महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचेसमूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, २०१३ अशा लांबलचक नावाने हा अध्यादेश काढून तो लागू करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर या विद्वान, सुसंस्कृत आणि मृदु स्वभावी सामाजिक कार्यकर्त्यास शेवटी आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आणि नंतरच शासनाला हा अध्यादेश लागू करण्याची सुबुद्धी झाली.
वास्तविक अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम, जादूटोणा विरोधी अधिनियम किंवा दुष्ट प्रथा, जादूटोणा आणि अघोरी विद्या प्रतिबंधक अधिनियम अशा विविध नावाने यापूर्वी वर्णन केल्या गेलेल्या आणि शेवटी वर सांगितल्याप्रमाणे लांबलचक नावाने निघालेल्या या कायद्याची गर्भधारणा १९९० साली झाली.