Author archives

पुस्तक परिचय दि रिव्हर अँड लाइफ

आतापर्यंत नर्मदा नदीवरील सरदार धरणास विरोध करणारे आणि धरण-विरोधाची चिकित्सक तसेच विवेकी कारणमीमांसा देणारे बरेच साहित्य प्रकाशात आलेले आहे. बाबा आमटे (Cry the Beloved Narmada), क्लॉड अल्वारिस आणि रमेश बिलोरे (Damming the Narmada), अश्विन शाह (Water for Gujarat), जसभाई पटेल (Myths Exploded: Unscientific Ways of Big Dams on Narmada), हिमांशु ठक्कर (Can Sardar Sarovar Project ever be financed?), राहुल राम (Muddy Waters), विजय परांजपे (High Dams on the River Narmada), आणि यांखेरीज इतरांनीही या विषयावर वेळोवेळी पुरेसे सविस्तर लिखाण केले आहे.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल

रसेल यांना जर कुणी विचारले असते – रसेल यांचे नाव केवळ उदा-हरणादाखल आहे की, तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्रश्न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून मी माझे स्वतःचे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कुणीही लहान मोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते.

पुढे वाचा

औषधाविषयी

प्रत्येक मनुष्याला स्वतां औषधीशास्त्र समजावें हेच उत्तम. आत्मज्ञाना-पेक्षांहि ह्या शास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. पण आत्मज्ञान मिळविण्याची मनुष्ये जितकी खटपट करतात तिच्या शतांशहि औषधिज्ञान मिळविण्याची खटपट मनुष्ये करीत नाहीत. फार काय सांगावें, तज्ज्ञ डॉक्टर म्हणविणारेहि जशी खटपट करावी तशी करीत नाहीत. तशी त्यांनी खटपट केली असती तर आलोपथी, होमिओ-पथी, नेचरोपथी, हकीमी अशी अनेक औषधीशास्त्रे न राहातां एकच औषधिशास्त्र राहिले असते. कारण ईश्वरनिर्मित नियम सांगणारें असें औषधिशास्त्र गणितशास्त्रा-प्रमाणे एकच असले पाहिजे. तें एकच खरे शास्त्र कोणतें हे ठरविण्यापुरता तरी अभ्यास सामान्य माणसांनी करून त्या शास्त्राप्रमाणेच चिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांचा आश्रय त्यांनी करावा; नाहींतर अनेक प्रयोग आपल्या शरीरावर करवून घेण्याची व शेवटी निराश होण्याची व खरा वैद्य भेटला असतां त्याविषयींहि साशंक असण्याची आपत्ति उत्पन्न होते.

पुढे वाचा

संप, सत्य आणि इतिहास

मराठीतील बहुतेक नियतकालिकांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात आजचा सुधारक आपल्या वाचकांच्या लेखनावर चालतो, पत्रांमधून आणि लेखांमधून, आणि असे वाचक जगभर पसरले आहेत, त्यामुळे लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावर प्रतिसाद येण्याला मध्ये एखादा अंक जावा लागतो. नुकतेच हे एक-सोडून-एक चक्र अडखळण्याचा अनुभव आला—-पण तो मात्र लागोपाठ दोनदा! नोव्हेंबरचा (११.८) हा अंक ऐन दिवाळीत छापखान्यात पोचला. मोठ्या सुट्ट्यांनंतर वेळेवर परत कामावर रुजू होण्याची वृत्ती भारतात कमी आहे. आगेमागे एखादा आठवडा उशीरा येणे फारसे गैर मानले जात नाही. पण अनेकांच्या सहभागातून घडणाऱ्या क्रियांना हे फार मारक ठरते.

पुढे वाचा

“परंपरा”

“याहून महत्त्वाचा भाग समग्र मराठशाहीच्या आर्थिक पायाचा किंवा आत्यंतिक भाषेत बोलावयाचे म्हणजे हीस खरा पाया होता की नाही? कां ती केवळ बिनबुडाची होती?” . . . केतकर विनोदाने म्हणत असत की, मराठ्यांच्या मोहिमांचें मूळ सावकारांच्या तगाद्यांत शोधले पाहिजे! मानी बाजीराव कर्जाच्या भारामुळे ब्रीद्रस्वामींपुढे कसा नमत असें याबद्दलचे राजवाड्यांचे निवेदन प्रसिद्ध आहे. . . ही कर्जे, कधीच कां फिटली नाहीत? पुढील वसुलाच्या भरंवशावर आधींच रकमेची उचल करावयाची, असे सर्वांचेच व्यवहार सदैव कसे राहिले? यांचा शास्ता, नियंता कोणी नव्हताच काय? आमच्या सत्ताविस्ताराच्या आर्थिक पायामुळेच आमच्यांतील मिरासदारी वृत्ती, ऐदीपणा व गैरहिशेबीपणा हे आजचे पुढील दुर्गुण उत्पन्न झाले काय?

