मी एक सामान्य उद्योजक. अर्थातच, एका उद्योगप्रधान घराण्यात जन्मल्या-मुळे पिढ्यान् पिढ्या वारसातून आणि संस्कारांतूनच उद्यमशीलता जोपासली गेलेली, त्यामुळे प्रथितयश! पण तरीही समाधानी मात्र नाही! सतत समोर प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरे सुचत नाहीत त्यामुळे बेचैन असतो. आपण कोण आहोत? कशासाठी हे सारे करत आहोत? यातून नेमके साध्य काय करणार आहोत? नाहीतरी एक दिवस आपण मरणारच आणि त्यानंतर आपण जे काही, ज्या कशासाठी करत होतो, त्या कशाकशाला काही अर्थच उरणार नाही. मग हे सारे आपण करायचे तरी कशासाठी? या प्रश्नांचा भडिमार स्वतःवरच स्वतःहून करून घेत असतो.
विषय «इतर»
प्रवाही कुटुंब – एक मिथ्यकथा!
आजचा सुधारकच्या एप्रिल २००० च्या अंकातील र. धों. कर्वे यांचा प्रवाही कुटुंब हा पुनर्मुद्रित लेख वाचला. प्रवाही कुटुंब असे शीर्षक असले तरी त्यात कुटुंबाबाबत नवीन विचार मांडलेला दिसत नाही. व्यक्तीच्या अनिर्बंध, मुक्त, लैंगिक आचार-स्वातंत्र्याबाबतच सर्व मांडणी दिसते. लैंगिक प्रेरणेविषयी भारतात जी उपेक्षा व त्यातून निर्माण झालेले ढोंग सर्वत्र दिसते त्याची चीड या लेखात प्रतिक्रियात्मक स्वरूपात व्यक्त होते आहे. ती स्वागतार्ह आहे पण व्यवहार्य मात्र नाही.
| कुटुंब प्रवाही असावे हाच नवीन विचार आहे. संपा.]
मुळात नियमनाशिवाय समाज अशक्य असतो. अगदी लेखात पुरस्कार-लेल्या स्वैर-समागम-संघातसुद्धा, ‘प्रत्येक सदस्याने दुसऱ्याची समागमाची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे’ असा नियम आहेच.
अरवली गाथा (१)
पाण्याचे दुर्भिक्ष
सध्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादि राज्यांमधून भीषण दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. चांगल्या मॉन्सूनच्या सलग बारा वर्षांनंतर केव्हातरी, कुठेतरी असे काही होणारच आहे ही आपली धारणा आहे.
राजस्थानातल्या “अलवर” जिल्ह्यातील “ठाणागाझी’ तहसील आणि त्याच्या आसपासच्या काही भागाची ही कहाणी!
अरवलीच्या टेकड्यांमधील पाचसहा छोट्या छोट्या नद्यांच्या पाणलोटात वसलेला हा भाग! “अर्वरी’, “सरसा”, “तिलदेही”, “जहाजवाली” आणि “ख्या-रेल’ या सुमारे ४०/४५ कि. मी. लांबीच्या आणि पुढे मोठ्या नद्यांना मिळणाऱ्या या उपनद्या!
साधारण १९३० सालपर्यंत इथली परिस्थिती बरी होती. या टेकड्यांवर पुरेशी हिरवी झाडी, चराईसाठी गवत, नवी नवलात राखलेल्या घनदाट वृक्षराजी होत्या.
बाळ : एक अज्ञातवासी ज्ञानोपासक
लहान मुलांना टी.व्ही.वरचा WWF म्हणून कार्यक्रम आहे, तो फार आवडतो. ज्यांना कोणाला तरी ठोकून काढायची इच्छा असते पण शक्य नसते अशी ही मुले असतात बहुधा. ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ तथाकथित मल्ल ठोकून काढायच्या लायकीचे आहेत, किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. त्यांना सर्वांसमोर एक्स्पोज केले पाहिजे ही बाळची एक ख्वाईश होती. अधूनमधून विद्येचे असे स्वयंमन्य दिग्गज समर्थ ज्ञानोपासकांकडून चीत झालेले पाहिले की बाळला फार आनंद होत असे. त्याने स्वतःही क्वचित् संधी आली असता अशा तोतयांचे पितळ उघडे पाडले आहे. पण एकूणच असे प्रसंग त्याला कमी आले.
मनात आलं ते केलं
‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.
