विषय «विवेकवाद»

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

विचाराने जगायचे तर किंमत चुकवावी लागते

सर्वांना सस्नेह नमस्कार.

‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या परिसंवादाच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो? इकडे माझा प्रवास कसा झाला? हे मी विषद करतो. मी लहान असताना आमच्याकडे ‘घोड्यावरचा देव’ नावाचा एक प्रकार असायचा. तर त्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती जायचो. ‘सासनकाठी’ नावाचा एक प्रकार इकडे असतो. म्हणजे काय? तर काहीतरी एक उत्सव असतो. त्यात गुलालामध्ये बुडवलेलं खोबरं असतं. ते खोबरं मंदिरावरती टाकायचं आणि तिथून ते खाली पडलं की उचलून खायचं, असा तो प्रकार असतो.

पुढे वाचा

नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही

नास्तिकतेचा विचार भारतामध्ये शेकडो वर्षांपासून आहे; पण आपल्याकडे नास्तिकता अद्याप रुजलेली नाही. नास्तिकतेचा विचार करणाऱ्यांना आजही एकटेपणाची भीती वाटते. समाजात तुटल्यासारखं वाटतं. जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात, त्यांचा लढा खरेतर आस्तिकांच्या विरोधात नसतो, तर तो आस्तिक विचारांच्या विरोधात असतो. आगरकर नेहमी म्हणायचे की विचारकलहाला कशाला घाबरायचं?

नास्तिक आपले विचार ठामपणे मांडून देवा-धर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांनाही विचार करायला प्रवृत्त करतात. पण याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा असतो असा होत नाही. आस्तिक असणाऱ्यांनी विचार करावा, आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत, रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या टाळाव्यात ह्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करत असतात.

पुढे वाचा

देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट

ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो.

सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत नाही. पण तरीही अतिशय विनम्रपणे याचा स्वीकार करते. मंचावर उपस्थित जावेद अख्तर सर एक शायर किंवा स्क्रीन-प्ले-रायटर म्हणून आपणा सर्वांना अवगत आहेत. मी नास्तिक झाल्यापासून रॅशनॅलिटीसाठी त्यांना फॉलो करते आणि रॅशनॅलिटीसाठी भारतातले म्हणावे असे एक आयडॉल कदाचित तेच असतील.

पुढे वाचा

संविधानाचा संकोच आणि अडथळे

कार्यक्रमाचे आयोजक आणि उजेडाकडे जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि उजेडाच्या दिशेने बघत असणाऱ्या सगळ्या बंधुभगिनींनो,

कायदा, कायद्याचे क्षेत्र किंवा एकूणच कायद्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर, सध्या काही खूप चांगले वातावरण नाही हे नक्की. आपण कायद्याकडे जसे बघतो, तसे अर्थ आपल्याला त्यात दिसतात. परंतु कायदा किंवा न्याय मिळणे प्रक्रियावादी होणे हे अत्यंत विदारक सत्य आहे. महाराष्ट्रातल्या अनेक न्यायालयांनाच नाही तर, भारतातल्या अनेक न्यायालयांना न्यायमंदिर असे नाव दिलेले आहे. आता काही मुसलमान लोकांनी म्हटले की न्यायमंदिरच्या ऐवजी न्यायमस्जिद म्हटलेले चालेल का? हा प्रश्न उभा केलेलाच चालणार नाही अनेकांना.

पुढे वाचा

नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा

गेली दहा वर्षे मी ज्या दोन मुद्यांवरती बोलतो आहे. तेच दोन मुद्दे मला आणखी सविस्तर, वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील. एक, परिषदेसारखे हे सगळे उपद्व्याप कशासाठी? आणि दोन, परिषद सांगलीतंच का? तर हे जे दोन बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे.

आपण गेली दहा वर्षे वेगवेगळे उपक्रम करत आहोत. यावेळी आपला दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक जीवनामध्ये दहा वर्षे हा कालावधी फार मोठा नाही, पण तेवढा छोटापण नाही. काही गणती करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जमेच्या आहेत, त्या मी नमूद करेन.

पुढे वाचा

नास्तिकवाद आणि स्त्रिया

सत्यासत्यता, अज्ञान व अपसमज यांच्या पलीकडे जाणारी नास्तिकता हवी आहे

नवी दिल्ली: फर्नांड डी व्हॅरेन्स, संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्याकांच्या समस्यांवरील विशेष संवाददाते, यांनी भारतातील “बिघडत चाललेल्या” (मानवी) अधिकारांच्या बिघाडाचे “मोठ्या प्रमाणात झालेला, पद्धतशीर आणि धोकादायक बिघाड” असे वर्णन केले आहे.

त्यांनी मणिपूरचा दाखला देऊन म्हटले आहे, “जिचे भयानक अत्याचारांमध्ये रूपांतर होऊ शकेल अशा मुस्लिम आणि इतर धार्मिक ’इतरेजनांना’ व्यापक प्रमाणावर बळीचा बकरा बनवण्याच्या आणि त्यांच्या अमानवीकरणाच्या प्रक्रियेचे हे लक्षण आहे.” “२०१४ आणि २०१८ च्या दरम्यान अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये ७८६% वाढ झाल्याचे दिसून आले” अशा एका अभ्यासाचा त्यांनी हवाला दिला.

पुढे वाचा

नास्तिकांची मांदियाळी 

नास्तिक्य हा सहसा लोकांच्या फार आवडीचा नसलेला किंवा दुर्लक्षित केलेला विषय. मग नास्तिक म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे, दीड शहाणे, आगाऊ, इथपासून ते नास्तिकता म्हणजे टोकाची भूमिका घेणे इथपर्यंत बिरुदांचा वर्षाव केलेला असतो. आणि हे सगळं करताना नास्तिक, नास्तिक्य, बुद्धिप्रामाण्य, विवेक म्हणजे नेमकं काय, हे येतं कुठून, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात नास्तिकांची परंपरा किती मोठी आहे, ह्या सगळ्याचा विचार तर सोडाच पण कित्येकदा गंधही नसतो. तेव्हा नास्तिक परिषद म्हटल्यावर हे नास्तिक एकत्र येऊन करतात काय, ह्यांना परिषद घ्यायची काय गरज पडते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला. 

आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव किर्लोस्कर यांनी या अंकात दिले. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जातच होती. र.धों. कर्वे, महादेवशास्त्री दिवेकर, वि.दा.

पुढे वाचा

नास्तिकता कशासाठी?

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.

पुढे वाचा

शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार

काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.

माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला.

पुढे वाचा