‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होती, याला बरेचसे अनुकूल पुरावे मिळू शकतील. भारतीय सामाजिक-धार्मिक परंपरेचा परिपोष हा जसा आत्मवाद, ईश्वरवाद, अद्वैतवाद यांतून झाला, तसाच तो अनात्मवाद, निरिश्वरवाद, द्वैतवाद, संशयवाद आणि अज्ञेयवादातूनही झालेला आढळून येईल.
Category «जीवनशैली»
सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे: पूर्वार्ध (ग्रंथपरिचय)
श्री. बर्ट्रांड रसेल लिखित ‘The Principles Of Social Reconstruction’ ह्या अल्पाक्षररमणीय ग्रंथाचे प्रचलित अरिष्टामुळे मिळालेल्या फावल्या वेळात वाचन करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ अरिष्टामुळे संपूर्ण जग अगदी ढवळून निघाले आहे…निघत आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा जागतिक समाजावर (Global society), राष्ट्रांवर, समाजव्यवस्थेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन (Short-run) तसेच दीर्घकालीन (Long-run) होणाऱ्या प्रभावाचे स्वरूप कसे असेल आणि त्या प्रभावाची दिशा काय असेल, एकूणच, एकविसाव्या शतकातील आधुनिक मानवाचे भवितव्य काय आणि कसे असेल? यासंदर्भात जगात सर्वच स्तरांतून चर्चेला आणि आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.
श्री. रसेल ह्यांनी ‘प्रिंसिपल्स’चे लिखाण पहिल्या जागतिक महायुद्धाच्या (१९१४-१९१८) पार्श्वभूमीवर केले होते.
सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)
प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, तेव्हा तिला काही मर्यादा घालणे हितकारक ठरत असते. म्हणून या समीक्षेची मर्यादा हीच की यामध्ये आपण प्रस्तुत ग्रंथांतील ‘मालमत्ता’ (Property) या प्रकरणाचीच विशेषतः दखल घेणार आहोत.
अंत्यसंस्कार
पुरातत्त्ववेत्त्यांनी शोधलेल्या खूप जुन्या काळातल्या सामुदायिक दफनभूमी पाहता, अग्नीचा शोध लागायच्या आधी सर्व खंडांतील, सर्व प्रकारच्या मानव समुदायांनी मृतदेहांना एखाद्या झाडाखाली, गुहेमध्ये अथवा विवरामध्ये ठेवले असेल. पालापाचोळा आणि फारतर काही फांद्या इत्यादींनी ते मृतदेह झाकले असतील. कारण ‘खोल खोदणे’ हेसुद्धा मानवाच्या त्या आदिम अवस्थेमध्ये, अवजारांच्या अभावी सहज शक्य नसणार. बहुसंख्य ठिकाणी आपापल्या टोळीची जिथे जिथे जागा असेल, त्या जागांवर ते मृतदेह ठेवले जात असतील, कारण बऱ्याच ठिकाणी दगडांच्या मोठ्या वर्तुळात सांगाडे पहावयास मिळाले.
मृतदेहांची विल्हेवाट लावणे हे काम निसर्गाने विविध प्राण्यांना दिलेले आहे.
ज्योतिष : शास्त्र की थोतांड
IGNOU ने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल गेले काही दिवस खमंग चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने काही चिंतन –
** ज्या शास्त्रात केलेली भाकितं अचूक ठरतात तेच खऱ्या अर्थाने शास्त्र असतं हे जर मान्य केले तर ज्योतिष हे शास्त्र ठरत नाही.
हा निकषच चुकीचा आहे. असं म्हटलं तर हवामानशास्त्र, निवडणूक निकालांचे अनुमान लावणारं आणि विश्लेषण करणारं शास्त्र (psephology), वैद्यकशास्त्र अश्या अनेक ज्ञानशाखांमधल्या विद्वानांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील भाकिते चुकतात. पण म्हणून त्या ज्ञानशाखा खोट्या ठरत नाहीत. ज्योतिषशास्त्रातही इतर शास्त्रांप्रमाणे चुकलेली मूळची गृहितके बदलून, नव्या गृहितकांना सिद्ध करून, त्याची शास्त्रोक्त मांडणी करून संकल्पनांचं पुनर्मूल्यांकन नक्कीच केलं जातं.
समता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे!!
मध्यंतरी आमच्या भागातील काही महिलांनी हस्तलिखितासाठी काही विषयांची निवड केली. त्यात एक विषय होता ‘आधुनिक स्त्रीचे अति-स्वातंत्र्य’! हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे?, लोकशाही किती खरी किती खोटी?, विकास किती खरा किती खोटा?… असे प्रश्न पडायला लागले आहेत.
