मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी माझे मित्र कुमार नागे आणि ब्राइट्सच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. मी नास्तिक नसूनही त्यांनी मला आमंत्रण दिलं. हा सहिष्णुतेचा भाग आहे आणि ती तुमच्यात आहे त्याबाबत मला आनंद वाटला. आजकाल ‘माझी कोणती ओळख’ हे माझं मलाच कळत नाही. विचारधारांचा इतका गुंता झालेला आहे तरी, मी असं समजतो की मी काही भक्तांपैकी नाही. आणि मी असेही समजतो की त्यातल्यात्यात मला जवळची वैचारिक परंपरा रानडे, गोखले, गांधी, विनोबांची वाटते, वैचारिकदृष्ट्या! आणि ते जेवढे धार्मिक आहेत तेवढा मी धार्मिक आहे असेही मी मानतो.
विषय «नास्तिक्य»
विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावरील खुलासा
विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत आपण पुरोगामी कसे होणार?
चौधरी यांनी सुरुवातीलाच हे नमूद केले की politically correct असण्यासाठी धर्म गरजेचा असतो. पूर्ण भाषण politically correct पद्धतीने केल्यावर शेवटी मानाचा तुरा म्हणजे त्यांचे स्वतःला गांधी आणि आंबेडकर या दोघांचे अनुयायी आहे हे सांगणे.
विचार तर कराल?
१८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामध्ये ‘ब्राइट्स’ संस्थेतर्फे नास्तिक परिषद घेण्यात आली होती. नास्तिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार जगण्याचा एक आयाम आहे याबद्दल दुमत नसले तरी ते आस्तिकांच्या पचनी पडणे कठीण असते. म्हणूनच काही आस्तिकांना नास्तिकांबद्दल घृणा, राग, द्वेष वगैरे वगैरे असतो. पण याची कारणे वैयक्तिक आहेत का? तर नाही. आस्तिकांना नास्तिकांबद्दल वाटणाऱ्या रागाचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे नास्तिकांकडून होणारी धर्माची चिकित्सा आणि धर्माच्या उन्मादाविरोधातील त्यांची भूमिका. म्हणूनच ‘देवा-धर्माची चिकित्सा करू नये, त्याबद्दल प्रश्न निर्माण करू नये’, अशी शिकवण असणाऱ्या आस्तिकांना नास्तिकांचा राग येणे स्वाभाविक आहे.
मी आस्तिक का आहे?
कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.
मी आस्तिक का नाही?
प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.
‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती.