदृष्टी यांचे सुंदर फळ म्हणजे हा सुवर्ण महोत्सव ! बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला मराठी तोंडवळा बहाल केला हीही एक मोठी कामगिरी मानली पाहिजे. मराठी संस्कृती व ब्रिटिश राजवट यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरित महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत असताना मराठवाडा मात्र उर्दू आणि निजाम यांच्या कचाट्यात सापडून मागासलेलाच राहिला होता.

पुढे वाचा

शोधः सर्वत्र सारखाच

तस्लिमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम सत्याऐंशी पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळे वाढवलेला, पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.
तस्लिमा ‘लज्जा’मुळे प्रकाशझोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी सहा महिने प्रकाशित झालेली. ‘फिटुं फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’ चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’ – ‘सूड’, ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला.
ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या पाच आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा

पुस्तक परामर्श -वस्ती

वस्ती या पुस्तकात वसंत मून यांनी नागपूरच्या बर्डी या मध्यवर्ती भागातील बौद्ध धर्मांतराच्या पूर्वीच्या महार लोकांचे जीवन चितारले आहे. हा काळ इ.स. १९३० ते १९५६ दरम्यानचा आहे. पूर्वीच्या महार लोकांची जीवनपद्धती, त्यांचे नागपंचमीसारखे सण, त्यांची सामाजिक एकी, हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाची चीड, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती व सदैव सतावणारी भूक, नातलगांचे कधी-आहे, कधी-नाही असे सहकार्य आणि ह्या साऱ्यांवर मात करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघर्ष करा व एक व्हा’ हा गुरुमंत्र आणि त्याप्रमाणे वागून शिक्षणाद्वारे ह्या दलदलीतून सुटका हे सारे वसंत मून यांच्या वस्तीत वाचावयास मिळते.

पुढे वाचा

‘मर्मभेद’च्या निमित्ताने, आमच्या विषयाची स्थिती

मर्मभेद हा ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे.पुं.रेगे ह्यांनी लिहिलेल्या टीकालेखांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपादक आहेत प्रसिद्ध साहित्यिक एस्.डी.इनामदार. ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, तज्ज्ञांनी तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि धर्म इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचे, लेखांचे रेगे सरांनी केलेले परीक्षण, त्याला काही लेखकांनी दिलेली उत्तरे तसेच रेगे सरांनी केलेला खुलासा समाविष्ट आहे. रेगे सरांचे लेख प्रामुख्याने नवभारत या वैचारिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. १९६२ ते १९९९ असा सदतीस वर्षांचा हा कालखंड आहे.

ज्या ज्या वेळी हे लेख प्रसिद्ध झाले त्या त्या वेळी टीकेचा विषय झालेल्या काही ग्रंथकारांनी आणि लेखकांनी त्याला उत्तरेही दिलीत.

पुढे वाचा