[डेव्हिड ब्रूक्सच्या सीकिंग मॉरल रिअॅलिस्ट्स (इंडियन एक्सप्रेस (14 एप्रिल 2012)/द न्यूयॉर्क टाइम्स ) या लेखाचा हा मथितार्थ.]
आजकाल बरेचदा चांगली सामाजिक कामे करत असलेले तरुण भेटतात जगातल्या गरीब देशांमधल्या प्रवासांतून त्यांना केवळ स्वतःत न गुंतता काही सामाजिक उद्योग करायचे सुचलेले असते. त्यांच्यात एरवी भेटणारा तुच्छतावाद नसतो, तर या युगाला नैतिक विचार देण्याची इच्छा असते. हे पाहून आपणही ताजेतवाने होतो. पण त्यांच्या या सेवाव्रतांत, सेवाधर्मांत काही त्रुटीही असतात.
एक म्हणजे त्यांना वाटत असते, की राजकारण टाळता येईल. त्यांना पायाभूत कामांमधूनच समाजात बदल होतात, राजकीय प्रक्रियेतून नाही, असे वाटते.
Category «इतर»
साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा
नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत प्रमुख होती ती आर्थर कॉनन डॉइलची शेरलॉक होम्स ह्या नायकाभोवती रचलेली पुस्तके.
सर आर्थर कॉनन डॉइल (१८५९-१९३०) पेशाने डॉक्टर होते, आणि त्यांना वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखा शिकायला आवडत असे.
अमेरिकेची दिवाळखोरी
[अमेरिकन शासनाला कायद्याने अंदाजे एका वर्षाच्या GDP इतकेच कर्ज घेता येते. काही दिवसांपूर्वी ही मर्यादा अमेरिकन काँग्रेसने वाढवून दिली, पण सशर्त. हडेलहप्पीने या शर्ती लादणारा रिपब्लिकन काँग्रेसमेनचा गट टी पार्टी या नावाने ओळखला जातो. त्यांची ही कृती दूरगामी परिणामांत घातक आहे असे अर्थशास्त्री एकमुखाने सांगत आहेत. हे पूर्ण प्रकरण समजावून सांगणारा लेख खांदेवाल्यांनी 7 ऑगस्ट 2011 च्या लोकशाही वार्ता साठी लिहिला. त्याचा संपादित भाग खांदेवाल्यांच्या पुरवणी मजकुरासोबत, देत आहोत. – सं. ]
अमेरिकन स्वप्न
दोन्ही जागतिक युद्धांमध्ये अमेरिका मुख्य घटक म्हणून गुंतलेला नव्हता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिप मंडळ : एक विचार
रोज सकाळी फिरायला जाताना मला एक वृद्ध जोडपे हातात हात घालून कधी पाठमोरे तर कधी समोरून येताना दिसते. मनातल्या मनात मी ‘जोडी अशीच अभंग राहो’ ही सदिच्छा व्यक्त करते. आयुष्याची अशी रम्य पहाट किंवा संध्याकाळ सगळ्यांच्याच वाट्याला येईल असे नाही. विवाह करून सहचराचा हातात घेतलेला हात कधीतरी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर सुटू शकतो अन् मग सुरू होते उर्वरित जीवनाची त्याची/तिची एकाकी वाटचाल! हे एकाकीपण सहन करणे, निभावणे खूप कठीण असते. पण त्याला पर्यायही नाही असे वाटत असतानाच वर्तमानपत्रातून ‘ज्येष्ठ व्यक्तींसाठी Live-in-relationship मंडळ’ स्थापन होणार अशी बातमी वाचनात आली.
मानवी अस्तित्व (३)
आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?
निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.
आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी (50 दशलक्ष) तारे असण्याचा अंदाज आहे.
सिंगापूर आणि टी-ट्वेंटी वृत्ती
” (इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्ता काही डावे विचारवंत म्हणून प्रसिद्ध (किंवा बदनाम!) नाहीत. परंतु त्यांनाही उच्चवर्गीयांचा भारतापुढचे प्रश्न सोडवण्याबाबतचा लोकशाही-विरोधी व्यवस्थापकीय दृष्टिकोन आवडत नाही. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर 25 जून 2011 ला अवर सिंगापूर फँटसी नावाचा एक लेख लिहिला. त्याचा हा सटीप वृत्तान्त.]
