विषय «तत्त्वज्ञान»

जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त

जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता नाही. मनु हे नाव कोणी मानवांचा आदिपुरुष कल्पून त्याला दिले आहे असे जाणवते. मानवाचा आदिपुरुष कोण? मनु. म्हणून मनूचे ते मानव. मनुस्मृति ह्या ग्रंथात त्या काळात प्रचलित असलेल्या समजुतींचा संग्रह आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे.

पुढे वाचा

शेवटचा स्टॉप नाही!

“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’

‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे.

पुढे वाचा

अनश्व-रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व – लेखांक पहिला

नव्या केन्द्र सरकारचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसांत कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारी कचेऱ्या, बाजार कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नवे सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिह्ने दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे पंतप्रधान आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ते ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते.

पुढे वाचा

बौद्धवाद आणि मेंदू

गेल्या अनेक दशकांपासून काही मेंदूवैज्ञानिक आणि बौद्धधर्मीय अभ्यासकांनी बौद्धवादाचा आणि मेंदूविज्ञानाचा संबंध जोडला आहे. मला मात्र खाजगीरीत्या हा संबंध मंजूर नव्हता आणि तो मी नाकारत आलेलो आहे. अशा प्रकारे विज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रकार इतर अनेक धर्मांबाबतही होत आलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या बाबतीतही खोलात जाऊन वैज्ञानिकरीत्या तपासणी केल्यास त्यातला फोलपणा उघड होईल याची मला खात्री वाटत होती.

‘जेव्हा धार्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक शोधाद्वारे पाठिंबा मिळतो तेव्हा त्या धर्मातील अनेकजण असा दावा करतात की पहा, आमचा अनुभव हा सत्यपरिस्थितीवर आधारलेला आहे. पण वैज्ञानिक पुरावा जर त्यांच्या पूर्वग्रहित धार्मिक मतांच्या कितीही विरोधी आला तर तो अशा धार्मिक लोकांना पटत नाही.

पुढे वाचा

धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह

श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला.

पुढे वाचा

मार्क्सवाद आणि संस्कृती

मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सृजनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सृजनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही आहे. नंतरच्या मार्क्सवादयांनी मात्र या दोन पैलूंकडे दुर्लक्ष केले. म्हणून युरोपातला मार्क्सवाद जडवादासारखा झाला. मुळात मार्क्सचे तत्त्वज्ञान माणसातील चैतन्यालाच आवाहन करते. यातून हे स्पष्ट होते, की मार्क्सवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हा मानुषकेंद्री अध्यात्माशी सुसंगत आहे.

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)

सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

मेजवानी

डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा.
शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने आत्याकडे काढायला. आत्याला सोबत करत प्रवचन ऐकायला जातो. एका मुलीच्या प्रेमात पडतो. मिनिस्टरांना भेटून मुलीचा हात देण्याची विनंती करतो. मिनिस्टर म्हणतात, “माझ्या मुली म्हणजे माझे डावे-उजवे हात.

पुढे वाचा

वैषम्यनैघृण्यप्रसंगनिरास

प्राचीन भारतात पहिल्या दर्जाचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते, आणि त्याची प्रमुख नऊ दर्शनांच्या (म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदान्त ही आस्तिक दर्शन आणि जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने यांच्या) शेकडो तत्त्वज्ञांकडून साधकबाधक चर्चा दीडदोन हजार वर्षे चालू होत्या. ती परंपरा गेल्या काही शतकांपूर्वी खंडित झाली असून सध्या जे उपलब्ध तत्त्वज्ञान आहे ते सामान्यपणे एकदीड हजार वर्षांपूर्वीचे आहे. इतक्या प्राचीन काळचा हा विचार असल्यामुळे त्यात आजच्या दृष्टीने काही उणीवा आहेत. पण एरवी त्यांची बलस्थानेही आहेत.

या तत्त्वज्ञानाचे एक छोटेसे उदाहरण म्हणून शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यातील एक उतारा पुढे छापला आहे.

पुढे वाचा

अज्ञेयवाद – एक पळवाट

ईश्वराच्या अस्तित्वाचे कसलेही प्रमाण सापडत नाही. त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धयर्थ केले गेलेले सर्व युक्तिवाद सदोष असून अनिर्णायक आहेत, असे दाखवून दिल्यावर ईश्वरवाद्यांचा पवित्रा असा असतो की, ईश्वर आहे हे जसे सिद्ध करता येत नाही, तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या बाबतीत अज्ञेयवादी आहोत. अज्ञेयवादी असणे ही प्रतिष्ठेची भूमिका आहे आणि ती स्वीकारणे तत्त्वज्ञाला शोभणारे असून विवेकाला धरून आहे, असे मानले जाते. म्हणून याबाबतीत खरी गोष्ट काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपल्याला असे दिसते की अज्ञेयवादाला श्रद्धा स्वीकरणीय असते, एवढेच नव्हे तर ती आवश्यक आहे असेही म्हणता येईल.

पुढे वाचा