विषय «उत्क्रांती»

मेंढा लेखा: जैव-सामाजिक प्रणाली विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना!

मुख्य शब्द: जैव-सामाजिक प्रणाली (social-ecological system), बहुकेन्द्रित शासन (polycentric governance), अनुकूलन क्षमता (adaptation), स्वसंघटन (self-organization), संश्लेषण (synthesis), तंत्रविचार (systems thinking), एलिनोर ओस्ट्रॉम, Tragedy of Commons, सह-उत्क्रांती (coevolution), Panarchy, Anthropocene.

प्रस्तावना आणि विषय प्रवेश
गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावात झालेला ग्रामस्वराज्याचा विलक्षण प्रयोग, आणि एकंदरच विकेंद्रीकरणाच्या धोरणांमुळे जेव्हा माणसांच्या समूहांमध्ये स्व-संघटन[A] होऊन काहीतरी नव-सर्जन घडते, ते बघून मानवी मन सुखावते, आनंदी होते. असे सर्जन बघून मन का सुखावते? गोष्ट मेंढा गावाची[1] ह्या पुस्तकात मिलिंद बोकील लिहितात – “विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झाली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (१२)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?
मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल, असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल, की ॲस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल, की…. आणखी काही तरी?

सुदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या घटनेबद्दल आताच्या सिद्धान्तावरून काही अंदाज बांधता येतील.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (११)

माणूस प्राणी नामशेष होणार का?

अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, याबद्दलची भाकिते अधूनमधून वाचायला मिळत असतात. आजकाल असल्या अवैज्ञानिक भाकितांची भीती वाटेनाशी झाली आहे. आजच्या मानवाऐवजी दुसरा एखादा मानवसदृश प्राणी उत्क्रांत होत असल्यास त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही.

पुढे वाचा

अनवरत भूमंडळ (४)

मेंदूचे अंतरंग
डॉ. जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuroscientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी नेमका काय संबंध असतो, या बाबतीत संशोधन करत असताना वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत् (नॉर्मल) होऊ शकल्या. त्या मेंदूतील बिघाडाच्या अवस्थेत त्यांना जे अनुभव आले त्यांचे वर्णन त्यांनी My Stroke of Insight (A Brain Scientists Personal Journey) या २००८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (१)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), या इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या होत्या. सध्या त्या जैवनीतिशास्त्र (Bioethics) या विषयाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, येथे प्रपाठक (Reader) आहेत. त्यांचे द स्केप्टिकल फेमिनिस्ट हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग ३)

माणसांच्या समूहांमध्ये पूर्ण समता कधीच आढळत नाही. सर्वच समाजांमध्ये घटकव्यक्तींना श्रेणींमध्ये विभागलेले असते. ह्या श्रेणींचा उच्चनीच क्रम कधी वयावर अवलंबून असतो, कधी शारीरिक शक्तीवर, कधी संपत्तीवर, तर कधी इतर कोणत्या घटकांवर. समाजाप्रमाणे हे घटक बदलतात, पण त्यांच्यानुसार घडलेली श्रेणींची उतरंड (Hierarchy) मात्र सगळ्याच समाजांमध्ये निरपवादपणे आढळते. हे कसे उपजले? पूर्वी एक आडवळणाचे स्पष्टीकरण दिले जाई. जास्त काटेकोरपणे श्रेणीबद्ध असलेले समाज सैल श्रेणींच्या समाजांपेक्षा जास्त सबळ असतात, असे मानले जाई. म्हणजे दोन समाजांमध्ये भांडण झाले, तर जास्त श्रेणीबद्ध समाज जिंकणार, आणि असे होत होत कठोर श्रेणीबद्ध समाजच टिकून राहणार, असे हे स्पष्टीकरण होते.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग २)

“We should probe our commonsense reactions to evolutionary theories carefully before concluding that the commonsense itself isn’t a cognitive distortion created by evolution” – (‘द मॉरल अॅनिमल’ – रिचर्ड राईट).

प्रश्न : व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांपैकी जगण्याला आणि प्रजोत्पादनाला मदत करणारे गुण साऱ्या जीवजातींत पसरतात आणि असे अनेक पिढ्यांमध्ये घडून जीवजातीच्या गुणांचा संच बदलतो. नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचे हे वर्णन आपण पाहिले. ह्याचा एक अर्थ असा की स्वार्थीपणाने स्वतःचा आणि स्वतःच्या प्रजेचाच विचार करणाऱ्या व्यक्ती टिकून राहायची शक्यता जास्त आहे, तर उलटपक्षी स्वार्थत्याग, परोपकार, असे गुण असलेल्या व्यक्तींची प्रजा आणि गुण ह्यांचा प्रसार व्हायची शक्यता कमी.

पुढे वाचा