Author archives

राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-२)

सप्टेंबरच्या अंकापासून सुरू झालेला हा अहवाल तीन भागांत तीन वैशिष्ट्यांवर भर देणारा आहे. ‘वाकडी वाट’, ‘बाबूजी’ व ‘बीबीजी’ हे त्यांतले ३ कोन आहेत. मागील लेखांकांत ‘बाबूजी’ व ‘इंडिया टुडे’ने शीर्षस्थ मानलेले दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती अर्थात् ‘डॉ. स. राधाकृष्ण यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले.
आता या दुसऱ्या भागात ‘वेडी’, ‘वाकडी’, ‘तिरकी’ वाटचाल कशी याचा ऊहापोह करू. त्याचबरोबर १२ वे व १३ वे (व्या) राष्ट्रपतींचा विचार पुढच्या लेखांकासाठी राखून चवथ्याच (व्यक्तिशः पांचव्या) चालीमध्ये वाकुडपणा कसा आला ते बघू.
तत्पूर्वी आणखी एका सूक्ष्म तिरपिटीकडे पाहणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

हृदयरोग हटविता येतो

डॉ. डीन ऑर्निश हे अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते काही वर्षांपूर्वी ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन रिसर्च इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष व कॅलिफोर्निया विद्यापीठात क्लिनिकल प्रोफेसर ऑफ मेडिसीन या पदावर कार्यरत होते. श्री बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ. ऑर्निश त्यांना आहार, पोषक तत्त्वे, जीवनपद्धती ह्यांबद्दल सल्ला देत असत. त्यांच्या जीवनातील काही अनुभवांची ओळख करून देण्याचे योजले आहे.
डीन ऑर्निश हे विद्यार्थी असताना त्यांना मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी असा समज होता की जो विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील विविध द्रव्यांचे गुणधर्म व त्यांच्या रासायनिक क्रिया नीट लक्षात ठेवू शकत असेल तोच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यास पात्र आहे.

पुढे वाचा

साला माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान

मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्त्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे.

पुढे वाचा

सुधारकाचा एक मित्र हरवला

आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक
ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे राखून न ठेवता मुक्तकंठाने जी दाद दिली ते त्यांचे शेवटचेच लेखन ठरले. गेल्या ऑगस्टच्या २५ तारखेला ते गेलेच.
हरिभाऊ प्रा. ह.चं.घोंगे सुधारकाचे हितचिंतक अन् हुकमी लेखक होते.

पुढे वाचा

कोणता भारत ‘चक दे’?

जयदीप साहनी हे सध्या चर्चेत असलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाचे पटकथाकार आणि गीतकार. ह्याआधी ‘कंपनी’ आणि ‘खोसला का घोसला’ हे लोकप्रिय आणि समीक्षकांनी वाखाणलेले चित्रपटही साहनींच्या लेखणीतून उतरले आहेत. ‘चक दे’साठी अभ्यास करायला आपण शोधनिबंध लिहीत आहोत असे सांगत साहनींनी हॉकीचा खेळ आणि त्याचे खेळाडू यांचा कानोसा घेतला. निरीक्षण इतके नेमके ठरले की लॉस एंजलिसला एक बाई येऊन साहनींना भेटली. म्हणाली, “तुम्हाला माझी कहाणी कोणी सांगितली ? आम्ही वसतिगृहात काय बोलत होतो हे तुम्हाला कसं कळलं?’ ती होती ओरिलिया मॅस्करेनस, गोव्याची अर्जुन पुरस्कार विजेती हॉकीपटू !

पुढे वाचा

गरज मायेच्या ओलाव्याची

गरज मायेच्या ओलाव्याची
“बायको मागेच गेली. मुलं अमेरिकेत आहेत, मला बरं नाही असं कळलं, की लगेच पैसे पाठवतात नि लिहितात, की प्रकृतीची काळजी घ्या.’ … “मुलं लहान आहेत. त्यांना कसं कळणार, की मायेच्या ओलाव्याची गरज आहे, तिथे पैशांच्या उबेचा काय उपयोग?”
“खरं! म्हणजे तुमच्या उपेक्षेला सुरुवात होते, तेव्हाच तुम्ही ओळखायला हवं, की आता जगाच्या दृष्टीने तुमचा उपयोग संपला. मग तुम्ही त्या खेळातूनच नव्हे, तर मैदानातूनही बाहेर पडायला हवं. हे शहाणपण आदिवासी आणि रानटी टोळ्यांनासुद्धा असतं. उत्तर ध्रुवाजवळच्या एस्किमो लोकांत काय करतात माहीत आहे ?

पुढे वाचा

पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८)
ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता ते वैज्ञानिकदृष्ट्या चूक ठरत नाहीत. कारण जॉन हॉरगन हे बी.ए. (इंग्लिश) असून ते विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी पाचही जणांच्या संशोधनात कुठे व कशी चूक आहे हे नमूद करावयास हवे होते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५.
श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे.
मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे यांच्या लेखातूनच कळले.
सायंटिस्ट म्हणून जात, धर्म कुण्याही विज्ञानवाद्याला मान्य नसावे हे मी आजपर्यंत मानत आलो आहे. विज्ञानातही पौर्वात्य व पाश्चात्त्य विज्ञान असा फरक मानत नाहीत.

पुढे वाचा

मुस्लिमांची सुधारणा शक्य आहे काय?

[श्री इब्न व क (Ibn Warraq) हे मी मुस्लिम का नाही (Why I am not a Muslim) ह्या ग्रंथाचे प्रसिद्ध लेखक आहेत. ते अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर एन्क्वायरी’मध्ये काम करतात. त्यांनी आजवर केलेल्या लिखाणात, ‘कुराण’, ‘कोणते कुराण ?’, ‘इस्लाम सोडणे’… इ. लेखन प्रसिद्ध आहे. ते मूळचे भारतीय, आधी युरोपात स्थलांतरित आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या रॅडिकल ह्यूमॅनिस्ट ह्न मार्च २००७ मधील लेखाचा मुक्त अनुवाद ] माझ्या युक्तिवादाची मांडणी :
धर्म-सुधार काय आहे?
1.वैश्विक-मानवाधिकाराचा उद्घोष Universal Declaration of Human Rights (UDHR) जो १९४८ मध्ये करण्यात आला त्याहून हा सुधार वेगळा कसा?

पुढे वाचा

प्राणदाता लुई पाश्चर

काही माणसे मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मतात आणि आयुष्यभर त्याच एकमेव ध्येयासाठी कष्ट करीत असतात. लुई पाश्चर त्यांच्यापैकीच एक.
ज्यावेळेला रेल्वे गाड्या प्रवाशांना वेगाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचवत होत्या, तारायंत्रे जलद गतीने संदेश पोहचवत होती, वैज्ञानिक किरणोत्सर्गाने अणूपेक्षाही लहान कणांचा शोध घेत होते, त्यावेळेला त्यांच्या तुलनेत वैद्यकशास्त्रात अजूनही अंधारयुगच होते. बालमृत्यूचे प्रमाणही फार मोठे होते. सुखवस्तू घरात जन्म मिळूनही बालकांना पूर्ण आयुष्य जगण्याची खात्री नव्हती. व्हिक्टोरियन काळातसुद्धा, जन्मलेल्या बालकांपैकी एकतरी दगावेलच अशी धास्ती सदैव मनात असे. गर्भवती स्त्रियांना अपत्याला जन्म देण्यास गेलो तर आपला मृत्यू निश्चित ओढवेल अशी भीती मनात सदैव घर करून असे.

पुढे वाचा