जुनें जाउं द्या मरणालागुनि
जातीयतेमुळे निर्माण होणारी उच्चनीचता ही विषमतेमध्येच मोडत असल्याकारणाने तिच्याविरुद्धचा म्हणजेच विषमतेविरुद्धचा लढा पुढे चालविण्यास आजचा सुधारकला आपल्या वाचकांचे साहाय्य हवे आहे. गेल्या दोनतीनशे वर्षांपासून न सुटलेला हा प्रश्न आम्ही सोडवावयास घेतला आहे. दोनतीनशे वर्षांपूर्वी विषमता नव्हती असा ह्याचा अर्थ नव्हे; पण ती हटविण्यासाठी यत्न सुरू झाले नव्हते, ते त्या सुमारास सुरू झाले. आजवर केल्या गेलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही हे जाणून ह्या अत्यन्त जटिल प्रश्नाचे उत्तर आपणास चर्चेमधून काढावयाचे आहे. ही समस्या एकट्या संपादकांनी सोडवावयाची नाही. ती एकट्यादुकट्याला सुटण्यासारखीच नाही.
विषय «संपादकीय»
संपादकीय
(१) आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
(पुढे चालू)
मागच्या लेखात आम्ही परिस्थितिशरणतेचा उल्लेख करताना ही शरणता फक्त ऋणकोची असते असे नाही, ती धनकोचीदेखील तितकीच असते असे विधान केले आहे. आम्हाला असे म्हणावयाचे आहे की धनकोच्या कल्पनाविश्वांत-मनोविश्वात दुस-या कोणत्याही शक्यतेचा, वेगळ्या परिस्थितीचा विचार डोकावत नसल्यामुळे, त्यापेक्षा निराळी परिस्थिती त्याने स्वप्नातदेखील पाहिलेली नसते त्यामुळे; इतकेच नाही तर ऋणकोची ही दुःस्थिती त्याच्या पूर्वजन्मीच्या दुष्कृतांमुळे आणि आपली स्वतःची सुस्थिती आपल्या बापजाद्यांच्या शेवटल्या जन्मातल्या आणि आपल्या पूर्वजन्मातल्या सुकृतामुळेच आपल्या वाट्याला आली आहे अशी त्याची बालंबाल खात्री असल्यामुळे धनकोच्या मनाला अन्यायाची टोचणी लागत नाही.
संपादकीय
आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
आपल्या आचरणामध्ये श्रद्धामूलक वा संस्कारजन्य परिस्थितिशरणता आहे. विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे. विवेकवाद्यांचे कोणत्याही व्यक्तीशी भांडण नसून श्रद्धेशी आहे, संस्कारांशी आहे त्याचप्रमाणे श्रद्धा, संस्कार आणि आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांत फरक नाही ह्याचा उल्लेख मागच्या अंकात केला होता. समाजातील विषमता काही व्यक्तींवर अतिशय अन्याय करणारी असल्यामुळे आणि विवेकवाद्यांना तिच्याशी लढा द्यावयाचा असल्यामुळे विषमतेची काही बटबटीत उदाहरणे ह्या स्तंभातून देण्याचा मानस आहे. त्यायोगे विषमता का नको ते पुन्हा स्पष्ट होईल आणि तीवर उपाय शोधणे शक्य होईल. अन्यायकत्र्या व्यक्तींना उपदेश केल्याने, त्यांना घेराव, मारहाण किंवा त्यांचे प्राण-हरण केल्याने प्रश्न सुटणार नाहीत तर अविवेकी लोकांच्या मनांत विवेकाचा उदय झाल्यासच ते सुटतील आणि शंभर टक्के लोक विवेकी झाले नाहीत तरी पंचावन्न टक्के होऊ शकतील, विवेकी नेहमीसाठी अल्पसंख्य राहणार नाहीत, असा विवेकवाद्यांचा विश्वास आहे.
संपादकीय
मित्रहो,
अलीकडे जाणवत असलेल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयामुळे संपादकमंडळाकडे मी संपादकत्वाच्या जबाबदारीमधून निवृत्त होण्याची इच्छा एक वर्षापूर्वीच व्यक्त केली होती. मासिकाचे संपादकत्व नव्या संपादकाकडे सोपविण्याची वेळ आता आली
आहे.
संपादकपदाची धुरा कोणाकडे सोपवावी याचा मी पुष्कळ विचार केला, बहुतेक सर्वांशी चर्चा केली. या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी –
संपादकमंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.
संपादकमंडळ पुढीलप्रमाणे असावे :
दिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, बा. य. देशपांडे, नंदा खरे आणि सुनीती देव.
