विषय «माध्यम»

नाव नामदेवाचे… काम ठेकेदारांचे!

अ. भा. प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन घुमान येथे नामदेव नगरीत यथासांग पार पडले. घुमान (पंजाब) येथे एकही मराठी माणूस नसताना तेथे संमेलन घेण्याचा घाट का घातला गेला हे आम्हाला सुरवातीला कळलेच नव्हते. मराठी प्रकाशक खूपच नाराज झाले होते. कारण अशा संमेलनातच त्यांच्या पुस्तकांची विक्री मोठया प्रमाणावर होते. त्यांनी सुरूवातीला या संमेलनावर बहिष्कार घातला.
पुढे असे समजले की, कोणातरी बडया ठेकेदाराला घुमान हे तीर्थक्षेत्र बनवायचे आहे त्यासाठी मराठी साहित्य संमेलनाचा इव्हेंट गरजेचा होता. आजवरचा अनुभव पाहाता एकवेळ बडे साहित्यिक संमेलनाकडे फिरकले नाहीत तरी चालेल पण ठेकेदारांनी पाठ फिरविली तर मात्र मग सगळेच पानिपत होईल.

पुढे वाचा

विवेकवाद हीच खरी नैतिकता!

अलीकडच्या काही वर्षांत वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे वाढत असले, तरी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं, त्रैमासिकं यांची संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातल्या नियतकालिकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट खात्याचा सर्वाधिक फटका या नियतकालिकांना बसत आहे. केवळ वेळेवर अंक न पोहोचण्यामुळे अनेक नियतकालिकं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्धर परिस्थितीत ‘आजचा सुधारक’ या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आणि ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा लौकिक असलेल्या मासिकानं रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करावं, ही खचितच कौतुकास्पद गोष्ट आहे; पण याची फारशी दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांकडून घेतली जाण्याची शक्यता नाही.

पुढे वाचा

नाही मानियले बहुमता

‘‘या प्रकारच्या मासिकाला वर्गणीदार मिळतात तरी किती?’’ हा बहुधा ‘आजचा सुधारक’बद्दल सर्वांत जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असावा. आपल्या आजवरच्या पंचवीस वर्षांत ‘आसु’ने एखाददोन वर्षे नऊशेचा आकडा ओलांडलाही, पण प्रातिनिधिक वर्गणीदारसंख्या मात्र सातशे ते आठशेच मानायला हवी. याशिवाय चाळीसेक अंक वृत्तपत्रे व समविचारी नियतकालिकांना पाठवले जातात, पंचवीसतीस अंक संपादकांमध्ये वाटले जातात आणि सत्तरेक ज्यादा प्रती बांधीव खंडांसाठी छापल्या जातात. म्हणजे ‘प्रिंट ऑर्डर’चा प्रातिनिधिक आकार आठशे अधिकउणे पन्नास असा असतो.

बहुतेक वेळा साताठशे हा आकडा ऐकल्यावरची प्रतिक्रिया डोळ्यांत तुच्छता, आणि एखादा अस्पष्ट हुंकार, अशी असायची.

पुढे वाचा

वैकल्पिक माध्यमांसमोरील आह्वाने

(साम्ययोग साधना ह्या वैचारिक साप्ताहिकाचा हीरक महोत्सव जानेवारी २०१५ मध्ये धुळे येथे संपन्न झाला. येथे परिवर्तनवादी चळवळींतील नियतकालिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच विषयांवर चांगले विचारमंथन व उद्बोधक चर्चा घडून आली. श्रोत्यांनीही चांगला सहभाग घेतला. अशा प्रकारे ह्या विषयावरील चर्चा महाराष्ट्रात तरी बèयाच वर्षानंतर झाली असावी. त्यातील एका चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून आ.सु. च्या माजी कार्यकारी संपादकांनी केलेले हे भाषण. -का.सं.)

  भौतिक ताळमेळ बसवताना जमिनी कार्यकर्त्यांना वाचन, लेखन, चिंतन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वैकल्पिक माध्यमे कमी पडत आहेत.  

पुढे वाचा

संकोच स्थलकालाचा: आणखी कशाकशाचा?

दूरचित्रवाणी व संगणक–महाजाल प्रणालीने माध्यम व शिक्षण यात काय प्रगती/क्रांती केली त्याची वर्णने नव्याने करण्याची गरज नाही. ती गृहीत धरून, या माध्यमांच्या दुसऱ्या बाजूविषयी व एकंदरच संज्ञापन, ज्ञान, शिक्षण यांबद्दल आपण चिकित्सक व्हावे, त्यासाठी काही मुद्दे:
शिक्षणाच्या दोन अंगांचा माध्यमांच्या दृष्टीने अधिक विचार होणे जरुरीचे आहे : मुलीचे, युवतीचे किंवा विद्यार्थिनीचे आकलन कसे घडत जाते; आपल्या स्वतःचे व बाह्य जगाचे तिचे आकलन (पर्सेप्शन) बनवायची प्रक्रिया ही शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तिच्यात कोणती मूल्ये ठसवली जातात, अंगभूत होतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा