गेली दहा वर्षे मी ज्या दोन मुद्यांवरती बोलतो आहे. तेच दोन मुद्दे मला आणखी सविस्तर, वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील. एक, परिषदेसारखे हे सगळे उपद्व्याप कशासाठी? आणि दोन, परिषद सांगलीतंच का? तर हे जे दोन बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे.
आपण गेली दहा वर्षे वेगवेगळे उपक्रम करत आहोत. यावेळी आपला दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक जीवनामध्ये दहा वर्षे हा कालावधी फार मोठा नाही, पण तेवढा छोटापण नाही. काही गणती करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जमेच्या आहेत, त्या मी नमूद करेन.