पुढे वाचा

“आम्ही एकशेपाच आहोत”

शेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर पथकात पोवाडे म्हणणारे व्हॉलंटियर्स होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. खेड्यात पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. काही खेड्यात गेलो तो आमचे भोवती सर्व लुगडीच लुगडी दिसू लागली. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हटले. तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला.

पुढे वाचा

आहेरे / नाहीरे

@ सिलिकन व्हॅली, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्कोपासून आग्नेयेकडे पसरलेला शहरी पट्टा म्हणजे सिलिकन व्हॅली. विसाव्या शतकाच्या शेवटी ही जगाची तंत्रवैज्ञानिक राजधानी होती.)

कॉनी टॉर्ट २५ वर्षांची अविवाहित माता आहे, चार मुलांची. ती एका कुबट वासाच्या, भेगाळलेल्या भिंतींच्या, खिडक्यांना घोंगड्या लटकवलेल्या खोलीसाठी महिना ४०० डॉलर्स देते. शेजारची ॲडोबी सिस्टिम्स इं. ही सॉफ्टवेअर कंपनी वर्षाला एक अब्ज डॉलर्सची कमाई करते. “सिलिकन व्हॅली? नाही ऐकलं हे नाव,” कॉनी म्हणाली. तिला महिना ५०० डॉलर्स अपंगत्व भत्ता मिळतो. “इथले सगळेच जण तंत्रवैज्ञानिक पेशात नाहीत. आम्ही खूपसे लोक पोरांना जेमतेम जगवतो.”

पुढे वाचा

वैजनाथ स्मृती

(कालचे सुधारक : डॉ. श्री. व्यं. केतकर)

आजच्या जगातील अनेक चालीरीती मनुष्यप्राण्याच्या जंगली काळात उत्पन्न झाल्या आहेत. त्या चालीरीती व त्यांचे समर्थन करणारे कायदे नष्ट झाले पाहिजेत. आणि त्यासाठी जी नवीन नियममाला स्थापन व्हावयाची त्याचा प्रारंभयत्न ही वैजनाथ स्मृती होय.

जगातील प्रत्येक मानवी प्राण्याच्या इतिकर्तव्यता आत्मसंरक्षण, आत्मसंवर्धन आणि आत्मसातत्यरक्षण या आहेत. आत्मसंरक्षण मुख्यतः समाजाच्या आश्रयाने होते. आत्मसंवर्धन स्वतःच्या द्रव्योत्पादक परिश्रमाने होते व आत्मसातत्यरक्षण स्त्रीपुरुषसंयोगाने होते; तर या तिन्ही गोष्टी मानवी प्राण्यास अवश्य आहेत. आत्मसंरक्षण आणि आत्मसंवर्धन यासाठी शास्त्रसिद्धी बरीच आहे. कारण, रक्षणसंवर्धनविषयक विचार दररोज अवश्य होतो.

पुढे वाचा

जाती आणि आडनावे

नोव्हेंबर २००० चा आजचा सुधारक अनेक विवाद्य विषयांनी रंगलेला आहे. ‘जातींचा उगम’, ‘आडनाव हवेच कशाला?’ हे सांस्कृतिक विषयांवरील लेख, ‘सखोल लोकशाही’, ‘दुर्दशा’, ‘फडके’ आदी राजकीय व आर्थिक विषयांवरील लेख विचारपरिप्लुत, वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. त्यांचा परामर्श दोन भागात घ्यावा लागेल.

‘गांवगाडा’ हे त्रिंबक नारायण आत्रे यांचे पुस्तक १९१५ साली म्हणजे पंचाऐंशी वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्यातील विचारांशी आ.सु. सहमत नसल्याची टीप लेखाच्या शेवटी आहे. [हा गैरसमज आहे —-संपा.] ते योग्यच आहे. आज जातिसंस्था विकृती उत्पन्न करीत आहे, यातही शंका नाही. पण जातींच्या उगमाची आत्र्यांनी केलेली मीमांसा रास्त म्हणावी लागेल.

पुढे वाचा

प्रोब – पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग २)

प्रोब अहवालाची एक विस्तृत प्रस्तावना डिसेम्बर २००० च्या आ.सु.च्या अंकात प्रसिद्ध केली होती. उरलेल्या अहवालाचा संक्षेप करताना जाणवले की अहवालातील प्रत्येक मुद्दाच नव्हे तर त्या मुद्द्यांचा विस्तारसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या सगळ्याचा गोषवारा एक लेखात उरकणे हे फार कठीण काम आहे. म्हणून लेखांची संख्या वाढवायचे ठरवले. तरीही आकडेवारी, तक्ते आणि असंख्य उदाहरणे – ज्यामुळे ह्या अहवालाला एक विश्वसनीयता प्राप्त झाली आहे – ह्या सर्व गोष्टींना सारांशामधे जागा देता येत नाही ही मर्यादा लक्षात घेऊन आ.सु.च्या वाचकांनी प्रोबचा संपूर्ण अहवाल मुळातून वाचावा असा आग्रह आहे.

पुढे वाचा