“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध होईल तेच ब्रह्माचे ज्ञान ग्रहण करावे”. “दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः” (ब्रह्म सूक्ष्मबुद्धि मनुष्यांच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते) असे उपनिषदाने कंठरवाने सांगितलेही आहेत. “श्रुतेस्तु शब्दमूलत्वात्’ २।१।२७ ह्या सूत्राचा अर्थ श्रीशंकराचार्य करतात तसा नाही.
Category «इतर»
प्रिय वाचक,
ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी सहायक संस्था – एका कृतिशील विचारवंताचे कार्य
पुण्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करणारी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ नावाची एक संस्था गेली चव्वेचाळीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे. ह्या समितीची स्थापना ज्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे झाली त्यांतील प्रमुख होते डॉ. अच्युत शंकर आपटे. ७ जानेवारी २००० रोजी डॉ. आपटे यांचे पुण्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. बी. ए. व एम्. ए. ला गणित हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आलेल्या अच्युतरावांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून न्युक्लीअर फिजिक्समध्ये आचार्य ही पदवी मिळवली.
लैंगिक वाङ्मय — एक तुलना (उत्तरार्ध)
कामविषयक वाङ्मयाचे साहजिकच दोन भाग पडतात. एका अर्थी सर्वच ललितवाङ्मयाचा समावेश त्यांत होईल हे वर सांगितलेंच, व दुसरा भाग म्हणजे कामशास्त्रावर शास्त्रीय दृष्ट्या लिहिलेलें वाङ्मय. अशी पुस्तकें संस्कृतांत पुष्कळ आहेत, परंतु ती जुनी असल्यामुळे त्यांतील पुष्कळ विधानें आज पटणे शक्य नाही, व मराठींत आमचे स्वतःचे पुस्तकाशिवाय खरोखर आधुनिक शास्त्रीय दृष्टीनें, म्हणजे त्यांत नीति, धर्म वगैरे फालतू गोष्टी न आणतां, लिहिलेले दुसरें एकही पुस्तक आमचे माहितीत नाही, कारण डॉ. लेले व डॉ. मराठे यांच्या गुप्त रोगांवरील पुस्तकांचा यात समावेश करावा की काय हा प्रश्नच आहे.
श्रद्धा–अश्रद्धा घोळ
आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता हे निमूटपणे ऐकून घेते. ह्या विषयावर काही वेगळा विचार माझ्यापरीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात, लॉजिकल आणि रॅशनल या दोन शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर, लॉजिकल (1) of, relating to, involving, or being in accordance with logic.
सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज
आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्रश्न पडला —
गुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात?
संतांचे बंड आणि भक्तीचा मुलामा
‘. . . तरीसुद्धा या बंडाचा (संतांच्या भागवत-धर्माचा) चातुर्वर्ण्यविध्वं-सनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळ्यासारखे भक्त व्हा, मग आम्ही तुम्हाला मानू, असे म्हणून दलितवर्गाची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलितवर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायाने बंद होतात, असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधुसंतांच्या चमत्काराच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची नि समतावादाची व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात.
प्रिय वाचक
प्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका घेतली जाते. असा त्यांचा खुलासा. त्यांनी हा आरोप अनेक वेळा केला, आमच्या सहकाऱ्यांजवळही केला. म्हणून आम्ही कोश उघडून पाहिला. ‘प्रचार’ आणि ‘प्रसार’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत.
विवेकवादी नीती
आतापर्यंत आपण सत्य-असत्याच्या प्रांतात होतो. पण नीतीचा प्रांत म्हणजे सत्य-असत्याचा नव्हे, तर चांगल्यावाइटाचा किंवा साधु-असाधु गोष्टींचा प्रांत. जिला reason म्हणतात, आणि जिचा पर्याय म्हणून आपण ‘विवेक’ हा शब्द वापरतो, त्याच्या प्रांतातून वेगळ्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. हे कटाक्षाने सांगावे लागते, कारण reason चे, विवेकाचे क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र हे मत अठराव्या शतकात डेव्हिड ह्यूम (१७११ ते १७७९) या तत्त्वज्ञाने व्यक्त केले असून ते बरोबर असावे असा माझा समज आहे. ह्यूमनंतर आलेल्या कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने दोन reasons आहेत असे मत मांडले, Theoretical Reason (औपपत्तिक विवेक) आणि Practical Reason (व्यावहारिक विवेक).
लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)
(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख)
या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही.
वाङ्मयांत सामान्यतः जरी फक्त लिखाणाचाच समावेश करण्याची पद्धत आहे, तरी त्या शब्दाचा मूल अर्थ पाहिल्यास त्यांत भाषणाचाही समावेश करणे जरूर आहे आणि कामविषयक बाबतींत याला महत्त्व आहे.