वृद्धांच्या समस्या (२)
बऱ्याच वेळी पुढारलेल्या पा चात्त्य देशांत ज्या विषयांची चर्चा चालत असते त्याच विषयांची चर्चा सहाजिकच भारतातही चालते. भारतासारख्या गरीब देशाशी तुलना करता ह्या संपन्न देशात आर्थिक प्रश्न वेगळे किंवा जवळजवळ सुटलेले आहेत. त्यांच्याकडे कुटुंबसंस्था, स्त्रियांच्या घराबाहेर जाऊन केलेल्या नोकऱ्या, व्यक्तिस्वातन्त्र्य, व्यक्तिमत्त्वाचा विकास व त्यामुळे असणारी किंवा वाढणारी स्वयं-केन्द्रितता हे प्रश्न जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्यातच वृद्ध होरपळत असले तर त्यांच्या समस्या चर्चेला येतात. वृद्ध म्हणजे सामान्यपणे साठ वर्षे वयावरील लोक असे गृहीत धरले जाते. संपन्न देशांत आज सरासरी आयुर्मान ७८ वर्षांपर्यंत गेलेले आहे.
घोंगे यांच्या संशोधनातील भकासपणा
१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थनार्थ लिहिला आहे. परंतु, तो मूळ प्रतिक्रिया समजून न घेता ‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण’ लिहिला आहे.
[१. आपली करमणूक व उद्बोधनही झाले असावे. आपण एकच कबूल केले तरी दुसरे झाकत नाही.
जीवाचे पीळदार कथासूत्र
येत्या काही महिन्यांत माणसाच्या संपूर्ण जेनोमचा (genom) कच्चा आराखडा आपल्या हातात येईल. या घटनेबद्दलच्या बातम्या तिला वैद्यकीय आणि (बहुधा) नैतिक महत्त्व देतात. माझ्या मते एवढ्याने भागत नाही. मला वाटते की हा माणसाच्या इतिहासातील निरपवादपणे सर्वाधिक बौद्धिक महत्त्वाचा क्षण असेल. कोणी म्हणेल की एखादा माणूस म्हणजे केवळ त्याचे (किंवा तिचे) जीन्स नव्हेत, तर इतरही काही आहे मी हे नाकारत नाही. आपल्या सर्वांमध्ये केवळ जेनेटिक कोडपेक्षा बरेच काही आहे. पण आजवर मानवी जीन्सबाबत जी गूढता होती, जे अज्ञान होते, ते उल्लंघणारी आपली पिढी पहिली असेल.
जनाधिकार आणि “प्रत्यक्ष सहभागाची लोकशाही” (Empowerment & Participatory Democracy)
१. आजचा सुधारकच्या एका अंकात श्री. मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचा ते करत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या मेंढा-लेखा क्षेत्रातल्या प्रयोगाचे वर्णन आहे. “आमच्या गावात आम्ही सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार” अशा तर्हेची घोषणा देऊन हे काम होत आहे त्यावेळी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता की अशा तर्हेच्या “प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीच्या’ (direct participatory democracy) लोकसंख्यीय मर्यादा काय असतील? रोमन रिपब्लिक्स आकाराने फार लहान होती आणि तीही पुढे ती टिकली नाहीत. स्वतः श्री मोहन यांनाही असे वाटते की साधारण १००० लोकसंख्येच्यावर हा प्रयोग कार्यप्रवण राहणार नाही.
धर्म आणि धम्म
आधुनिक भारताचे नाव अख्ख्या जगात पसरविणारा एक महान प्रज्ञा-पुरुष (ओशो) म्हणतो, ‘बुद्ध हा भारतमातेचा सर्वोत्तम पुत्र असन त्याच्या विचाराची गंगोत्री ही जगातील बहतेक तत्त्वज्ञानांची जननी ठरली आहे’. आंग्लतत्त्वज्ञ बरटाँड रसेल म्हणतो. ‘माझा स्वतःचा कुठलाही अंगीकृत धर्म नाही. परंतु मला जर एखाद्या धर्माचा स्वीकारच करावयाचा झाला तर मी बुद्धाच्या धर्माचाच अंगीकार करेन. प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी तर आपल्या सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) या सिद्धान्ताच्या संशोधनात बौद्धतत्त्वज्ञानाला बरेचसे श्रेय देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुंग(युग) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बौद्धधर्मातील तत्त्वांच्या आधारावर ‘अभि-धर्म पर्सनॅलिटी’ या शब्दांत व्यक्तिमत्त्व-विकासाचे विश्लेषण केले आहे.