विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स, न. वि. वि.
फेब्रुवारी १९९१ च्या अंकात आपण वसंत कानेटकरांचे पत्र छापले आहे. पुण्यात झालेल्या स्त्रीवादी समीक्षेवरील परिसंवादाचे वेळी घडलेल्या एका घटनेचा त्यात उल्लेख आहे. त्या परिसंवादात मी सहभागी होतो. ‘परमिसिव सोसायटी’ची भलावण केल्याबद्दल प्रा. के. ज. पुरोहित यांचा निषेध परिसंवादात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरुषांनी केला ही वस्तुस्थिती नाही. घडले ते असेः
पश्चिमी देशांमध्ये आढळणाच्या सापेक्षतः पुष्कळच दिल्या स्त्रीपुरुष लैंगिक संबंधाविषयी बोलत असताना ‘मला स्वतःला नाना बायकांचा उपभोग घ्यायला आवडेलच, पण आता माझे वय असा उपभोग घेण्याच्या दृष्टीने राहिले नाही याची खंत वाटते’ अशा आशयाचे उद्गार सत्राच्या चर्चेला अध्यक्षीय समारोप करताना प्रा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक’ यांस,
नोव्हेंबरच्या अंकातील औरंगाबादचे प्रा. श्याम कुलकर्णी यांचं पत्र आणि त्या पत्राला तुम्ही दिलेलं ‘काहीसं सविस्तर उत्तर दोन्ही वाचली. ती वाचल्यानंतर न तथा आंदोलिकादंडः यथा ‘बाधति बाधते अशी माझी अवस्था झाली. मी काही कुणी प्रोफेसर नाही. विज्ञानाचाही नाही किंवा तुमच्या त्या तत्त्वज्ञानाचाही नाही. पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीला असं वाटतं की तुम्ही एक फार मोठी चूक करीत आहात. आणि कदाचित तुम्ही एकटेच नव्हे तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी ही चूक करीत असावेत. आणि म्हणून हे पत्र लिहीत आहे. कृपया याला उत्तर द्यावं अशी विनंती आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,
नवा सुधारक
स.न.वि.वि.
नवा सुधारकच्या नोव्हे. ९० अंकातील साथी पन्नालाल सुराणा यांचे पत्र वाचले. त्यांचा आक्षेप मुख्यतः माझ्या लेखातील (नवा सुधारक, ऑक्टो. ९०) प्र.१८ वरील दुसर्‍या परिच्छेदाच्या संदर्भात आहे. त्यातील मांडणी जास्त काटेकोरपणे व संयमाने होणे गरजेचे होते. सर्वश्री ना.ग. गोरे, मधु लिमये व मृणाल गोरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तत्त्वासाठी त्यांनी किंमत दिलेली मला माहीत आहे. या लिखाणाबद्दल श्री सुराणा यांना वाईट वाटले याबद्दल मी दिलगीर आहे.

श्री. सुराणा लिहितात तशी मी मुद्दयांची गल्लत केलेली नाही. आपल्या राज्यघटनेने शैक्षणिक आणि समाजिक दृष्ट्या मागास असणार्‍या गटांना समान संधी मिळाली पाहिजे असे जे सांगितलेले आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

पुढे वाचा

प्रा. वसंत कानेटकर यांच्या पत्राच्या निमित्ताने

प्रा. वसन्त कानेटकर ह्यांच्या ‘नवा सुधारक’ च्या ऑगस्ट-अंकात प्रकाशित झालेल्या पत्रातील पुर्वाधांच्या संदर्भात (स्त्री – पुरुषांनी आपापांतील मत्सरभाव सहजात आहे, की अर्जित) निरनिराळ्या मानवशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाचे काही अंश पुढे दिले आहेत. असेच आणखीही काही उतारे पुढे देण्याचा विचार आहे.

