मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा मानवप्रगतीच्या दृष्टिकोनातून सर्वंकषविकासरोधी होऊ लागतात. अर्थातच अशा कालबाह्य व विकासरोधी विचारांना कवटाळून असलेल्या/असणाऱ्या साऱ्या (विचार)’पद्धती’ निसर्गसंमत/निसर्गाधारित/निसर्गानुकूल मानवविकासाला बाधकच नव्हे तर घातकही ठरू लागतात. असे असले तरी विज्ञानाधारित व निसर्गचक्राला, सुसंगत विचारांना प्राणशून्य करून अशा प्राणशून्य विचारांच्या शववाहकांची समाजातील संख्या व शक्तीसुद्धा नाकारून चालणार नाही.
Category «जीवनशैली»
कृत्रिमप्रज्ञा वापराचे तारतम्य शक्य होईल का?
मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.
या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल.
नव्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार?
जुलै २०२२ मध्ये ब्लेक लेमोईन या इंजिनीयरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (यापुढे आपण ए.आय. किंवा कृत्रिमप्रज्ञा म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे लार्ज लॅंगवेज मॉडेल (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा‘सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे असे त्याने जाहीर केले.
२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.”
विक्रम आणि वेताळ – भाग १०
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, ह्या खेपेला बराच उशीर केलास, काय कारण झालं? सोपवलेल्या कामाचा विसर तर पडला नाही ना तुला?”
“छे, छे, चांगलंच लक्षात आहे माझ्या सगळं. परंतु त्यासाठी तू काही कालमर्यादा घालून दिल्याचं मात्र स्मरणात नाही माझ्या. पण असो.”
“आपण बनवलेली ती सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणाला होतास तू मला!”
“पण काय रे, ती मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून बघण्यापूर्वी वास्तव म्हणजे काय हे नको का आपण समजून घ्यायला?”
मनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध
मूळ लेखक : एड्रिजा रॉयचौधरी
वैवाहिक जोडीदार ठरविण्याची विवाहव्यवस्था जातीची शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून आली आहे, याबद्दल अनेक समाजशास्त्रज्ञ सहमत आहेत. त्याचवेळी ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती.
(भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेल्या लग्नाची संकल्पना, ही पश्चिमेकडील देशांमधील लोकांसाठी खूपच आकर्षणाची बाब आहे.)
काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक तरुण विद्यार्थी म्हणून राहत असताना भारतातील एकमेवाद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आचरणपद्धतीने वा परंपरांनी भुललेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार ते चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्यांबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.
सांस्कृतिक गंड आणि गंडांतर
दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.
हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो.
जग कुठे आणि भारत कुठे…
असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. या देशातले अल्पसंख्याक, इथले भटकन्ती करणारे आदिवासी माणसं सध्या सुरक्षित नाहीत. या बांधवांवर कुठेही झुंडीने हल्ले होतात. अश्या घटनांमुळे भारत सध्या जगामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
महिला नाहीत अबला… पण केव्हा?

Image by Wokandapix from Pixabay
निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे.
शून्याला समजून घेताना
परंपरांचे ओझे
ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली असावी. ससा वेगाने पळतो. कासव हळूहळू चालत जाते. ससा वाटेत झोपतो. कासव त्याला ओलांडून पुढे जाते आणि शर्यत जिंकते. गोष्टीवरून घ्यायचा बोध असा की वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे. बोध अगदी खरा आहे; पण मुळात असमान क्षमता असलेल्यांना एकाच स्पर्धेत उतरवणे कितपत न्याय्य आहे? तर तसे नाही; आणि म्हणूनच कथेतल्या कासवाला जिंकवण्यासाठी सश्याला झोपवावे लागते.
आयुष्यात कितीदातरी अश्या अतार्किक स्पर्धांचे आपण बळी पडतो किंवा पाडले जातो. येथूनच गरज पडते ती प्रत्येकाच्या शून्याला किंवा आरंभबिंदूला समजून घेण्याची.
सहज भेटायला म्हणून आलेल्या त्या दोघा-तिघा तरूणांपैकी एक जण अंध होता. ऑफिसच्या
हिंदू, हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही
आज हिंदुधर्म अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. नुकतेच भारताच्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने इसिस (दाएश) आणि बोकोहराम या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केली आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेत हिंदुत्वाच्या उच्चाटनावर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषदही आयोजित केली होती. त्यामध्ये हिंदुधर्म आणि हिंदुत्व वेगळे करता येणार नाहीत या मुद्द्यावर आम-सहमती झाली होती. उलटपक्षी सर्वसामान्य सुशिक्षित हिंदूला त्याच्या धर्मासंबंधी अथवा संस्कृतीसंबंधी जुजबी माहितीही नसते असा वरचेवर अनुभव येतो. आय.आय.टी. कानपूरमध्ये असताना एका एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा मला रावणाचा भाऊ भीमसेन होता असे छातीठोकपणे सांगितले होते. Bibhishan आणि Bhimsen यात अनेक अक्षरे समान असल्याने कॉन्व्हेंट-स्कूलमध्ये शिकणाऱ्याचा असा घोटाळा होणे स्वाभाविक होते. बरे