संपादकीय : अभ्यागत संपादकांचे
‘समान नागरी कायदा’ ह्या विषयावरील विशेषांकाच्या संपादनाची संधी आजचा सुधारकच्या संपादकांनी मला दिली ह्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
समान नागरी कायद्याबाबतची चर्चा प्रामुख्याने गेल्या १०-१२ वर्षांत आपल्यापुढे आली आहे. काहीतरी नैमित्तिक कारण मिळाल्याशिवाय ह्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही असे खेदाने म्हणावे लागते. शहाबानोचा खटला किंवा बाबरी मशीदीचे उद्ध्वस्तीकरण किंवा सरला मुद्गलचा खटला ह्या प्रसंगाने समान नागरी कायद्याचा प्रश्न आपल्यापुढे येत राहिला. मात्र तो तडीस लावण्याचा प्रयत्न आजही होताना दिसत नाही.
भारतीय राज्यघटना अस्तित्वात येऊन आज ४६ वर्षे लोटली.
संपादकीय
हा समान नागरी कायदा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्ही अतिशय समाधानी आहोत. पण त्याचबरोबर अंकाचे संपूर्ण श्रेय अभ्यागत संपादकाचे आहे हे नमूद करणे आमचे कर्तव्य आहे. प्रा. जया सागडे यांच्या समर्थ संपादनातून बाहेर पडलेला हा अंक सर्वस्वी त्यांच्यांत कर्तृत्वाचे फळ आहे. अंकाची आखणी, विषयांची विभागणी, तज्ज्ञांकडून विषयाच्या विविध अंगांवर आमच्याने फिटण्यासारारखे लेख लिहवून घेणे, त्याकरिता पत्रव्यवहार करणे इत्यादि गोष्टी त्यांनी इतक्या आपलेपणाने केल्या की त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानणे हा केवळ उपचार झाला. त्यांचे ऋण आमच्याने फिटण्यासारखे नाही! त्यांच्यासारखा समर्थ संपादक विशेषांकाला लाभला हे आमचे भाग्य!
संपादकीय
देशापुढील ज्वलंत प्रश्नांचा सर्वांगीण विचार व्हावा या हेतूने त्यावर तज्ञ लेखकांचे परिसंवाद घडवून आणून ते विशेषांकातून प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार जाहीर केल्याला एक वर्ष लोटून गेले. परंतु एकही तसा विशेषांक बाहेर पडला नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत हे प्रथम सांगितले पाहिजे. मध्यन्तरी डॉ. भा. ल. भोळे ह्यांच्या संपादकत्वाखाली त्यांच्या सौजन्याने आगरकर विशेषांक आम्ही प्रकाशित करू शकलो, पण पूर्वी घोषित केलेल्या विषयांवरच्या विशेषांकाच्या प्रकाशनास फार उशीर झाला आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. पण या मधल्या काळात आम्ही निष्क्रिय राहिलेलो नाही हेही सांगावेसे वाटते.
संपादकीय
आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते मानल्याशिवाय आम्हाला राहवत नाही.
हा आगरकर विशेषांक प्रसिद्ध करीत असताना गेल्या वर्षी वर्षारंभी दिलेले एक आश्वासन मात्र आम्ही पाळू शकलो नाही ह्याबद्दल वाचकांची क्षमा मागणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.
संपादकीय
महाराष्ट्र फाउंडेशन ह्या अमेरिकेमधल्या अनिवासी महाराष्ट्रीय श्री.सुनील देशमुख यांनी स्थापलेल्या संघटनेने आपल्या ह्या मासिकाला, आजचा सुधारक ला, उत्तम वैचारिक मासिकाला द्यावयाचा रु. ५०,००० चा पुरस्कार दिला आहे हे सांगण्यालाआम्हाला आनंद होत आहे.
आम्ही महाराष्ट्र फाउंडेशनचे त्यासाठी अत्यन्त आभारी आहोत. मासिकाच्या ह्या यशाचे श्रेय कोणा एकट्याचे नसून लेखकांसह सगळ्या परिवाराचे आहे ह्याची कृतज्ञ जाणीव संपादकाला आहे.
ह्या पुरस्कारामुळे आमची विचारप्रवर्तक उत्कृष्ट साहित्य सतत देण्याची व समाजपरिवर्तनासाठी निष्ठेने आंदोलने चालविण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि त्याहीकरिता आपणा सर्वांचे साह्य आम्हाला लागेल.
संपादकीय
हा सहाव्या वर्षाचा पहिला अंक. मार्च ९५ चा अंक प्रकाशित झाला तेव्हा आजच्या सुधारकने पाच वर्षांची वाटचाल पुरी केली होती, आणि या अंकाबरोबर तो सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गतेतिहासाकडे मागे वळून पाहिले तर पाच वर्षे संपली हे सांगूनही खरे वाटत नाही. दर महिन्याचा अंक प्रकाशित करण्याच्या धामधुमीत काळाचे भानही नाहीसे होत होते. या काळात अनेक अडचणी आल्या, नाहीत असे नाही; पण त्या आपोआप सुटत गेल्या. जुने वर्गणीदार बरेचसे दरवर्षी गळत गेले, पण नवेही मिळत गेले आणि जरी स्वावलंबी होण्याकरिता अवश्य असलेले साडेसातशे वर्गणीदारांचे लक्ष्य आम्ही गाठू शकलो नाही, तरी कूर्मगतीने का होईना आम्ही त्याच्याजवळ जात राहिलो.