विषय «आरोग्य»

या मार्गानेच जाऊ या – डॉ. शंतनू अभ्यंकर

करोनाने सगळ्यांना दुग्ध्यात पाडले आहे. विशेषतः आरोग्यकर्मींना.

नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या त्या देशाला त्या त्या देशीच्या देशी औषधांचा अभिमान आहे. तेंव्हा आपलंच खरं असं सांगायची एक चढाओढ लागली आहे.

आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा, जडीबुटीची जादुई दवा, आता आपली कमाल दाखवेल, असे दावे जगभरात केले जात आहेत.

चिन्यांनी नेहमीप्रमाणे इथेही आघाडी घेतली आहे. प्राचीन चिनी उपचार कसे ‘बेश्ट’ आहेत हे ते सांगत आहेत. त्यांच्या सरकारचाही त्यांना पाठिंबा आहे.

पुढे वाचा

विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर

‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते.

पुढे वाचा

विषाणूंच्या अगम्य गमती – आशिष महाबळ

२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये मी खगोलशास्त्राच्या डेटाव्यतिरीक्त कॅन्सर आणि इतर वैद्यकीय डेटा याचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. साहजिकच या नव्या संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलायचा माझाही प्रयत्न सुरु झाला.

पुढे वाचा

व्हायरस असाही तसाही – प्राची माहूरकर

( ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  लेखावरील प्रतिक्रिया)

फार पूर्वी शेतीवर झालेल्या भयानक संक्रमणाचा कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने आढावा

ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांनी लिहिलेला ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  शीर्षकाचा एक अतिशय एकांगी असा लेख वाचनात आला. त्यात त्यांनी मेकॉले ह्यांच्या नावावर फिरत असलेल्या एका भाषणाचा उल्लेख करून, हे भाषण मेकॉले ह्यांचे नाही व तरीही त्यांच्या नावानिशी फिरत असल्याचा उल्लेख करताना हा अफवांचा व्हायरस भारतभर पसरला असे म्हटले आहे.

पुढे वाचा

आयुष्य वाचवण्याची किंमत काय? – एक मर्मभेदी प्रश्न – चेतन भगत

चेतन भगत यांचा वर्तमानपत्रीय  लेख

https://timesofindia.indiatimes.com/blogs/The-underage-optimist/the-question-confronting-us-whats-the-cost-of-saving-lives/

COVID-19 विषयी

साधारण नोव्हेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे फक्त साडेचार-पाच महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज मार्च २०२० महिन्याच्या शेवटी संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि ते करताना आपल्या मूलभूत जीवनावश्यक गरजा कशा भागवता येतील हे सोडून इतर काहीही विचार करू शकत नाही आहे. Corona/SARS-CoV2/COVID-19 अशा विविध नावांनी आज कुप्रसिद्ध झालेला हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, या विषाणूमुळे पुढे नेमके काय काय होईल आणि यावर उपाय कधी येणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत.

पुढे वाचा

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच

इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद

अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.

पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे.

पुढे वाचा

जंक फूड

जंक फूड हा शब्दच फसवा व विरोधाभासी आहे. कुठलेही अन्न हे जंक कसे काय असू शकते? जंक या शब्दाचा अर्थच मुळी भंगार, टाकाऊ असा होतो व कुठलीही खाण्याची वस्तू ही अशी असणे शक्यच नाही. तरीही जंक फूड हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की त्यामधील विरोधाभास सहज लक्षातदेखील येत नाही.

खरेतर मनुष्य जन्माला आल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत तो खातच असतो व तेही दिवसातून किमान ३ वेळा. याचा अर्थ मनुष्याचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे धरले तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणपणे ८८००० वेळा खाण्याची क्रिया घडते.

पुढे वाचा

नैसर्गिक आणि अनैसर्गिक

नैसर्गिक आणि रसायनमुक्त (chemical-free) म्हणजे चांगले असा एक सर्वसाधारण समज आहे. या शब्दांचा अर्थ काय याचा विचार मात्र क्वचितच केला जातो. साधारणतः कारखान्यात बनलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिकपणे अस्तित्वात असलेले साहित्य वापरून बनवलेले खाद्यपदार्थ/ जिन्नस म्हणजे नैसर्गिक किंवा रसायनमुक्त आणि म्हणून हेच चांगले असे मानले जाते. खरे तर दहावीपर्यंत शाळा शिकलेल्या कोणालाही हे लक्षात यावे की रसायनमुक्त असे काहीच असू शकत नाही, कारण सर्वच सजीव (प्राणी/ वनस्पती/ सूक्ष्मजीव) आणि निर्जीव वस्तू ह्या मुळात वेगवेगळ्या रसायनांपासूनच बनलेल्या असतात. या सर्वांमध्येच वेगवेगळी मूलतत्त्वे (chemical elements) म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, सोडियम इत्यादी असतात.

पुढे वाचा

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले.

मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती उत्तम आहे. त्यामुळे भारतीय माणूस नीतिमान, स्वाभिमानी, लाच-लुचपतीस बळी न पडणारा झाला आहे. कोणीही भीक मागत नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीला भारतात स्थिरावण्यासाठी भारतातील मूळ शिक्षणव्यवस्था मोडून काढून, कारकून बनवणारी, गुलाम वृत्ती जोपासणारी नवी शिक्षणव्यवस्था बनवावी लागेल.

पुढे वाचा