सांस्कृतिक संदर्भ ही राजकीय आणि सामाजिक इतिहासाची सामग्री असते. सांस्कृतिक संदर्भ खऱ्या स्वरूपात तेव्हाच्या तेव्हा कागदावर उतरला तर तो इतिहासाचा मौलिक साक्षीदार होतो. पण पुराव्याअभावी सांस्कृतिक संदर्भ लोकमानसात जर मौखिकरूपाने वर्षानुवर्षे टिकून राहिला तर लोकप्रतिभेने त्याची आख्यायिका होते. मग ती इतिहासाचा पुरावा असत नाही. विदर्भातील लोकनायक बापूजी अणे, थोर संशोधक डॉ.य.खु.देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर या तीन महनीय व्यक्तींचे परस्परांशी ज्ञानानुबंध होते. या सांस्कृतिक इतिहासाचे पुरावे आहेत. पण या इतिहासाचे दस्तावेजीकरण मात्र फारसे झालेले नाही. लोकनायक बापूजी अणे यांनी विदर्भात लेखनाला आणि संशोधनाच्या कार्याला सतत मदतीचा हात दिला.
विषय «संस्कृती»
नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?
‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:
१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे.
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.
वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो.
न्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य
या लेखाला मुख्य संदर्भ भारतातील गेल्या दशकातील घडामोडींचा आहे. साधारणपणे याच विषयावर एक लेख मी २०२२ जानेवारीच्या ‘आजच्या सुधारक’मध्ये लिहिला होता. त्या लेखात सांगितल्यानुसार न्याय ही सारभूत संकल्पना आहे; तर नीती ही न्यायाच्या दिशेने जाऊ पहाणारी नियमबद्ध प्रक्रिया. न्याय सापेक्ष (relative) असतो आणि त्याच कारणाने न्यायाची प्रक्रिया (नीती) सुद्धा सापेक्ष असते. याचा अर्थ न्याय-अन्याय या संकल्पना निरर्थक आहेत असे नव्हे. त्यामध्ये अधिक अन्याय्य आणि कमी अन्याय्य (किंवा कमी न्याय्य आणि अधिक न्याय्य) असा तरतमभाव करता येतो. हा तरतमभाव वापरून जेव्हा न्यायिक प्रक्रिया एका विशिष्ट संदर्भात पूर्त (पूर्ण) होते तेव्हा आपण न्याय झाला असे म्हणतो.
मनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध
मूळ लेखक : एड्रिजा रॉयचौधरी
वैवाहिक जोडीदार ठरविण्याची विवाहव्यवस्था जातीची शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून आली आहे, याबद्दल अनेक समाजशास्त्रज्ञ सहमत आहेत. त्याचवेळी ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती.
(भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेल्या लग्नाची संकल्पना, ही पश्चिमेकडील देशांमधील लोकांसाठी खूपच आकर्षणाची बाब आहे.)
काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक तरुण विद्यार्थी म्हणून राहत असताना भारतातील एकमेवाद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आचरणपद्धतीने वा परंपरांनी भुललेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार ते चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्यांबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.
विवाहबाह्य संबंध
सर्वांत प्रसिद्ध असं उच्चवर्गीयातलं विवाहबाह्य प्रेमप्रकरण होतं, अमिताभ व रेखा यांचं. पण अखेरीस त्यांनाही थांबावं लागलंच … कुटुंबासाठी, समाजासाठी.
नियम कितीही केले तरी माणूस हा चुकतमाकतच जगत असतो. मोहमाया त्याला जाळ्यात ओढायचं काम करत असते. त्यात तो नकळतही सापडू शकतो.
आवडता पदार्थ नाही का जरा जास्तच खाल्ला जातो आणि मग अपचनावरचं औषध घ्यावं लागतं. तसं कधीतरी एखादी परस्त्री किंवा परपुरुष आवडतो. योगायोगाने तिकडून सिग्नल मिळालाच तर सुरू होतो भेटीगाठींचा सिलसिला. संबंध पुढे जातात, वाढतात, प्रेमाची पूर्तता होते.
ती झाली तरी चोरटेपणाचे अपराधगंड निर्माण होऊ शकतात.
सांस्कृतिक गंड आणि गंडांतर
दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.
हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो.
माहितीपट -परीक्षण अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा
अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन
—————————————————————————–
भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध
———————————————————————-
“मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसालाबोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत निघाले. पण जिथे गेलेतिथे ना फुगे होते ना केक. मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक बाईहोत्या. मला कपडे काढायला लावले. त्या बाईंच्या हाती ब्लेड होतं. मला काहीकळायच्या आत दोन पायांमधल्या जागी त्यांनी कापलं.
सखी-बंधन
माणसात नर मादीचे नवे नाते अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे नाते सखीबंधनातून जडते. सखी-बंधन ही संकल्पना माझी नाही. नाशकाला आजचा सुधारक ह्या मासिकाच्या वाचकवर्गाचा नुकताच मेळावा भरविण्यात आला. लोकेश शेवडे, सुरेंद्र देशपांडे ह्या नाशिककरांनी तो आयोजित केला होता. या मासिकात स्त्रीपुरुषांचे विवाहनिरपेक्ष संबंध स्ढ व्हावेत या निसर्गसमीपतेचा पुरस्कार करणाऱ्या र. धों. कर्व्यांचे लेख नुकतेच प्रसिद्ध झाले होते. नागपूरचे दिवाकर मोहनी याच विचारांचा तात्त्विक पाठपुरावा करणारे लेखक नाशकातील मेळाव्यात उपस्थित होते. या लेखांविषयी साधकबाधक चर्चा मेळाव्याच्या सभेनंतर एका खाजगी मैफलीत रंगली.
लैंगिक स्वातंत्र्य
ह्या अंकामध्ये प्रा. ह. चं. घोंगे यांचा ‘सखीबंधन’ नावाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखात मी ज्याचा तात्त्विक पाठपुरावा करतो अशा विषयाचा ऊहापोह त्यांनी केला आहे. स्त्रीपुरुषांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित व्हावेत असे मी पूर्वी प्रतिपादन केले आहे असे श्री. घोंग्यांचे म्हणणे. तसेच ह्या विषयामधले पूर्वसूरी रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांच्या आणि माझ्या भूमिकांमध्ये काय फरक आहे तो त्यांनी विशद करून मागितला आहे. मला येथे कबूल केले पाहिजे की मी कर्व्यांचे लिखाण फार थोडे वाचले आहे. त्यामुळे अशी तुलनात्मक भूमिका मांडताना माझ्याकडून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे.
रक्षण की राखण ?
मनूचा पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।
या श्लोकातील पहिले तीन चरण स्त्रीचे रक्षण करण्याचे काम अनुक्रमे तिचा पिता, तिचा पती आणि तिचा पुत्र यांच्याकडे सोपवितात. हे नैसर्गिक आणि न्याय्यही दिसते. स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक सामर्थ्याने दुर्बल आहे, आणि तसेच तिच्यावर पुरुषाकडून बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे तिला पुरुषाच्या मदतीची गरज आहे, असे मानणे रास्त आहे. त्यामुळे पहिल्या तीन चरणांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे म्हणता येईल. परंतु या विचाराशी चौथ्या चरणातील ‘स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही’ हा विचार विसंगत दिसतो.