[“वैज्ञानिकांनी संस्कृत शिकायलाच हवे : जोशी’ ह्या मथळ्याने दिलीप पाडगावकरांनी घेतलेली मुरली मनोहर जोशींची मुलाखत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ एप्रिल २००१ च्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली. तिचे हे भाषांतर.]
इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा मुरली मनोहर जोशींवर सेक्युलर विचारवंत खार खाऊन असतात. धोतर, उपरणे, गंध, शेंडी, सगळेच त्यांना चिरडीस आणते. जोशींचा देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर आणि संशोधनसंस्थांवर भगवा कार्यक्रम लादण्यातला निर्धार तर त्यांना सर्वांत जास्त खुपतो. मुमजो प्रचारक किंवा पोथीचे भाष्यकार म्हणून बोलत नाहीत, तर विचारवंत आणि त्यातही वैज्ञानिक या नात्याने बोलतात. डावे आणि उदारमतवादी विचारवंत जे संकल्पनांचे क्षेत्र आपली मिरास असल्याचे मानतात, त्यातच मुमजोंना स्वतःचे कुरुक्षेत्र दिसते.
Author archives
‘हरीभरी’च्या निमित्ताने
माझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला निषेध आठवा.) अन् झालेही तसेच!
प्रश्न जरी केवळ मुस्लिम स्त्रियांपुरताच मर्यादित ठेवला असला तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने त्या समस्येचे सामान्यीकरण करायला हरकत नाही, तेही तेवढेच सत्य ठरेल.
स्त्री-सुधारणेच्या वारशाचे–विस्मरण झालेला महाराष्ट्र
देशातील सर्वांत प्रगत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या वर्षात राज्यातील स्त्रियांची अवस्था फार शोचनीय असल्याचे आढळते. मुंबई महानगराला मागे टाकून नागपूर व अमरावती जिल्हे स्त्रियांवरील अत्याचारांबाबतीत पुढे आहेत. पुणे, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सी. आय. डी.) नुकतीच ही आकडे-वारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत महिलांसंबंधी गुन्ह्यांची संख्या सुमारे तीन हजारांनी घटली. परंतु मुळातच हे प्रमाण भयावह आहे. यावर्षी दाखल झालेल्या १३,५८२ प्रकरणात प्रमुख गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे —-
दर आठवड्याला सुमारे २५ बलात्कार म्हणजे वर्षात १३०८ बलात्कारांना स्त्रियांना सामोरे जावे लागले.
गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)
“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय?
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझे दोन मित्र गप्पा मारत होते. एक म्हणाला —-अरे, वैजू म्हणते आहे, आठपंधरा दिवस माहेरी जाते. तिच्या आईला जरा बरं नाहीयं वाटतं.
विवेकवादावरील आव्हानांस उत्तर
प्राध्यापक रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रथांतील डॉ. सुनीति देव यांच्या ‘विवेकवाद आणि त्याच्यापुढील आव्हाने’ या लेखाला प्रा. रेग्यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणाप्रमाणे हे उत्तरही गंभीर विचाराने परिप्लुत आणि अतिशय व्यवस्थित झाले आहे. त्यातील काही युक्तिवादांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. आरंभी प्रा. रेगे यांनी देवांच्या लेखातील ढोबळ चुका म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या औपन्यासिक-निगामी रीतीत (hypothetico-deduction method) एक अवैध अंश आहे ही. विज्ञानाची रीत औपन्यासिक-निगामी आहे हे खरेच आहे; पण तिच्यातील अवैध अंशामुळे तिचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असे रेगे म्हणतात.
आबा
. . . ती तरुण मुले वेडावली होती. ती कोणत्याही सार्वजनिक नळावर पाणी पीत हुंदडत होती. मार खात होती. स्पृश्य जगाच्या कपाळावरील आठ्यांकडे उपहासाने पाहात होती. कोणत्याही देवळात शिरत होती, आणि डोक्यावर घाव घेत होती. देवाच्या मायेची पाखर घेऊन, बेडरपणे स्पृश्य जगाच्या नरड्याशी झोंबू पाहणाऱ्या रागीट नजरांशी नजर भिडवीत होती. पण अखेरीस त्या देवदर्शनाने त्यांची पोटे भरली नाहीत. त्या स्पृश्यांच्या नळावर पाणी पिऊन त्यांचे समाधान झाले नाही. मग ती समाधानासाठी माणसांकडे पाहू लागली. त्यांना तीनच माणसे माहीत होती. गांधीबाबा, दादा आणि आबा.
पत्रसंवाद
शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.
“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.
मनाचिये गुंती
आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय करून टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगणेही मुष्कील करून टाकणारी ही चिंता (anxiety) दूर करण्यासाठी व किंचित काल तरी तीपासून सुटका करणारी अशी उपाययोजना मग माणसे शोधू लागतात. मुक्तीचे हे मार्ग मात्र दुखण्यापेक्षा जालीम ठस्न जास्तच गंभीर अशी दुखणी होऊन बसतात.
‘मेरा घर बेहरामपाडा’
जमातवादाविषयीची प्रभावी चित्रफीत:
नव्वदीच्या दशकात जातीय दंगलींमुळे प्रचंड मनुष्य हानी व वित्तहानी झाल्याचे आपण अनुभवले. बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करण्यातून जमातवादाला उधाण आले. विविध धर्मसमूहांतील टोकाची धर्मांधताही या दशकात प्रकर्षाने जाणवली. राजकीय नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी राजकारणासाठी व सत्तेवर येण्यासाठी धर्मश्रद्धांचा पुरेपूर वापर केल्याचेही अनुभवास आले. आक्रस्ताळी व प्रक्षोभक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी व राजकीय उद्दिष्टे ठेवून धार्मिक नेत्यांनी जमातवादाला खतपाणीच घातले. या जमातवादाचा, जातीय दंगलींचा, समाजातील सर्वसामान्य नागरिकांवर कसा व केवढा परिणाम होतो हे अत्यंत साक्षेपाने दाखवून देणारी ‘मेरा घर बेहरामपाडा’ ही चित्रफीत नुकतीच बघायला मिळाली.
सोन्याची अंडी?
[सुमारे सोळा लाख माणसांना पूर्णवेळ रोजगार देणारा कुक्कुटपालन उद्योग, शेतीला पूरक म्हणून अर्धवेळ ह्या उद्योगात असणारी माणसे वेगळीच. चांगल्या, सुजाण उद्योजकतेतून जगभरात भारतीय कुक्कुटपालनाचा दबदबा निर्माण झालेला, ह्या उद्योगाचे प्रवक्तेही अभ्यासू आणि आपली बाजू सक्षमतेने मांडणारे—-असा हा उद्योग आज जागतिकीकरणाला सामोरा जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्सच्या एका पुरवणीतून ह्या उद्योगाने आपली स्थिती स्पष्ट केली —- त्याचे हे संकलन.]
संभाव्य परिणाम :
जागतिक व्यापार संघटनेशी झालेल्या करारानुसार १ एप्रिल २००१ पासून कुक्कुटपालन-व्यवसायावरील सगळी संख्यात्मक बंधने मोडीत निघतील आणि भारतीय बाजारपेठ अंडी, मांस, इ.