गुप्तांना गुंतवणूक संस्थांच्या पाचेकशे प्रतिनिधींपुढे आजचे भारतीय राजकारण यावर बोलायला पाचारण केले गेले. पुढ्यात आयआयटी/आयआयएम्समध्ये शिकून आलेले पाचेकशे जागतिकीकृत वित्तव्यवहारतज्ज्ञ होते. (‘शंभर डॉलर्सचे हर्मेस टाय ल्यालेले, डॉलर्समध्ये सात आकडी पगार घेणारे, छानछोकी गाड्या वापरणारे”)
गुप्तांनी IIT/IIM ह्या संस्थांमध्ये सुरुवातीपासून जात्याधारित आरक्षण असल्याचा उल्लेख केला.
कारागृहातील महिलांची स्थिती
दि.3 एप्रिलच्या हिंदू ह्या दैनिकामध्ये दिव्या त्रिवेदी ह्यांनी कारागृहांमध्ये होणारी महिला कैद्यांची छळणूक ह्या विषयावर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे – सर्व कारागृहे सोनी सोरींनी भरली आहेत.
ह्या लेखात महिला कैद्यांना दिलेल्या बेकायदेशीर, अमानुष वागणुकीचे किस्से कचन केले आहेत. त्यातील काही आसु च्या वाचकांसाठी देत आहे.
1. तिहार कारागृहाच्या वार्ड क्र.8 च्या वॉर्डनशी थोडी वादावादी झाल्यामुळे जोहरा बरताली हिला ओटीपोटात जबरदस्त गुद्दे मारण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून तिला एक महिनाभर रक्तस्राव होत होता. शेवटी त्यातच तिचा अंत झाला.
लोकनेता
आपल्या लोकशाही राज्यप्रणाली असलेल्या देशात आमदार अथवा एमएलए ही थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात महत्त्वाची कड़ी आहे. एकाच वेळी ती जनतेच्या सर्व थरांत संबंध असलेली व सरकारांतही अधिकार असलेली व्यक्ती असते. सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी केल्यावर वा करताना त्याची काय प्रतिक्रिया येते ते सर्वप्रथम कळणारी ती व्यक्ती असते. त्याला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. एकतर त्याला मतदारांच्या आवडी(interest)चे विषय सांभाळावे लागतात तर दुसरीकडे तो त्याच्या पक्षाला बांधील असतो. जर त्याला सरकारात काही स्थान मिळवायचे असले तर त्याला त्यांच्या पक्षातल्या श्रेष्ठींना चांगलेच सांभाळावे लागते.
मानवी अस्तित्व (२)
मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
प्रसिद्ध विज्ञानकथालेखक डोग्लास एडम्स यांच्या मते या विश्वाचा आकार प्रचंड, अतिप्रचंड आहे. तरीसुद्धा महास्फोट सिद्धान्तानुसार (big bang theory) हिशोब केल्यास एके काळी हे विश्व आकाराने फारच लहान होते, असे म्हणता येईल. 1370 कोटी वर्षापूर्वी काळ व अवकाश शून्यातून बाहेर पडले, असा दावा हा सिद्धान्त करतो. हे कसे शक्य झाले? हाच प्रश्न अजून एका प्रकारे विचारता येईल. या जगात कशाचेही अस्तित्व का आहे? प्रश्न फार मोठा आहे. अनाकलनीय आहे. शून्यातून विश्वाची उत्पत्ती, किंवा कुठल्याही वस्तूची उत्पत्ती होऊ शकते याचीच कल्पना करणे अवघड ठरत आहे.
ही स्त्री कोण? (भाग १)
[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ]
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं
– बहिणाबाई (1880-1951)
स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले गेले तर त्यांच्या उपयोजनातील संकल्पनात्मक गोंधळ संपण्याची शक्यता असतेच पण जरा शिस्तबद्धताही येते.
‘स्त्री’ला मराठीत पर्यायी शब्द आहे महिला, वनिता, बाई, इ. अनेकवचन बायका, बाया. हिन्दी/उर्दूमध्ये औरत, लौंडी इ.