फिरून एकदा स्त्रीमुक्ती …
गेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणूया की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत.
बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलीकडे जात नाही. ( वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये पुरुष बेजवाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करायची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजवाबदारीने वागू नये; आपले शील संभाळावेअसे सांगतात.)