भिन्नभिन्न ठिकाणी आढळणाच्या विवाहसंरधनील वैविध्याकडे केवळ वैचित्र्य म्हणून पाहण्यात येऊ नये. आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाय ह्या पद्धती मानवाने निर्माण केल्या आहेत. अनेक शतके सातत्याने चालत आलेल्या या समाजमान्य रूढी आहेत. त्या त्या प्रदेशात त्या समाजधारणेला आवश्यक मानल्या जातात. समाजधारणेला त्यांच्यामुळे कधीही बाधा आलेली दिसत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसास विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित्त मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणार्‍यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी निर्दोष सुटतात है। सिद्ध केले तर (व तसे सहज शाक्य आहे) खून करण्याची प्रवृत्ती वाढेल. पाप व पुष्प या कल्पना विवेकवादाच्या कसोटीवर उतरत नाहीत, परंतु ८०-९०% लोकांच्या मनावर या कल्पनांचा पगडा असल्यामुळे ते चांगले वागण्याचा प्रयत्न करतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

ऑगस्ट ९० च्या अंकातील ‘धर्म की धर्मापलीकडे’ हा लेख वाचला. धर्म हा भीतीवर आधारित आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘सृष्टीच्या खर्‍याखुर्‍या ज्ञानाने भीतीचा समूळ नाश होणार आहे हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल’ असे विधान लेखकाने केले आहे. या विधानाला सबळ पुरावा लेखकाने लेखात कोठेही दिलेला नाही. हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही. सृष्टीच्या ज्ञानामुळे भीतीचा समूळ नाश होतो ही कल्पनाच चुकीची असल्यामळे ती सर्वसामान्यांना पटवून देता येणार नाही. हृदयरोगाबद्दल संपूर्ण ज्ञान असलेले डॉक्टर्ससुद्धा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर भीतिग्रस्त होतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

[ पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो. ते क्रोधाच्या भरात लिहिलेले असून त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुचीहीन आहे, आणि ते वाचून आमच्या वाचकांना क्लेशच होतील याची जाणीव आम्हाला आहे. त्या पत्रात फक्त शिवीगाळ आहे, युक्तिवादाचा मागमूस नाही हे वाचकांच्या लक्षात येईलच. पण तरीसुद्धा ते पत्र छापायचे आम्ही ठरविले यांची दोन कारणे आहेत. एकतर तुम्ही हे पत्र छापणार नाहीच’ असे म्हणून लेखकाने आम्हाला एक प्रकारे आव्हानच दिले होते; ते आम्ही स्वीकारू शकतो हे त्याला दाखवायचे होते. आणि दुसरे म्हणजे मनुष्य सात्त्विक संतापाचा बुरखा पांघरून कोणत्या पातळीवर उतरू शकतो हे आम्हाला वाचकांना दाखवायचे होते, एवढेच नव्हे तर दुष्ट हेतूने डिवचले गेल्यानंतरही त्याला किती सभ्य आणि संयमी भाषेत उत्तर देता येते याचे प्रात्यक्षिकही लेखकाला दाखवायचे होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक यांस
स. न. वि.वि

‘नवा सुधारक’ (जून) मिळाला.

तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे.

“पुरुष हा बहुस्त्रीक (पॉलीगामस्) आहे व प्रकृतितः स्त्री तशी नाही ” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे का? की त्यात पितृसत्ताक कुटुंबनीतीचेच दर्शन आहे? स्त्री पुरुषांतील प्रीती आणि त्या प्रीतीतील ‘एकनिष्ठा’ सहजात आहे की ‘अक्वायर्ड’ आणि ‘एन्व्हायरनमेंटल’ आहे ?

पुढे वाचा

वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

वा. वि. भट
संपादक ‘संग्रहालय’
अभिनव प्रकाशन
अंक मिळाला. लगेच वाचूनही काढला. त्यातील मनुताईंच्या परिचयाचा श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. डॉ. भोळे यांचा सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपातील घडामोडी संबंधीचा लेखही विचार प्रवर्तक आहे. श्री. दिवाकर मोहनी यांचे पत्र अत्यंत मार्मिक वाटले.

श्रीमती दुर्गा भागवत
अंक वाचनीय व उद्बोधकही आहे. बरट्रॅंड रसेल रसेलच्या पुस्तकाचा अनुवाद या मासिकाचे वैशिष्ट्य ठरावे.आपल्या कार्यात आपल्याला यश मिळो हीच इच्छा.

ना. ग. गोरे
अंक मिळाला. धन्यवाद, लेख आवडले.

श्री. वि. भावे (आय्. ए. एस्.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर

संपादक,
नवा सुधारक यांस,
सप्रेम नमस्कार

आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ थत्ते इत्यादींनीही आपापल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ती पत्रे आपण माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पहिली गोष्ट अशी की कोठल्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या प्रश्नाकडे बघितले जावे ह्यासाठीच मी माझे पत्र एखाद्या धर्माच्या कैवारी वृत्तपत्राला न लिहिता आपणांस लिहिले आहे.

पुढे वाचा