‘आधुनिक स्त्रीचे अतिस्वातंत्र्य’ हा विषय वाचून तर मला माझे (आताही) न लिहिण्याच्या आळसाचे स्वातंत्र्यच या विदुषींनी हिसकावून घेतल्यासारखे वाटले. तर नक्की कुठे आणि कसे स्वतंत्र झालो आपण? आहार, विहार, पेहराव, विचार, समजुती, पूर्वस्मृती, निवारा यांपैकी
भग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… !
खालील संवाद शहरातल्या एका तलावाकाठी घडतो आहे. आत्ताआत्तापर्यंत हे लहानसे तळे अनेक नैसर्गिक घटकांचे घर होते. त्याच्या पाणलोट क्षेत्रातील जंगल अनेक पशुपक्ष्यांचा आसरा होते. नॅचरल रिक्रिएशनल साईट म्हणून ह्या जागेची उपयुक्तता लोकांना फार आधीपासून माहीत होती/आहे. आता मात्र गरज नसलेल्या विकासकामासाठी हा तलाव वापरला जातो आहे; तलावामध्ये संगितावर नृत्य करणारे एक कारंजे बसविण्याचे घाटते आहे व प्रेक्षकांसाठी मोठी गॅलरी बांधणे सुरूआहे. तलावाच्या परिसरात सुरूअसलेल्या व भविष्यात वाढणाऱ्या वर्दळीमुळे तेथील नैसर्गिक पाणथळ व वन परिसंस्थांचा ह्रास होऊन तलाव मृत होण्याची पूर्ण शक्यता आहे.
नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी
नास्तिकता हा शब्दप्रयोगच आपल्यासारख्या विचार करून निर्णय घेणाऱ्यावर, न्यायोचित व नैतिक कृती करणाऱ्यावर अन्याय करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण नास्तिक हा शब्द सामान्यपणे आस्तिक नसणाऱ्यांसाठी म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसाठी वापरला जातो. परंतु नास्तिकता फक्त परमेश्वर ही संकल्पनाच नव्हे तर या संकल्पनेच्या अवतीभोवती असलेल्या एकूणएक गोष्टी नाकारत असते. परमेश्वर या संकल्पनेभोवती असलेल्या बहुतेक संकल्पना, रीती-रिवाजांच्या, रूढी-परंपरांच्या, बुद्धीच्या, तार्किकतेच्या व काही वेळा ऐहिक सुखाच्या कसोटीला उतरत नसतात. कदाचित परमेश्वर ही संकल्पना मेंदूचा विकास प्राथमिक टप्प्यावर असताना केव्हातरी प्रचलित झाली असावी व आज माणूस विकासाच्या होमो सेपियन या टप्प्यावर पोचला तरी टिकून आहे व प्रभावीसुद्धा आहे.
पत्रोत्तर – व्हायरस असा कसा? प्राची माहूरकर ह्यांच्या लेखावर सुभाष आठले ह्यांचे उत्तर
प्राची माहूरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये ‘मेकॉलेने तसे भाषण केलेच नव्हते, जीएम फूडमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही व शेतीमध्ये वापरली जाणारी खते, जंतुनाशके किंवा इतर प्रकारची रसायने यांमुळे कॅन्सर होत नाही’ असे जे माझे प्रतिपादन होते ते कोठेही नाकारलेले नाही, त्याअर्थी या तीन गोष्टींना त्यांची संमती आहे असे धरून चालायला हरकत नाही.
प्रथम जीएम फुड्स विषयी. आतापर्यंत माणसाने स्वीकारलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाविषयी त्याचा तीन-चार पिढ्यांनंतर माणसावर काय परिणाम होईल असा अभ्यास करून मग ते स्वीकारले असे एकही उदाहरण नाही व तसे करणे मला तरी अशक्यच दिसते.
करोनाव्हायरसचे धडे – शाश्वत मार्ग पत्करण्याची अभूतपूर्व संधी – डॉ. गुरुदास नूलकर
पृथ्वीवर कोट्यवधी भिन्न विभिन्न प्रजाती आहेत. सर्व प्रजातींची दोन प्रमुख उद्दिष्टे असतात – सर्व्हायवल आणि रिप्रोडक्शन. म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणे आणि आपल्या प्रजातीचा प्रसार करणे. आज करोनाव्हायरस हा अतिसूक्ष्मजीव दोन्ही बाबतीत होमो सेपियनच्या शर्यतीत खांद्याला खांदा लावून उतरला असल्याचे चित्र दिसत आहे. या विषाणूने मानवजातीवर एक अभूतपूर्व परिस्थिती ओढून आणली आहे आणि पुढे काय होणार याची कोणालाही कल्पना नाही. प्रत्येकासमोर दोन प्रश्न आहेत – हा विषाणू अजून किती काळ घातक राहणार आणि दुसरा म्हणजे अर्थव्यवस्थेचे पुढे काय होणार. या महामारीमुळे प्राणहानी तर झाली आहेच, त्याचबरोबर कोट्यवधी लोकांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे.