श्री. संपादक, आजचा सुधारक यांस
आपल्या मार्च १९९६ च्या अंकात प्रा. मधुकर देशपांडे ह्यांचे पत्र आले आहे. त्याविषयी मला काही खुलासा करावयाचा आहे.
(१)३९४ पानावरील त्यांच्या तिसऱ्या परिच्छेदाशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्त्रीपुरुषांची लैंगिक गरज कमीजास्त कशीही असो, लैंगिक स्वायत्तता दोघांनाही सारख्या प्रमाणात असावी असेच माझे मत आहे.
(२)आता कुटुंब : आजचे आणि उद्याचे ह्यासंबंधी.
‘पाश्चात्त्य कुटुंबात मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण बिरादरीची होतात’ हे माझे विधान अतिव्याप्त आहे ह्यात संशय नाही.
मी हे विधान मुख्यत: भारतीय आईबापांच्या तीन जबाबदार्यांदच्या संदर्भात केले होते.
विषय «पत्र-पत्रोत्तरे»
पत्रव्यवहार
मा. संपादक
आजचा सुधारक यांस स. न.
श्री. ह. चं. घोंगे यांचा ‘हिदुत्व अन्वेषण’ हा आक्टोबर ९५ च्या अंकातील लेख वाचनात आला. या आधीच्या म्हणजे सप्टेंबर ९५ च्या अंकातील ‘शारदेच्या पुनर्जन्मावरील त्यांचा लेख वाचलेला होताच. आधीचा लेख वाचल्यानंतर लेखकाच्याबद्दल काही अपेक्षा आधीच निर्माण झाल्या होत्या. मात्र ‘हिन्दुत्व अन्वेषण हा लेख वाचून भ्रमनिरास झाला. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास केवळ ‘शाब्दिक चावटीचाच नव्हे, तर ‘वैचारिक चावटीचाही आश्रय घेऊन लिहिलेला हा लेख वाटला. जागोजाग ‘हिंदुत्व आणि ‘हिंदु यांतील वैयर्त्य दाखविताना लेखकाने ‘वैचारिक चावटीचा केलेला उपयोग निषेधार्ह वाटतो.
पत्रव्यवहार
संपादक
आजचा सुधारक
गेल्या तीन चार महिन्यांच्या आजच्या सुधारक च्या अंकातल्या काही चांगल्यालेखांमध्ये जी अनवधानाने अगर अति उत्साहाने केलेली चूक अगर अतिवास्तव विधानेजाणवली त्याबद्दल हे पत्र.
१. नंदा खरे (सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे, नोव्हें. १९९५) यांचीसाक्षात्काराविरुद्ध अंतस्फूर्त ज्ञान या विषयाची मीमांसा उत्कृष्ट आहे. खरे तर जे अंतःस्फूर्तीचे अनुभव रामानुजन किंवा केकुले ह्यांना आले तसे थोड्या फार फरकाने बर्या.चसामान्य संशोधकांनाही येत असतातच. निदान मी स्वतः, अत्यंत सामान्य माणूस असूनही, असा अनुभव घेतलेला आहे. (मात्र मी ध्वन्यर्थानेही स्वतःची रामानुजनबरोबर तुलना करीत आहे असा हास्यास्पद अर्थ कुणीही काढू नये.)
पत्रव्यवहार
संपादक,
आजचा सुधारक नागपूर
श्री. दिवाकर मोहनी यांनी “कुटुंब’ या शीर्षकाच्या ३ लेखांमध्ये प्रामुख्याने समाजातील कुटुंबरचनेच्या उणीवांचा ऊहापोह करून, कौटुंबिक स्वार्थामुळे समाजाचे अहित होते असा सिद्धांत मांडला आहे, व तो मांडण्यापूर्वी त्यांनी बराच सूक्ष्म मूलभूत मानवीय धारणांचा विचार केल्याचे स्पष्ट जाणवते. कुटुंबाची संकल्पना व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वार्थावरच कुटुंबाची प्रगती व उत्थान अवलंबून असते या हल्लीच्या सर्वमान्य विचारसरणीमुळे समाजाच्या समस्या अधिक बिकट होतात व त्यांचा अंत होण्याचा सुतराम
संभव नाही असे ते सुचवितात.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक रचनेत-विशेषतः समाजाच्या कुटुंबाधारित विभागात – आमूलाग्र बदल केल्याखेरीज तरणोपाय नाही असा त्यांना विश्वास आहे.
पत्रव्यवहार
आजच्या सुधारकच्या ऑक्टोबर १९९५ च्या अंकात श्री. घनश्याम कमलाकर वाईकर यांचे पत्र वाचले. त्यातील विचार सर्वसाधारणपणे योग्य आहेत. मला तर असे वाटते की बुद्धिवादी आजचा सुधारक मध्ये कोणत्याही धर्मावर कोणत्याही कारणाने ठाम श्रद्धा ठेवणाच्या व्यक्तीचे अवतरण मुखपृष्ठावर किंवा मलपृष्ठावर, व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य करूनही, एक तत्त्व म्हणून प्रसिद्ध केले जाऊ नये.
मात्र ‘मग बाई ह्या ख्रिस्ती स्मारकात चोर दरवाजाने कशा शिरल्या?’ असा प्रश्न विचारणे हे पंडिता रमाबाईंवर अन्याय करणारे आहे असे मला वाटते. कारण मुळात एका धर्माने केलेल्या अन्यायाचे निराकरण दुसऱ्यार धर्मात जाऊन म्हणजे धर्मांतर करून होते हा विचारच अपुरा ठरतो आहे.
पत्रव्यवहार
श्री. संपादक,
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या सप्टेंबर ९५ च्या अंकाच्या १८३-८४ पानांवर श्री. प्रभाकर नानावटी ह्यांची खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्याविषयी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी माझे मत पुढीलप्रमाणे :
(१) ह्यापुढे पुरुषांनी स्त्रियांना, किंबहुना सर्वांनीच एकमेकांना अधिक मानाने वागवावे, समतेने वागवावे आणि त्यासाठी आवश्यक तो बदल आपापल्या मनात घडवून आणावा अशी गरज आहे असे माझे म्हणणे आहे. त्यासाठी कोणतीही अट स्त्रीपुरुषांनी घालूनये. उदा. स्त्रिया/पुरुष जास्त पैसे मिळवतील तरच आम्ही त्यांना उचित मान देऊ वगैरे. मला जी सामाजिक दर्जाची समता अपेक्षित आहे ती कोणाच्याही धनार्जनयोग्यतेवर अवलंबून नसणारी अशी आहे.
पत्रव्यवहार
आजच्या सुधारक च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकाच्या मलपृष्ठावर पंडिता रमाबाईंचा एक उतारा छापला आहे. त्यात बाई म्हणतात, “हिंदूधर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणाच्या माझ्या पाश्चात्य मित्रांना मी विनंती करते की हिंदुतत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले रूप दिसून येईल”.
आग्रा येथील ज्या किल्ल्याच्या दर्शनाने हे विचार प्रेरित झाले आहेत त्याचा हिंदु धर्माशी किंवा तत्त्वज्ञानाशी अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी विचार अगदी योग्य आहेत.
पण समजा एखाद्याने म्हटले की ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळू नका.
पत्रव्यवहार – प्रतिक्रिया हवी
प्रतिक्रिया हवी
संपादक, आजचा सुधारक यांस,
आजचा सुधारक मधील काही मतांशी मी सहमत होऊ शकत नाही. ज्या मतांशी मी सहमत होऊ शकत नाही त्यांबाबत माझे आकलनही कमी पडत असेल. तरीसुद्धा ज्याशी आपण सहमत नाही ती मते तरी आपल्याला नीट माहिती हवीत ह्या दृष्टीने आपल्या मासिकाची उपयुक्तता निश्चितच आहे.
‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ या शीर्षकाखाली नागपूरच्या प्रा. श्री. गो. काशीकरांचा एक लेख २८-४-९५च्या तरुण भारतात वाचण्यात आला. माझ्यासारख्या सामान्याला (Layman) या विषयात गम्य नाही; तरीदेखील ह्या लेखासंबंधी आपली प्रतिक्रिया समजून घेण्यास मात्र मी उत्सुक आहे.
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
आपण आपल्या एका टिपणात (फेब्रु. ९५) इंग्रजीतील व्हस्व दीर्घ उच्चार मराठीत दर्शविण्याकरिता काही खुणा सुचवल्या होत्या त्यावरील माझी प्रतिक्रिया मी आपल्याकडे पाठवली होती. परंतु जागेअभावी ती आपण प्रसिद्ध केली नसावी. आपल्याच विचारांचे सूत्र धरून श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेले ‘पाठ्यपुस्तक-मंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती’ हे टिपण मे ९५ च्या अंकात आपण प्रसिद्ध केले त्याबद्दल अभिनंदन. बर्यााच वर्षापूर्वी श्री मोहनी यांचे देवनागरीतील जोडाक्षर-लेखनपद्धती यावरील एक व्याख्यान मी नागपुरातच ऐकले होते. त्याचेही या निमित्ताने मला स्मरण झाले.
श्री मोहनी यांनी हे सर्व या अगोदरच लिहावयास हवे होते.
पत्रव्यवहार -पाठ्यपुस्तकमंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती
श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
आपण नागरी लिपीच्या अपर्याप्ततेविषयी एक टिपण नुकतेच आपल्या अंकात प्रसिद्ध केले आहे. ते टिपण वाचून माझ्या मनात विचार आला की कोणत्याही लिपीने हुबेहूब उच्चार दाखविण्याचे कार्य करावे की तत्सदृश उच्चारांचे केवळ स्मरण करून देऊन शब्दांचा अर्थ/आशय व्यक्त करण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे मानावे? पण ह्या मुद्द्याचा विस्तार न करिता मी आपले लक्ष लिपीसंबंधाच्याच, पण एका दुसऱ्या? महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधतो, आणि त्याचबरोबर शुद्धलेखनाच्या नियमांविषयीही एक बाब आपल्या ध्यानातआणून देतो.
सध्या आपले पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ जी लेखनपद्धती वापरत आहे त्याविषयी मला माझे मत मांडावयाचे आहे.