नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत प्रमुख होती ती आर्थर कॉनन डॉइलची शेरलॉक होम्स ह्या नायकाभोवती रचलेली पुस्तके.
सर आर्थर कॉनन डॉइल (१८५९-१९३०) पेशाने डॉक्टर होते, आणि त्यांना वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखा शिकायला आवडत असे.
